हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिण मतदार संघाचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. या वाढदिवसादिवशी पृथ्वीराजबाबांनी आपल्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांच्यासोबत सहकुटूंब एकत्र येत केक कापला. ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांना त्यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी केक भरवला होता.
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील (कै.) दाजीसाहेब ऊर्फ आनंदराव चव्हाण, मातोश्री (कै.) प्रेमलाकाकी चव्हाण या दोघांनी कऱ्हाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९९१ मध्ये (कै.) राजीव गांधी यांच्या आग्रहानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना राजकारणात यावे लागले. नवखे असूनही कऱ्हाडकरांनी चव्हाण कुटुंबावरील प्रेम, श्रद्धा आणि निष्ठेमुळे पृथ्वीराजबाबांना लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून दिले. कऱ्हाडकरांनी त्यांना तीनदा लोकसभेत नेतृत्वाची संधी दिली.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या नुकत्याच पार पडलेल्या वाढदिवसा दिवशी कराड येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांनी औक्षण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर आ. चव्हाण यांनी मतदारसंघातील व राज्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या व नेत्यांच्या शुभेच्छा कराड येथील निवासस्थानी व त्यानंतर संध्याकाळी कराड दक्षिण काँग्रेस कमिटी कडून आयोजित केलेल्या प्रेरणा दिन कार्यक्रमांस उपस्थित राहून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारल्या.
यानंतर आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे बंधू व कुस्ती प्रेमी अधिकराव चव्हाण यांनी आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या स्पर्धेस त्यांनी उपस्थिती लावली. तसेच सुमारे एक तासभर बसून कुस्त्या स्पर्धा पाहिल्या. यानंतर त्यांनी प्रेरणा दिन कार्यक्रमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
काय आहे लग्नाची गोष्ट?
16 डिसेंबर 1976 रोजी पृथ्वीराज चव्हाण यांचा विवाह बेडगकर सरकार श्रीमंत रामचंद्रराव घोरपडे यांची कन्या सत्वशीला यांच्याशी मिरजेतील शिवानीलय सभागृहात पार पडला. पृथ्वीराजबाबांचा साखरपुडा अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने पार पडला आणि लग्नातही कोणता डामडौल नव्हता. सत्वशीला चव्हाण या आजही बाबांवर तितकेच प्रेम करतात.
काम करताना अडचणी आल्यास काय करावे? पृथ्वीराजबाबा म्हणतात…
मतदारसंघातील महत्वाचा उपक्रम पूर्ण करताना अडचणी येत असतील तर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी पाठपुराव्याची आवश्यकता असावी लागते. वीस वर्ष देशासाठी धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यासाठी व मतदार संघासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेता आले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कायम एक नंबरला राहिले, अनेक मोठे उद्योग राज्यात आणता आले. तसेच आपल कराड जिल्हा व्हावा यासाठी अनेक रचनात्मक बदल करण्यावर भर दिला. मतदार संघातील प्रत्येक गावात निधी पडला पाहिजे, याकडे माझे विशेष लक्ष असते, असे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीवर चव्हाण म्हणतात.