SBI च्या ‘या’ योजनेद्वारे एकदाच पैसे जमा करून दर महिन्याला करता येईल कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । SBI ची अ‍ॅन्युइटी डिपॉझिट स्कीम ही बँकेच्या सर्वात महत्वाच्या डिपॉझिट स्कीमपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना एकाच वेळी सर्व पैसे जमा करावे लागतील. काही महिन्यांनंतर बँक दरमहा हप्त्याच्या स्वरूपात ग्राहकांना पैसे देते. बँक हा हप्ता मुद्दलाचा व्याजदर म्हणून मोजते. या योजनेत ग्राहकांना मिळणारे व्याज तीन महिन्यांच्या चक्रवाढ दरावर मोजले जाते.

या अ‍ॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणुकीचा कालावधी बदलतो. तुम्ही या योजनेत 36 महिने, 60 महिने, 84 महिने आणि 120 महिन्यांसाठी गुंतवणूक करू शकता. विशेष म्हणजे या योजनेत तुम्ही तुमच्या गरजेनुसार जास्तीत जास्त गुंतवणूक करू शकता. या योजनेत किमान 1,000 रुपये गुंतवणे आवश्यक आहे.

18 वर्षांखालील लोकंही गुंतवणूक करू शकतात
या योजनेसाठी खाते उघडल्यानंतर, ग्राहकाला युनिव्हर्सल पासबुक मिळते. 18 वर्षांखालील लोकंही या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत, सिंगल अकाउंट किंवा जॉईंट अकाउंट उघडता येते. यामध्ये, गुंतवणुकीवरील व्याज दर निवडलेल्या कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिटप्रमाणेच असेल.

अशा प्रकारे गणित समजून घ्या
समजा, जर तुम्ही पाच वर्षांसाठी फंड जमा केला, तर तुम्हाला पाच वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर लागू असलेल्या व्याजदरावर व्याज मिळेल. भारतातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. जर एखाद्या गुंतवणूकदाराला दरमहा 10000 रुपये मासिक उत्पन्न हवे असेल तर त्यासाठी गुंतवणूकदाराला 5 लाख 7 हजार 965 रुपये आणि 93 पैसे जमा करावे लागतील. तुम्हाला जमा केलेल्या रकमेवर 7 टक्के व्याज दराने रिटर्न मिळेल, ज्यामुळे गुंतवणूकदार दरमहा सुमारे 10 हजार रुपये कमावतील.

गुंतवणूकीचे नियम
SBI च्या अ‍ॅन्युइटी स्कीममध्ये दरमहा किमान 1000 रुपये जमा करण्याचा नियम आहे, मात्र जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. अ‍ॅन्युइटी पेमेंटमध्ये, ग्राहकाने जमा केलेल्या रकमेवर व्याज आकारून विहित वेळेनंतर उत्पन्न सुरू होते. या योजना भविष्यासाठी खूप छान आहेत, मात्र मध्यमवर्गीयांना इतके पैसे एकत्र जमवणे शक्य नाही.

अ‍ॅन्युइटी स्कीमचे खास फीचर्स
तुम्ही SBI च्या सर्व शाखांमधून अ‍ॅन्युइटी स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता.
SBI कर्मचारी आणि माजी कर्मचाऱ्यांना एक टक्का जास्त व्याज मिळेल.
ज्येष्ठ नागरिकांना 0.5 टक्के जास्त व्याज मिळेल.
या योजनेवर फिक्स्ड डिपॉझिट व्याज दर देखील लागू होतील.
डिपॉझिट नंतरच्या महिन्यापासून पेमेन्टच्या तारखेला अ‍ॅन्युइटी दिली जाईल.
TDS कापल्यानंतर बचत खात्यात किंवा चालू खात्यात अ‍ॅन्युइटी भरली जाईल.
एकरकमी रकमेवर चांगला रिटर्न मिळविण्यासाठी एक चांगली योजना आहे.
विशेष परिस्थितीत अ‍ॅन्युइटीच्या शिल्लक रकमेच्या 75% पर्यंत ओव्हरड्राफ्ट/कर्ज मिळू शकते.
अ‍ॅन्युइटी स्कीममध्ये बचत खाते चांगले रिटर्न देते.

Leave a Comment