सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
मिरजेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गणेश मोहन केंगार हा गावठी पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गांधी चौकी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकून त्याच्याकडून गावठी पिस्तुल, जीवंत काडतुसे, व मोटरसायकल असा एकूण 1 लाख 34 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून केंगार याच्या विरोधात गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
गांधी चौकीचे पोलीस उप निरीक्षक राजु अन्नछत्रे व पोलीस पथक असे रात्रीगस्त करीत असताना त्यांना आंबेडकर उद्यान मिरज समोर एक इसम आपले दुचाकीवर बसून गावठी पिस्तुल घेऊन थांबला असल्याची अशी खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी छापा टाकून त्या इसमास ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला 75 हजार रूपये किंमतीचे एक गावटी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसह मिळुन आली. तसेच 4 हजार रूपयांचे दोन जीवंत काडतुसे व मोटरसायकल मिळून आली. असा एकूण 1 लाख 34 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पिस्तुल कोणास विकण्यासाठी आला होता. याची कसून चौकशी सुरू आहे.