पुणे प्रतिनिधी | जगात तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होऊ शकते असे बोलले जाते याचाच प्रत्येय आज पुण्यामध्ये आला आहे. महानगर पालिकेचा पाणी पुरवठा का खंडित झाला असे विचारताच संबंधित माणूस अंगावर धावून गेल्याने जाब विचारणाऱ्या व्यक्तीने त्याला कात्रीने भोकसले आहे. प्रकार केश कर्तनालायत झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महेंद्र कुसाळकर ( वय ४०) असे कात्रीने हल्ला करणाऱ्याचे नाव असून राजेश भुईटे हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.
कुमार बिल्डर या कंट्रक्शन कंपनीकडे झोपडपट्टी पुनर्वसन करण्याचे कंत्राट १९९५ साली देण्यात आले होते. त्यानंतर येथे उभारण्यात आलेल्या झोपडपट्टी पुनर्वसच्या इमारतीच्या देखभहलीचे काम देखील त्याच कंपनीला देण्यात आले. मागील तीन महिन्यापासून मेघासिटीमध्ये अर्थात झोपडपट्टी पुनर्वसीत भागात पाणी पुरवठ्यात अनिययमितता आहे. तीन दिवसातून एकदा पाणी येणे आणि आलेले पाणी १० मिनिटात जाणे अशा घटनामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. या त्रासा पोटी राजेश भुईटे या कुमार बिल्डरच्या कामगाराला महेंद्र कुसाळकर याने विचारणा केली. त्यावेळी राजेश भुईटे याने महेंद्र कुसाळकर याला शिवीगाळ करत मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महेंद्र कुसाळकर याने केस कापण्याची कात्री राजेश भुईटे याच्या छातीत खुपसली. यात राजेश भुईटे गंभीर जखमी झाला. तर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत महेंद्र कुसाळकर याला ताब्यात घेऊन त्यावर गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेच्या भारतीय दंड संहिता ३०२ अंतर्गत खूनाचा प्रयत्न म्हणून अलंकार पोलीस ठाणे कर्वे नगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर आरोपी महेंद्र कुसाळकर याला शिवाजी नगर येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे. मेघा सिटी हा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा ठेका कुमार बिल्डरचे सर्वेसर्वा ललितकुमार जैन यांनी घेतला होता. मात्र पैशाने गडगंज असणाऱ्या ललितकुमार जैन यांना गोरगरिबांच्या समस्यांकडे बघण्यास वेळ नाही. कामाच्या निकृष्ट दर्जामुळे येथील इमारती पावसाळ्यात गळतात. त्या इमारतीची अवस्था २५ वर्षातच मोडखळीला आली आहे असे येथील लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मेघासिटीच्या नागरिकांना मूलभूत गरजांच्या समस्यांतून मुक्त करण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.