सांगली-कोल्हापूर महामार्गावरील अपघातात वाढदिवसादिवशीच तरुणाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
सांगली-कोल्हापूर महामार्गावरील डी-मार्ट नजिक ॲपे रिक्षा आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या धडकेत एका मोटरसायकलस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. सचिन कोळी असं तरुणाचं नाव असून तो उदगाव येथील रहिवाशी होता. या अपघातात ॲपे रिक्षामधील प्रवासी सुद्धा जखमी झाले आहेत. मोहसिन मुबारख निपाणीकर, शाहिदा निपाणीकर, नाजिया मोहसिन निपाणीकर, सुजान मोहसिन निपाणीकर, प्रकाश अण्णा जावळेकर अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सदर अपघात रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. दुचाकीस्वाराच्या अंगावर दुचाकी पडल्याने नागरिकांनी  दुचाकी उचलून जखमी दुचाकीस्वारास बाजूला केले. तर रिक्षा मधील ४ जणांना गंभीर मार लागल्याने त्यांना ही बाहेर काढून तातडीने रुग्णवाहिकातून मिरज सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता हलविण्यात आले. जयसिंगपूर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच तातडीने पोलीस कॉन्स्टेबल बाळू कोळी , रोहित डावाळे आणि बंडगर यांनी घटनास्थळी पोहोचून अपघातातील दोन्ही वाहनांना बाजूला केले. अपघाताची माहिती घेतली.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

”शिवसैनिकांनो मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ”

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा विषय अनिवार्य होणार; मंत्री सुभाष देसाईंची माहिती

वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या एका मेसेजवर त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेन – धनंजय मुंडे