औरंगाबाद-नगर रोडवर कंटेनरच्या धडकेत दुचाकीचा चुराडा, एक जण ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव कंटेनरने रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास वाळूजजवळ घडली. यावेळी लघुशंका करण्यास गेलेल्या दुचाकीवरील एका तरुणाचे प्राण वाचले आहेत.

या विषयी अधिक माहिती अशी की, राजेश अरुण बघे (23) व गजाजन प्रल्हाद रहाटे (27, दोघेही रा.मानेगाव ता.शेगाव जि.बुलढाणा) हे दोघे मित्र खाजगी बसने शनिवारी (दि.13) पुणे परिसरात वास्तव्यास असणाऱ्या राजेश बघे याचा मावसभाऊ मंगेश रतीये यास भेटण्यासाठी गेले होते. परत येताना राजेश बघे व गजाजन रहाटे हे दोघेही मंगेशच्या दुचाकीवरून (क्रमांक एच.एच.12, एच.जे. 2009) सोमवारी (दि.15) सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास पुण्याकडून मुळगावी जाण्यासाठी निघाले होते. औरंगाबाद-नगर महामार्गावरील वाळूजजवळील ग्रीन गोल्ड कंपनीसमोरुन जात असताना सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास लघुशंका करण्यासाठी गजाजन गाडीवरून उतरला.

दरम्यान, काहीक्षणातच मागील बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या एका कंटेनरने (क्रमांक एम.एच. 14, जी.यु. 3231) समोरील वाहनाला ओव्हर करण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्याकडेला दुचाकीसोबत उभ्या असलेल्या राजेशला चिरडत जवळपास 10 फुट फरफडत नेले. तर गजानन किरकोळ जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन गंभीर जखमी राजेश बघे व किरकोळ जखमी गजाजन राहटेस शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून राजेश बघे यास मृत घोषीत केले.

Leave a Comment