कार- दुचाकीच्या अपघातात एक ठार, 6 जण जखमी

औरंगाबाद | भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना औरंगाबाद जळगाव रस्त्यावरील आळंद येथे मंगळवारी दुपारी घडली. या अपघातानंतर कार रस्त्याच्या बाजूला उलटली या अपघातामध्ये सहा जण जखमी झाले आहे.

जळगाव औरंगाबादच्या दिशेने जाणारी भरधाव कार (एमएच 14 एफ .सी .24 88)आनंद जवळ पाठीमागून दुचाकीला धडक अपघातानंतर दुचाकीवरील दोघे जण वर उडून बाजूला पडले. यानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली. यात रात्री उशिरा दुचाकीवरील सुरेश भगवान राऊत (रा.सिसारखेडा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातात शिवप्रसाद चांडक, संतोष चांडक, शिवबा चांडक, विजया चांडक, श्रीनाथ चांडक व दुचाकीवरील गंगाधार सुरे हे गंभीर जखमी झाले. जखमींना वडोदबाजार पोलिसांनी औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल केले. पुढील तपास आरती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार अंभोरे हे करीत आहे.

You might also like