One Nation One Election : EVM मध्ये एकदाच घोटाळा करण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या टर्म मध्ये मोठा निर्णय घेत एक देश एक निवडणूक One (Nation One Election) प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करून घेतला आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात संसदेत सुद्धा हा प्रस्ताव मंजूर करण्याचा सरकारचा मानस आहे. मात्र तत्पूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चौफेर टीका करत एक देश एक निवडणूक प्रस्तावाला विरोध केला आहे. EVM मध्ये एकदाच घोटाळा करण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन चा घाट घातला जात असल्याचे संजय राऊतांनी म्हंटल.

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, लोकसभा निवडणूक व विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका स्वतःच्या फायद्यासाठी एकत्र करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. जेणेकरून ईव्हीएममध्ये एकदाच घोटाळा करायचा, यंत्रणा हाताशी धरून एकाच वेळी सर्व निवडणुका जिंकायच्या, असा भाजपचा प्रयत्न आहे. त्यांना एक राष्ट्र, एक निवडणूक घ्यायची असेल तर आधी महापालिकांच्या निवडणुका एकत्र येऊन दाखवा. राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊन दाखवा. भविष्यात नो इलेक्शन नो नेशन चा नारा देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं असेही संजय राऊतांनी म्हंटल आहे.

ते पुढे म्हणाले, जे मोदी आणि त्यांचं सरकार चार राज्यांची निवडणूक एकत्र घेऊ शकले नाहीत. मुंबई महापालिकेसह 14 पालिकांच्या निवडणुका घेऊ शकत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये तीन वर्ष निवडणूक घेऊ शकले नाहीत त्यांनी एक देश एक निवडणुकीचा फंडा आणावा हे खूप आश्चर्यकारक आहे. संस्कृती बदलण्याचा आणि संविधान बदलण्याचा हा प्रयत्न चालू आहे. आपल्या संविधानात काही मार्गदर्शक तत्वे आहेत ती बदलण्याचा प्रयत्न चालवला जात आहे, द्या निवडणुका बंद करायलाही हे लोक घाबरणार नाहीत असा आरोप संजय राऊतांनी भाजपवर केला आहे. तुम्हाला एकाचवेळी निवडणुका जिंकायच्या म्हणून हे फंडे करत असाल तर देशाच्या दृष्टीने उपयोगाच नाही. निवडणूक ही लूट नाही, ही लोकशाहीची गरज आहे अस म्हणत संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला. तसेच विरोधी पक्ष एकत्र बसून या प्रस्तावावर चर्चा करेल आणि एक देश एक निवडणूक या विधेयकाला कसा विरोध करायचा ते ठरवू अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.