Mahindra जीपची दूचाकीला समोरासमोर धडक; एकजण गंभीर जखमी

भुयाचीवाडी फाटा हद्दीतील घटना : चारजण किरकोळ जखमी

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत कराड तालुक्यातील भुयाचीवाडी फाटा हद्दीतील सेवा रस्त्यावर महिंद्रा जीप व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला झाला. तर अन्य चारजण किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत भुयाचीवाडी फाटा येथे कराड ते सातारा जाणाऱ्या सेवा रस्त्याला लग्नकार्य उरकून इंदोली दिशेला जाणारी महिंद्रा जीप क्र. (MH 12 CK 4984) व हिरो होंडा क्र. (MH 50 D 2743) यांच्यात समोरासमोर धडक झाली. दोन्ही वाहनांमध्ये झालेली धडक भीषण असल्याने दूचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला. तर एका महिलेसह जीप चालक व अन्य प्रवाशी जखमी झाले.

उंब्रज पोलिसांना अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.अपघातग्रस्त दोन्ही वहाने पोलिसांनी पोलिस क्रेनच्या साह्याने पोलिस ठाण्यात आणली आहे. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे.