अमरावती प्रतिनिधी | अमरावतीच्या नवाते चौकामध्ये आज एका बावीस वर्षीय विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला करून तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. घडलेल्या प्रकरणामुळे संपूर्ण नावाचे चौकामध्ये काही काळ मोठी धावपळ झाली तर मुस्लिम युवकाने मुलीवर हल्ला करून तिला संपविलेल्या अफवेने मात्र काही काळ अमरावतीमध्ये तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती .
मात्र नागरिकांनी आरोपीला चोप देताच त्यांनी तो मलकापूर भातकुली येथील असल्याचे सांगितले व धर्माने हिंदू असल्याचे सांगितले तेव्हा कुठे नागरिक शांत झाले . घटनास्थळी बजरंगदल तसेच विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मोठा राडा केला होता . भातकुलीच्या मलकापूर गावातील तुषार किरण मस्करे, असे आरोपीचे नाव असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याचे सदर मुलीवर एकतर्फी प्रेम असल्याचे बोलल्या जात आहे. कुमारी अर्पिता दत्ता ठाकरे ही महात्मा फुले विद्यालय अमरावती येथे शिक्षण घेत होती .
आज दू २ ते ३ दरम्यान कुमारी अर्पिता आपल्या मैत्रिणीसोबत जवळचाच कोचिंग क्लासेसला जात होती . मात्र वाटेतच तिला आरोपी तुषारने अडविले व माझा शिक्का बोलत नाही असे म्हणून वाद घातला व सोबत असलेल्या धारदार शस्त्राने तिच्या मानेवर पोटामध्ये सपासप वार करण्यास सुरुवात केली तिच्या सोबत असणाऱ्या तिच्या मैत्रिणीने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र ती सुद्धा या धारदार शस्त्राच्या हल्ल्याने गंभीर झाल्याने तीसुद्धा अर्पिताला वाचवू शकली नाही. अर्पिताचा रक्तबंबाळ झालेला देह जमिनीवर कोसळला आरोपी पळण्याच्या आधीच नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला तसेच घटनास्थळी राजापेठ पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ आरोपीला अटक केली. .