Monday, February 6, 2023

पूर्ववैमन्स्यातून एकावर धारदार शस्त्राने वार : संशयित तीन आरोपी फरार

- Advertisement -

कराड |येथील भोई गल्ली येथे पूर्ववैमन्स्यातून चौघांनी एकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना शनिवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अन्य तिघेजण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. शंकर भानुदास नलवडे (वय 29 रा. भोईगल्ली रविवार पेठ, आझाद चौक कराड) असे वार झालेल्या जखमी युवकाचे नाव आहे. तर विनोद तडख, रोहित तडख, यश पाटील, पंकज पाटील सर्व (रा. भोईगल्ली रविवार पेठ, आझाद चौक कराड) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. तर पोलिसांनी रोहित तडख याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जखमी शंकर नलवडे व संशयित आरोपी यांचा नवरात्रीमध्ये नाचण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्याचाच राग मनात धरत शनिवारी रात्री विनोद तडख, रोहित तडख, यश पाटील, पंकज पाटील या चौघांनी शंकर नलवडे याच्यावर धारदार शस्त्रांनी पोटावर, डोक्यात व छातीवर वार केले. यामध्ये शंकर नलवडे गंभीर जखमी झाले.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. व त्यातील रोहित तडख यास पोलिसांनी अटक केली असून अन्य तिघेजण फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. रोहित तडख याला आज न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे करीत आहेत.