हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता Flipkart आणि Amazon वर OnePlus Nord N20 SE उपलब्ध झाला आहे. हे लक्षात घ्या कि, भारतात अद्याप अधिकृतपणे हा फोन लॉन्च झालेला नाही, तरीही कंपनीकडून त्याची विक्री सुरू करण्यात आली आहे. ई-कॉमर्स वेबसाइटवर लिस्ट केलेल्या या फोनची किंमत आणि फीचर्स आता समोर आले आहेत. हा फोन Flipkart वर 14,979 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यासोबतच यावर अनेक प्रकारच्या बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत, ज्यामुळे त्याची किंमत आणखी कमी होऊ शकेल.
Flipkart फेडरल बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे या फोनच्या खरेदीवर 1500 रुपयांपर्यंत सूट दिली जाते आहे. तसेच PNB च्या क्रेडिट कार्डवर 1250 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. याशिवाय Flipkart Axis Bank कार्ड वापरून 5 टक्के कॅशबॅक मिळू शकेल. चला तर मग या फोनच्या फीचर्सविषयीची माहिती जाणून घेउयात…
कॅमेरा
या OnePlus Nord N20 SE मध्ये 50 MP चा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 33W SuperVooc चार्जिंग सपोर्टसहीत 5,000mAh चा बॅटरी पॅक देखील मिळेल. तसेच कंपनीकडून असा दावा देखील करण्यात आला आहे की, याद्वारे फक्त 34 मिनिटांतच फोनची बॅटरी 0 ते 50% पर्यंत वाढते. यामध्ये एक सुपर पॉवर सेव्हिंग मोड आहे ज्याद्वारे फक्त 5% बॅटरी असेल तरीही आपल्याला 90 मिनिटांपर्यंत कॉल अथवा 53 मिनिटांपर्यंत टेक्स्ट मेसेजेस पाठवता येतील.
फीचर्स
या OnePlus Nord N20 SE मध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज मिळेल. तसेच या स्मार्टफोनमध्ये 720×1612 पिक्सेल रिझोल्यूशनसहीत 6.56-इंच HD+ डिस्प्ले देखील मिळेल. हा स्मार्टफोन ब्लू ओएसिस आणि सेलेस्टियल ब्लॅक या दोन प्रकारच्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. OnePlus Nord N20 SE Android 12 ऑपरेटिंग सिस्टीम बेस्ड OxygenOS 12 वर ऑपरेट केला जातो. या फोनची स्टोरेज क्षमता वाढवता येऊ शकेल. तसेच यासाठी या फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉटही देण्यात आला आहे.
OnePlus 10 Pro ची किंमत झाली कमी
हे लक्षात घ्या कि, OnePlus ने भारतात आपल्या 10 Pro या मॉडेलची किंमत कमी केली आहे. OnePlus 10 Pro दोन व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. यातील पहिल्यामध्ये 8GB RAM + 128GB ROM तर दुसऱ्यामध्ये 12GB RAM + 256GB ROM दिला गेला आहे. त्यांची अनुक्रमे किंमत 66,999 आणि 71,999 रुपये आहे. मात्र आता किंमत कमी केल्यानंतर ग्राहकांना हे स्मार्टफोन्स अनुक्रमे 61,999 आणि 66,999 रुपयांमध्ये खरेदी करता येतील. हा फोन व्होल्कॅनिक ब्लॅक आणि एमराल्ड फॉरेस्ट या दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. OnePlus Nord N20 SE
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/oneplus-nord-n20-se-blue-oasis-64-gb/p/itmb79f66161f655
हे पण वाचा :
Redmi A1 मध्ये कमी किंमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स, किंमत तपासा
PNB ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! आता एटीएममधून काढता एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम
आता मोबाईल नंबरशिवाय अशा प्रकारे डाउनलोड करा Aadhar Card, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया
FD Rates : देशातील 4 मोठ्या बँकांपैकी कोणत्या बँकेच्या FD वर सर्वोधिक व्याज मिळेल ते पहा
Train Cancelled : रेल्वेकडून 154 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा