Onion Export Ban | कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या निर्यातीवर सरकारने 31 मार्चपर्यंत बंदी आणली होती. आणि त्या नंतर ही बंदी उठेल असे देखील सांगितले होते. परंतु आता त्यांच्यासाठी एक निराशाचा बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता 31 मार्च नंतरही कांद्यावरील निर्यात कायम राहणार असल्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. शेतकऱ्यांसह अनेक शेतकरी संघटना देखील आक्रमक झाले आहेत. सरकारप्रति संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहेत.
सरकारच्या पुढील आदेशापर्यंत कांदा निर्यात कायम राहणार
शेतकऱ्यांच्या कांद्यावर 31 मार्च नंतरही निर्यात बंदी (Onion Export Ban) राहणार असल्याचे परिपत्रक सरकारने काढलेले आहे. त्यामुळे आता सरकार पुढील आदेश देईपर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी कायम राहणारच आहे. 31 मार्चनंतर ही निर्यात संधी उठेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु आता देशांतर्गत बाजारपेठेतील उपलब्धता आणि किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे
8 डिसेंबर 2023 रोजी कांदा निर्यातीवर घातलेली बंदी | Onion Export Ban
केंद्र सरकारने 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. ही निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत राहील असे देखील सरकारने सांगितले होते. परंतु आता 31 मार्च जवळ आला आहे, तरी देखील सरकारने निर्यात बंदी चालू असेल असे सांगितले आहे. त्यामुळे आता शेतकरी संघटनेसह सगळे शेतकरी आक्रमक झालेले आहेत. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा नाहीतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात असल्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी केला आहे.
सध्या महागाई देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि ही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने अनेक धोरण आणली आहेत. यातीलच एक धोरण म्हणजे कांद्यावरील निर्यात बंदी. कांद्याच्या किमती वाढू नये आणि सर्वसामान्य लोकांना देखील कांदा-परवडावा. यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सध्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि या सगळ्यात शेतकऱ्यांना खुश राहण्यासाठी ठेवण्यासाठी सरकारने हे निर्णय घेतले असल्याचे देखील बोलले जात आहे. परंतु सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसलेला आहे.