… तर मरणाची परवानगी द्या; कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे राष्ट्रपतींना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्याला दर मिळत नसल्याने राज्यसरकारकडे कांदा खरेदीची मागणी करू लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचं करायच काय? हा प्रश्न पडला आहे. अशा अवस्थेत हतबल झालेल्या चांदवडच्या शेतकऱ्यांनी जर शेती करून काही मिळणारच नसेल तर मरणाची तरी परवानगी द्या अशी मागणीचे पत्र राष्ट्रपतींना लिहले आहे.

कांद्याला भाव नसल्याने जगणे अवघड झाले असून त्यापेक्षा मरणाची तरी परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका हा ‘कांदा व द्राक्षाचे’ प्रमुख उत्पादन असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. यंदा येथील शेतकरी कांदा आणि द्राक्षाच्या घसरलेल्या भावामुळे अडचणीत आला आहे. सरकारने आयात-निर्यात संदर्भात घेतलेल्या धोरणाचा चांगलाच फटका या शेतकऱ्यांना बसला आहे.

शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतात घेत असलेलया शेतमालास किती दर मिळाला आहे. हे रोजचे बाजारभाव चेक करणे खूप गरजेचे आहे. यामुळे भाव कधी वाढले? किती रुपयांनी वाढले यासोबतच सर्वाधीक भाव कुठे मिळत आहे यानुसार आपण आपला शेतमाल विक्री करून अधिक नफा कमावू शकतो. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi या मोबाईल अँपच्या मदतीने आता शेतकरी स्वतः आपल्याला हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजार समितीमधील ताजा बाजारभाव चेक करू शकतो. तुम्हीही या अतिशय महत्वाच्या सेवेचा मोफत लाभ घेण्यासाठी आजच तुमच्या मोबाईलवर Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.
Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

शेतीत घातलेला उत्पादन खर्चही निघेना

राज्यकर्ते कांदा व द्राक्ष, तसेच भाजीपाला मालाला योग्य व रास्त बाजारभाव देण्यास सातत्याने असमर्थ ठरत आहे. यंदा तर उत्पादनखर्चही निघू शकत नसल्याने आर्थिक गणितच बिघडले आहे. शेतकऱ्यांना कुटुंबाचे व त्याचे पालनपोषण करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे हताशपणे त्यांनी मृत्यूलाही परवानगी द्यावी, असा पर्याय केंद्र व राज्य सरकारला दिला आहे.

पत्रात नेमकं काय म्हंटलं आहे?

राज्यातील कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांचा राज्यांच्या विधानसभेत व राज्यसभेत सत्ताधारी राज्यकर्ते विचार करत नाही. त्यामुळे आपल्याला विनंती करण्यात येते की, शेतकऱ्यांना स्वेच्छामरण्याची परवानगी द्यावी, अशा आशयाचे पत्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, विजय जाधव, संपतराव वक्टे, उत्तमराव ठोंबरे, अनर्थ पठाण, दीपांशू जाधव, दत्तू ठाकरे, समाधान जामदार, शंकरराव जाधव, सागर निकम आदींसह शेकडो शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींकडे पाठविले आहे.