सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कांद्याला २० हजार रुपये देण्याची विक्रमी घोषणा केल्यानंतर शनिवारी जवळपास ५०० ते ७०० ट्रक कांदा बाजार समितीत दाखल झाला. मात्र हा कांदा प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने कांद्याचा दर सरासरी ५ हजाराने कोसळला आहे. साठवणूक केलेला कांदा व्यापारी पुन्हा बाजारात आणत असल्याने आवक वाढल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आज सरासरी कांदा ३ हजार ते १० हजार प्रति क्विंटल दराने गेला आहे.
गेल्या काही दिवसापासून कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातच सोलापुरात कांद्याच्या दराने उचांक गाठल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदच वातावरण तयार झालं होत. त्यामुळं सोलापुरात जास्तीचा भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी सोलापूर कृषी उत्त्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीकरिता धाव घेतली. दरम्यान आज कांद्याच्या भावात तब्बल ५ हजाराची घसरण झाल्यानं शेतकरी वर्ग निराश झाला आहे.