CAPF कॅन्टीनमध्ये आता फक्त मिळणार स्वदेशी वस्तू- गृहमंत्री अमित शहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीकडे एक संधी म्हणून पाहण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान म्हणाले आहेत की, सध्याची जगाची परिस्थिती ही भारतासाठी एक संधी बनू शकते, अशा परिस्थितीत आपल्याला स्वावलंबी बनले पाहिजे. पीएम मोदींनी लोकलसाठी वोकल बनण्याची घोषणा दिली. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने या दिशेने एक मोठा निर्णय घेतला आहे.

आता केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अर्थात सीएपीएफच्या (CAPF) कॅन्टीनमध्ये केवळ स्वदेश वस्तूंचीच विक्री होणार आहे. नवा नियम 1 जूनपासून लागू होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली. तसंच देशात बनवलेल्या वस्तूंचाच अधिकाधिक वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलं. अमित शाह यांनी सांगितलं की, “सर्व सीएपीएफच्या कॅन्टीनमध्ये आता फक्त देशात बनलेल्या उत्पादनांचीच विक्री करण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने आज घेतला आहे. 1 जून 2020 पासून देशभरातील सर्व सीएपीएफ कॅन्टीनमध्ये हा निर्णय लागू होईल. या निर्णयामुळे जवळपास 10 लाख सीएपीएफ कर्मचाऱ्यांचे 50 लाख नातेवाईक स्वदेशी उत्पादनांचा वापर करतील.”

याशिवाय अमित शहा यांनी देशातील लोकांना देशात बनवलेल्या जास्तीत जास्त उत्पादनांचा वापर करण्याचे आवाहनही केले. त्यांनी लिहिले, ‘मी देशातील लोकांना आवाहन करतो की तुम्ही देशात तयार केलेल्या उत्पादनांचा जास्तीत जास्त वापर करा आणि इतर लोकांनाही प्रोत्साहित करा. प्रत्येक भारतीयाने देशात (स्वदेशी) बनवलेल्या उत्पादनांचा वापर करण्याचे वचन दिले तर पाच वर्षांत देशातील लोकशाही स्वयंपूर्ण होऊ शकते अशी अशाही अमित शहा यांनी व्यक्त केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment