औरंगाबाद : गेल्या सहा दिवसापासून औरंगाबादेत कोरोनाची वाढते रुग्ण आणि हॉटेलमध्ये होणारी गर्दी पाहता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांनी आज सर्व हॉटेल, परमिटरूम, धाबे इत्यादी ठिकाणी डायनींग सुविधा बंद करून फक्त डिलिव्हरी आणि पार्सल सुविधाच सुरू राहणार असून हा आदेश बुधवारी सकाळी 6 वाजेपासून लागू होणार आहे.
11 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान औरंगाबादेत अंशतः लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तर या काळात येणाऱ्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे.या मध्ये सकाळी 6 ते रात्री 9 वाजे पर्यंत हॉटेल मध्ये ग्राहकांना बसून जेवण करण्याची मुभा होती.मात्र आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बुधवार पासून हॉटेल्समधून फक्त पार्सल सुविधा देण्याचे निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या पाच दिवसा पासून कोरोना रुगणाची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.त्यातच हॉटेल,परमिटरुम, धाबे, रिसॉर्ट अशा ठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे. ही गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी आहे.या मुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अजून वाढण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते.अशीच परिस्थिती पुढेही राहिली तर अजून कठोर निर्णय जिल्हा प्रशासन घेऊ शकते.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group