उद्घाटन कार्यक्रम : महाबळेश्वरला सत्ताधारी- विरोधकांच्या वादात पोलिसाची एंन्ट्री कुणामुळे?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

महाबळेश्वर नगरपरिषदेने बी. ओ. टी तत्वावर बांधलेले भारतरत्न ए.पी. जे अब्दुल कलाम व्यापारी संकुल या वस्तूचे उद्घाटन आज 9/12/21 रोजी करण्याचे योजले असताना पालिकेच्या 13 नगरसेवकांनी हे उद्घाटन उधळून लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी पालिकेला त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले होते. त्या घोष्टींची पूर्तता करून सदरचा अहवाल मुख्याधिकारी यांना दिलेला आहे. मुख्याधिकारी या निवडणूक आयोगाच्या कामानिमित्त मुंबई या ठिकाणी दोन-तीन दिवसांपासून असल्यामुळे मुख्य लिपिक यांच्या सहीचे पत्र पोलिस स्टेशन व तहसीलदारांना दिले आहे. कार्यक्रमाची तयारी सुरू असताना पोलिसांनी हा कार्यक्रम होऊ नये म्हणून जणू काही सुपारी घेतल्या सारखे काम चालू असताना बांधकाम साहित्य पोलीस साहित्य घेऊन गेल्याचा आरोप नगरसेवक कुमार शिंदे यांनी केला आहे.

कुमार शिंदे म्हणाले, पोलिसांचे अशा प्रकारचे कृत्य निंदनीय आहे. तरी या व्यापारी संकुलासाठी सर्वांनी एकत्र येऊन या उद्घाटनप्रसंगी आपली उपस्थिती लावावी. तसेच संकुलाचे उदघाटन करून गोरगरीब लोकांचे होणारे नुकसान टाळावे. या संकुलाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाची तयारी रोखण्यासाठी पोलिसांकडे कोणतीही लेखी सूचना नाही. संकुलाच्या आतील साहित्यही घेवून जाणे, हे पोलिसांच्या अधिकारात नाही. तरी ही गोष्ट निदंनीय आहे. महाबळेश्वर पालिकेच्या सत्ताधारी- विरोधक यांच्यात बुधवारी रात्री पोलिसांची एंन्ट्री ही राजकीय दबावामुळे की अन्य कशामुळे असा सवाल उपस्थितांच्याकडून केला जात होता.

आज दिग्गजाच्या हस्ते उद्घाटनाचे आयोजन

महाबळेश्वर पालिकेच्या या भारतरत्न ए.पी. जे अब्दुल कलाम व्यापारी संकुल वस्तूचे उद्घाटन काॅंग्रेसचे नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार, सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. शशिकांत शिंदे, नाना पटोले, आ. मकरंद पाटील, आ. संग्राम थोपटे, आ. मोहनराव कदम, जिल्हाधिकारी शेखरसिंह आणि जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या उपस्थित दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी उद्घाटनाचे आयोजन केले होते.

Leave a Comment