मालदीवमध्ये अडकलेल्या १९८ भारतीयांची नौदलाने केली घरवापसी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तूतीकोरिन । मालदीव येथे अडकलेल्या १९८ भारतीय नागरिकांना भारतीय नौदलाच्या जहाजाने (INS) आणण्यात आले आहे. INS ऐरावत १९८ भारतीयांना घेऊन आज तामिळनाडूतील तूतीकोरिन येथे पोहोचले आहे. या जहाजातून आलेल्या सर्व नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात येत आहे. तसेच त्यांचे साहित्य सॅनिटाईज करण्यात येत आहे.

याआधी मालदीव इथे अडकलेल्या ७५० भारतीयांना परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन समुद्र सेतू’ सुरु करण्यात आले होते. भारतीय नौदलाच जहाज आय एन एस जलाश्व मालदीवच्या माले बंदरात दाखल झाले होते. मेल इथे भारतीयांची तपासणी आणि ओळखपत्र वितरणाच काम सुरु झाल्यानंतर त्यांना भारतात आणले गेले.

 

जागतिक महामारी कोरोना विषाणूच्या संकटामुळे शेकडो भारतीय मालदीवमध्ये अडकले आहेत. मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत ऑपरेशन समुद्र सेतू अंतर्गत आयएनएस जलाश्व हे नौदल जहाज याआधी माले पोर्टवर ८ मे २०२० रोजी दाखल झाले होते. त्याचवेळी, भारतीय नागरिकांची मायदेशी परत जाण्यापूर्वी त्यांनी आवश्यक ते तपासणी आणि प्रक्रिया पार पाडली. मालदीवमधील भारतीय उच्चायुक्तांनी ही माहिती दिली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment