हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yes Bank : सध्याच्या काळात देशातील अनेक बँकांकडून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बँकिंगची सुविधा दिली जात आहे. त्यामध्ये आता खासगी क्षेत्रातील येस बँकेचे नाव देखील सामील झाले आहे. आता या बँकेच्या ग्राहकांना देखील व्हॉट्सअॅप बँकिंगची सुविधा मिळत आहे. हे लक्षात घ्या कि, Yes Bank च्या व्हॉट्सअॅप नंबरवर चॅटद्वारे बँकेचा बॅलन्स आणि मिनी स्टेटमेंटच्या माहितीसहीत अनेक सेवांचा लाभ घेता येईल.
जर आपल्या स्मार्टफोनवर Yes Bank व्हॉट्सअॅप बँकिंग सुरू करण्यासाठी मोबाईलमध्ये +91-829-120-1200 नंबर सेव्ह करा. यानंतर या नंबरवर “Hi” असे लिहून पाठवा.
आता Yes Bank कडून दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांची लिस्ट आपोआप आपल्यासमोर दिसेल. आता लिस्टमधील आपल्याला हव्या असलेल्या सेवेचा कीवर्ड टाइप करा. तसेच त्यावर क्लिक करून तो वापरता येईल.
Yes Bank च्या व्हॉट्सअॅप बँकिंगद्वारे आपल्याला 24×7 या बँकिंग सुविधांचा लाभ घेता येईल. येस बँकेचे व्हॉट्सअॅप बँकिंग इतर बँकांचे ग्राहक देखील वापरू शकतात मात्र त्यामध्ये मर्यादित सेवा उपलब्ध असतील.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.yesbank.in/
हे पण वाचा :
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
Tubeless Vs Tube Tyre यांपैकी कोणता टायर गाडीसाठी चांगला आहे ते जाणून घ्या
Credit Card मध्ये मिनिमम ड्यू भरण्याने कर्जाच्या सापळ्यात कसे अडकू शकाल ते जाणून घ्या
Train Cancelled : रेल्वेकडून आज 276 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Credit Card चे बिल भरण्यासाठी पर्सनल लोन घेणे कितपत योग्य आहे??? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत