नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी?? पहा संभाव्य यादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राज्यात फडणवीस- शिंदे सरकार स्थापन होईल. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर लवकरच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. या सरकारमध्ये कोणाकोणाला मंत्रिपदाची संधी मिळेल याची उत्सुकता आता त्यांच्या कार्यकर्त्यांना लागली आहे.

नव्या मंत्रिमंडळात भाजपच्या २५ ते ३० नेत्यांचा समावेश असू शकतो तर शिंदे गटाला १३-१५ मंत्रीपदे मिळू शकतील. भाजपकडे आमदारांची संख्या जास्त असल्याने मंत्रीपदासाठी चुरस पाहायला मिळू शकते. फडणवीस यांच्यासहित चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार , राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, जयकुमार गोरे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर नितेश राणे, गोपीचंद पडळकर, प्रशांत ठाकूर, याना राज्यमंत्री पद मिळण्याची दाट शक्यता आहे.

तर दुसरीकडे शिंदे गटाकडे ५१ आमदारांचे पाठबळ आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासहित शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, याना कॅबिनेट मंत्रपद मिळण्याची शक्यता आहे तर संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे यांची राज्यमंत्री पदी वर्णी लागू शकते.

राज्यात २०१४ ला युती सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदासोबत गृहखाते, नगरविकास खाते ही महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवली होती. यावेळी पुन्हा एकदा ही खाती फडणवीस स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे.