शिंदे सरकारच्या पहिल्याच निर्णयाला विरोध : भाजप आमदाराचा शेतकऱ्यांना पाठिंबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

शिंदे- फडणवीस सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिलाच घेतलेला निर्णय आणि आ. महेश शिंदेंचा ड्रिम प्रोजक्ट असलेल्या कोरेगाव एमआयडीसीला स्थानिकांनी विरोध केला आहे. बंगळूर- मुंबई औद्योगिक काॅरिडाॅरसाठी जमीन हस्तांतरणास सहा गावातील लोकांनी विरोध केला आहे. त्या संदर्भातील पत्र आज जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, भाजप आ. जयकुमार गोरे आणि आ. महेश शिंदे यांना स्थानिकांनी दिले आहे. यावेळी आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आ. जयकुमार गोरे यांनी सांगितले.

कोरेगाव तालुक्यात उद्योगधंदे वाढीसाठी औद्योगिक प्रकल्प उभारण्याचा निर्णय शिंदे- फडणवीस या दोघांच्या मंत्रिमंडळाने घेतला होता. या प्रकल्पामुळे आ. महेश शिंदे यांनी आपल्याला एक गिफ्ट मिळाले असल्याची भावना बोलून दाखविली होती. मात्र, उत्तर कोरेगावमध्ये नव्याने होणाऱ्या औद्योगिक प्रकल्पाला त्या भागातील असणाऱ्या सहा गावातील स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. याबाबतचे निवेदन सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना देण्यात आले.

यावेळी आमदार जयकुमार गोरे आणि महेश शिंदे यांना देखील ह्या औद्योगिक प्रकल्पाला विरोध असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे. कोरेगाव तालुक्यातील सोळशी, नायगाव, नांदवळ, रंणदुल्लाबाद, करंजखोप, पिंपोडे, भावेनगर या ठिकाणी असणारे सर्व शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. शेतकऱ्यांना अत्यल्प जमिनी असल्यामुळे नव्याने होणारा औद्योगिक प्रकल्प रद्द करून इतरत्र हलवावा, अशी मागणी यावेळी सहा गावातील एकत्र आलेल्या ग्रामस्थांनी केली आहे.

म्हसवडची एमआयडीसी कोणी हलवू शकत नाही ः-  आ. जयकुमार गोरे म्हणाले, तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम रहावा. जगातील कुठलीही शक्ती तुमची जमिनी घेवू शकत नाही. आता आमची म्हसवडची एमआयडीसी मी जोपर्यत आहे, तोपर्यंत कोणी हलवू शकत नाही. कोणी काहीही बोलू दे.