ऑरेंज अलर्ट ः तौत्के चक्रीवादळचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू, विद्युत पुरवठा खंडित 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : केरळ, गोवापाठोपाठ सिंधुदुर्ग, रत्नागिरीत रौदरुप धारण केलेल्या तौत्के मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. या चक्रीवादळाचा मुंबईला कोणताही धोका नसला तरी हवामान विभागानं मुंबई व परिसराला ऑरेज अलर्ट जारी केला आहे. मुंबईपासून 150 किमी अंतरावर चक्रीवादळ असून 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे मोठ्य प्रमाणावर मुंबईत झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट

मुंबईतील दादर, वरळी, लोअर परेल, माटुंगा, माहिमसह पश्चिम उपनगरात सर्वत्र जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईतील वरळी सी फेस, शिवाजी पार्क, मरीन ड्राईव्ह या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर उंचच उंच लाटा उसळताना पाहायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगरात गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघरसह इतर आजूबाजूच्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई शहर, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगरात ठिकठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. मात्र अद्याप कोणतीही जीवितहानी नाही.

अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित

तौत्के चक्रीवादळाचा फटका बसत असल्याने मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबईसह इतर ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.