हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हिवाळ्याचा काळ असून थंडीच्या या दिवसात संत्री सगळीकडेच दिसतात. सर्दीपासून संरक्षण आणि त्वचेच्या आरोग्यासाठी संत्री रामबाण उपाय आहे. पण तुम्हाला माहित आहे का ? सत्र्यांची साल सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. संत्र्याच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात सौंदर्यवर्धक गुणधर्मांचा साठा असतो…. संत्रीच्या सालामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन सी आणि पॉलीफेनॉलचे असतात. आज आपण जाणून घेऊया संत्र्याच्या सालीचे काही आरोग्यदायी फायदे….
कधी कधी प्रदुषण आणि वातावरणातील बदल यामुळे आपली त्वचा काळवंडते. त्वचेवरील तजेला निघून जातो. संत्र्याच्या सेवनामुळे तुमच्या त्वचेचा रंग उजळतो. तुमच्या त्वचेला आवश्यक अशा गोष्टी मिळाल्यामुळे तुमची त्वचा अधिक चांगली दिसू लागते.
संत्र्याच्या सालीमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते, आणि पोटाच्या समस्या दूर राहतात. तसेच संत्रीच्या सालीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
संत्र्याच्या सालीची पेस्ट तयार करून त्यामध्ये मध मिक्स करून हे मिश्रण आपल्या त्वचेवर लावल्याने त्वचेवरील मृत पेशींची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
संत्रीच्या सालांपासून पावडर बनवून त्यात खोबरेल तेल मिसळून डोक्याला लावला तर केसात कोंडा होत नाही.
स्क्रबसाठीही संत्र्याच्या सालीचा वापर करता येतो. यामुळे तुम्ही कोणत्याही केमिकल्सतचा वापर न करता नैसर्गिक पध्दतीने त्वचेची काळजी घेऊ शकता.
चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग, सुरकुत्या या समस्या दूर करण्यास संत्र्याची साल रामबाण उपाय आहे.