हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशात बटाट्याचे उत्पादन हे प्रामुख्याने भाजीसाठी केले जाते. याशिवाय चिप्स, फ्रेंच फ्राईज, बिस्कीट तसेच इतर काही पदार्थांसाठीही बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. पौष्टिक घटकांसाठी बटाटा अत्यंत उपयुक्त मानला जातो. यामध्ये स्टार्च, जैविक प्रथिने, सोडा, पोटॅश, जीवनसत्व अ आणि ड मोठ्या प्रमाणात मिळतात. ज्यांची मानवी शरीराला आवश्यकता असते. त्यामुळे बटाट्याची शेती तशी लाभदायकच ठरते. बटाट्याची वाढ २० अंश सेल्सियस तापमानात अधिक होते. तापमान वाढीसोबत वाढही कमी होते. देशातील विविध भागांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रदेशात वर्षभर बटाट्याची शेती करता येते. क्षारयुक्त जमीन सोडून इतर सर्व क्षेत्रात याची शेती करता येते. त्यातही जीवांशयुक्त मातीची जमीन सर्वोत्तम मानली जाते.
बटाट्याचे अनेक प्रगत वाण आहेत. कुफरी ख्याती, कुफरी सूर्या, कुफरी पुखराज, कुफरी अशोका, चंदरमुखी, कुफरी अलंकार, जवाहर हे वाण ८० ते १०० दिवसात पिकतात. कुफरी सतलुज, कुफरी चिप्सोना- 1, कुफरी बादशाह, कुफरी बहार ,कुफरी लालिमा, कुफरी चिप्सोना- 3, कुफरी ज्योति, कुफरी चिप्सोना- 4, कुफरी सदाबहार या वाणांना पिकण्यासाठी ९० ते ११० दिवस लागतात. तर कुफरी सिंधुरी, कुफरी फ़्राईसोना आणि कुफरी बादशाह या वाणांना पिकायला सर्वाधिक ११० ते १२० दिवस लागतात. कुफरी सतुलज (जे आई 5857), कुफरी जवाहर (जे एच- 222), 4486- ई, जे एफ- 5106 आदि. संकरित वाण आहेत तर अपटूडेट, क्रेग्स डिफाइन्स और प्रेसिडेंट हे परदेशी वाण आहेत.
बटाटे हे कंद आहे जे जमिनीच्या आत तयार होते. म्हणून माती भुसभुशीत करून घेणे गरजेचे असते. आणि पेरणीच्या वेळी माती ओलसर असावी याची काळजी घेणे गरजेचे असते. शेतकरी मका-बटाटा-गहू, मका-बटाटा-मका, भेंडी-बटाटा-कांदा, असे पीक घेऊ शकतात. वर्षभरात ३ वेळा बटाट्याचे तीनवेळा पीक घेता येउ शकते. बटाट्याचे सुरुवातीचे पीक सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या पहिल्या आठ्वड्यापर्यंत घेता येऊ शकते. तर मुख्य पीक ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून नोव्हेंबर च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत घेता येवू शकते. तर वसंत ऋतूतील पिक हे २५ डिसेंबर ते १० जानेवारीच्या दरम्यान घेता येते.
या शेतीत बियाणाला खूप महत्व आहे कारण उत्पादनाच्या एकूण खर्चापैकी ४०-५०% खर्च हा बियाणांवर होतो. बियाणांची मात्रा ही वाण, आकार आणि पेरणीचे अंतर तसेच जमीन यावर ठरते. बटाट्याच्या सेंद्रिय शेतीसाठी, बीजोत्पादित आणि मातीमुळे होणारे रोग टाळण्यासाठी बीज अंकुरलेल्या आणि ट्रायकोडर्मा विरिडि प्रति १० लिटरपाण्यात ५० ग्रॅम द्रावणानुसार 15 ते 20 मिनिटे भिजवावे. तसेच पेरणीपूर्वी सावलीत वाळवावे. परंतु ट्रायकोडर्मा क्षारीय मातीसाठी उपयुक्त नाही हे माहित असणे आवश्यक आहे. बीज पेरणी करत असताना समतल जमिनीवर पेरणी करावी, त्यानंतर त्यावर माती चढवावी तसेच वेळोवेळी सिंचन ही करावे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’