हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजही अनेकदा आपल्याकडे अचानक विज जाण्याची समस्या आहे. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजणांच्या घरी इन्व्हर्टर किंवा जनेरेटर बसवलेले असतील ज्याद्वारे अचानक वीज गेल्यानंतरही घरातील विजेवर आधारित उपकरणे चालू राहतात. याच पद्धतीने आता तुम्ही प्रवासात आणि आपल्या घरी सुद्धा विजेचा पुरवठा कायम ठेऊ शकता त्यासाठी Blackview या कंपनीने OSCAL PowerMax 3600 बनवली आहे. या पॉवर बँकेची खास गोष्ट म्हणजे ती पोर्टेबल आहे, म्हणजेच तुम्ही ती तुमच्यासोबत कुठेही नेऊ शकता. याची सूटकेस ट्रॉलीसारखे डिझाइन केले आहे आणि त्याला चाके देखील आहेत. तुम्ही फक्त १ तास जरी या पॉवर बॅंकचे चार्जिंग केलं तरी संपूर्ण महिना तुमच्या घरात लाईट लागेल.
OSCAL PowerMax 3600 ही पॉवरबँक तुम्ही तुमच्या लांबच्या प्रवासाठी तसेच महत्वाचे म्हणजे कॅम्पिंग करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत उपयोगी ठरू शकते व घरातल्या वापरासाठी देखील ही इन्व्हर्टर सारखी वापरता येऊ शकते. कंपनीचा दावा आहे की बॅटरी वाढवल्यानंतर ती 30 दिवसांसाठी होम बॅकअप पॉवर म्हणून वापरली जाऊ शकते. विशेषत: आपत्कालीन परिस्थितीत ही पॉवर बँक वापरणे जास्त फायदेशीर ठरेल.
या कंपनीने दिलेल्या माहिती नुसार OSCAL PowerMax 3600 पॉवरबँकमध्ये एकूण 15 बॅटरी पॅक असून ज्याद्वारे त्याची क्षमता 3.6 kWh वरून 57.6 kWh पर्यंत वाढवता येते. पुर्ण बॅटरी पॅक चार्जिंग होण्यासाठी फक्त 1.2 तासाचा वेळ लागतो असा बॅटरी पॅक बनवणाऱ्या कंपनीचा दावा आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार एकदा चार्जिंग केल्यानंतर हा बॅटरी पॅक 30 दिवसापर्यंत बॅकअप देऊ शकतो. या बॅटरीच्या माध्यमातून तुम्ही केवळ स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट आणि इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सच चार्ज करणार नाही तर त्यावर हाय पॉवर होम अप्लायन्सेसही चार्ज करता येतील.
या पॉवर बँकमध्ये एकूण 14 आउटपुट पोर्ट आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमचे गॅजेट्स आणि घरगुती उपकरणे कनेक्ट करू शकता. इतके उत्तम फिचर असलेली बॅटरीची किंमत देखील आभाळाला भिडणारी आहे. ही बॅटरी तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर फक्त 1.49 लाख रुपयांना विकत मिळू शकणार आहे. कंपनी बॅटरीपॅक साठी 25 वर्षे बॅटरी खराब होणार नाही याची शाश्वत्ती देते.