आश्चर्य! उस्मानाबादमध्ये लोकसभा निवडणुकीवर लागली अशी हि पैज

0
72
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीचे दुसऱ्याटप्प्याचे मतदान गुरुवारी १८ एप्रिल रोजी पार पडले. या टप्प्यात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदान देखील पार पडले आहे. मतदान पार पडल्या नंतर ओमराजे निंबाळकरच निवडून येतील असा दावा सांगत एका व्यक्तीने चक्क दुचाकी गाडीचं पैजेच्या करारनाम्यात लिहून दिले आहे. हा करारनामा लेखी स्वरुपात स्टॅम्प पेपरवर बनवण्यात आला आहे त्यामुळे या पैजेचे गांभीर्य अधिक आहे.

शंकर विठ्ठल मोरे यांनी आपली एम एच २५ /ए.सी. ३२३९ हि दुचाकी बाजीराव विष्णू करवर यांना लिहून दिली आहे. २३ मे २०१९ रोजी होणाऱ्या निकालात ओमराजे निंबाळकर निवडून आले तर बाजीराव करवर यांनी आपली दुचाकी शंकर मोरे यांना द्यायची. तसेच ओमराजे निंबाळकर यांचा या निवडणुकीत पराभव झाला तर शंकर मोरे यांनी आपली दुचाकी बाजीराव करवर यांना द्यायची असा हा करारनामा आहे. या करार नाम्याची चर्चा संपूर्ण उस्मानाबाद मतदारसंघात लागली असून निवडणुकीच्या निकालाची उत्कटता अधिकच वाढली आहे.

Untitled design

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे  ओमराजे निंबाळकर यांच्यात लढत होत आहे. उस्मानाबाद मतदारसंघाची निवडणूक अटीतटीची झाली असली तरी मतदार शिवसेनेकडे झुकल्याचे राजकीय जाणकारांनी म्हणले आहे.  त्यामुळे उस्मानाबाद मतदारसंघात काय निकाल लागतो याकडे करारकर्त्या बरोबर सर्वच मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here