हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्जेटिनाचे महान फुटबॉल खेळाडू दिएगो मॅराडोना यांनी कोरोनाव्हायरसच्या या कठीण काळात चाहत्यांसाठी काही खास संदेश पाठवले आहेत. १९८६ फुटबॉल विश्वचषक विजेत्या अर्जेंटिनाचा संघाचे सदस्य असलेले मॅराडोना सध्या अर्जेंटिनाचा फर्स्ट डिवीजन क्लब गिमनेसिया ला प्लाताचे प्रशिक्षक आहेत.त्यांनी आपल्या देशवासियांना निरोगी आणि सकारात्मक होण्यास सांगितले आहे.
मॅराडोना सोशल मीडियावर म्हणाले, “मला इस्टरच्या निमित्ताने प्रत्येकाचे, विशेषत: अर्जेंटिना आणि गिमनेसियाच्या चाहत्यांचे अभिनंदन करायचे आहे.”
ते म्हणाले, “मला आशा आहे की ही परिस्थिती लवकरच संपुष्टात येईल.त्यामुळे घरीच रहा आणि स्वतःची काळजी घ्या.”
कोरोनाव्हायरसमुळे अर्जेंटिनामध्ये सर्व प्रकारचे फुटबॉल सामने हे पुढे ढकलण्यात आले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.