…अन्यथा 22 ला बाजारपेठ बंद; व्यापाऱ्यांचा मनपाला ईशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या गुलमंडी ते पैठणगेट या मार्गावर दोन्ही बाजूला फेरीवाल्यांच्या हातगाड्या लावण्यावरून व्यापारी आणि फेरीवाल्यांना मध्ये घमासान युद्ध सुरू असल्याचे दिसत आहे. फेरीवाल्यांच्या हातगाड्या हटवण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी 22 नोव्हेंबरला बाजार पेठ बंदची हाक दिली आहे, तर व्यापाऱ्यांच्या विरोधात 24 नोव्हेंबर रोजी फेरीवाल्यांनी बंद पुकारला आहे. हा प्रश्न आगामी काळात आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

पैठण गेट गुलमंडी हा मार्ग फेरीवाल्यांनी व्यापला असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला हातगाड्यांची रांग उभी असते. फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवावे यासाठी व्यापारी असोसिएशनने वारंवार निवेदने दिली. पण त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. मनपा प्रशासनाने वाढती रहदारी लक्षात घेऊन हा भाग नो हॉकर्स झोन जाहीर केला आहे. पण या फेरीवाल्यांवर मनपाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. फेरीवाल्यांवर कारवाई न केल्यास 22 नोव्हेंबरला बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा व्यापारी असोसिएशनने दिला आहे. पैठण गेट गुलमंडी हा बाजारपेठेतील मुख्य भाग आहे. दोन्ही बाजूला दुकाने आहेत. तेथेच फेरीवाले आपल्या गाड्या लावून व्यवसाय करतात. आधीच अरुंद असणाऱ्या रस्त्यावर दुकानात येणाऱ्या ग्राहकांना वाहनेही पार्क करता येत नाही. सम-विषम पार्किंग नावालाच उरले आहे. याचा परिणाम आपल्या व्यवसायावर होत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.

तोच दुसरीकडे व्यापाऱ्यांनी फेरीवाल्यांच्या विरोधात आवाज उठवतात फेरीवाले ही आक्रमक झाले आहेत. आज शेकडो फेरीवाले आपला उदरनिर्वाह करत असताना काही व्यापारी दबाव आणून फेरीवाल्यांच्या व्यवसायावर गदा आणत आहेत. त्यांच्या दडपशाहीला मनपा व पोलिसांनी बळी पडू नये, यासाठी 24 नोव्हेंबर रोजी बंदचा इशारा भगतसिंग पथ विक्रेता संघटनेने दिला आहे.

Leave a Comment