हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ott Release This Week) थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणारे प्रेक्षक आता घरबसल्या मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सक्रिय दिसतात. त्यामुळे डिजिटल ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील अनेक सिनेमे, नाटक, वेब सीरिज कायम प्रदर्शित होताना दिसतात. गेल्या काही काळात ओटीटीकडे प्रेक्षकांचा कल चांगलाच वाढलेला दिसलाय. दरम्यान ‘शैतान’, ‘हीरामंडी’ यांसारखे जबरदस्त सिनेमा या आठवड्यात ओटीटीवर आले. ज्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. यानंतर आता आणखी काही कॉमेडी, हॉरर, ॲक्शन आणि रोमँटिक ड्रामा असलेल्या कलाकृती रिलीज होणार आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेऊया.
1. ऑल ऑफ अस स्ट्रेंजर्स
ऑल ऑफ अस स्ट्रेंजर्स हा चित्रपट ८ मे २०२४ रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार या डिजिटल ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
2. द फाइनल अटॅक ऑन वेम्ब्ले (Ott Release This Week)
द फाइनल अटॅक ऑन वेम्ब्ले ही एक सिरीज आहे. जी फुटबॉलवर आधारित आहे. ही सीरिज ८ मे २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होते आहे.
3. मॅक्सटन हॉल-द वर्ल्ड बिटविन अस
मॅक्सटन हॉल-द वर्ल्ड बिटविन अस ही मोना केस्टनच्या ‘सेव्ह मी’ या सर्वाधिक विक्री झालेल्या कादंबरीवर आधारित सिरीज आहे. ‘मॅक्सटन हॉल’ची कथा लव्ह-हेट रिलेशनशिपवर आधारलेला हा ड्रामा प्राइम व्हिडिओवर ९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
4. आवेशम
‘आवेशम’ हा एक मल्याळम विनोदी चित्रपट आहे. (Ott Release This Week) या चित्रपटाची कथा तीन तरुणांभोवती फिरते. जे बंगळुरूला येतात आणि त्यांचं भांडण होतं. त्यानंतर त्यांची मैत्री एका गँगस्टरशी होते. हा चित्रपट ९ मे रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होत आहे. .
5. अनदेखी सीझन ३
‘अनदेखी ३’ ही सोनी लिव्हवरील सर्वात लोकप्रिय सीरिज आहे. जिचे आधीचे २ सीजन हिट ठरले होते. नंदिश संधू, हर्ष छाया यांच्या या सिरींजचा तिसरा भाग आता १० मे रोजी प्रदर्शित होतोय. (Ott Release This Week) हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, मराठी आणि बंगाली भाषेत ही सिरीज येणार असून यामध्ये दिव्येंदू भट्टाचार्य, सूर्या शर्मा, हर्ष छाया, आंचल सिंग, अंकुर राठी आणि अभिषेक चौहान यांच्या भूमिका आहेत.
6. आदुजीविथम– द गोट लाइफ
‘आदुजीविथम – द गोट लाइफ’ हा एक मल्याळम सर्व्हायव्हल ड्रामा आहे. जो बेंजामिनच्या ‘आदुजीविथम’ कादंबरीवर आधारलेला आहे. यात सौदी अरेबियामध्ये मेंढपाळ म्हणून गुलाम बनवलेल्या मल्याळी मजूर नजीबची जीवनगाथा दाखवली आहे. (Ott Release This Week) ही एक सत्यकथा असून यात पृथ्वीराज सुकुमारन, जिमी जीन-लुईस आणि केआर गोकुळ, तालिब अल बलुशी, रिक ॲबे, अमाला पॉल आणि शोभा मोहन यांच्या भूमिका आहेत. हा सिनेमा १० मे रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर येत आहे.
7. 8 एएम मेट्रो
8 एएम मेट्रो ही एक लव्हस्टोरी आहे. जी सिनेमाच्या माध्यमातून १० मे रोजी झी ५ वर रिलीज होतेय. यात गुलशन देवैया व सैयामी खेर मुख्य भूमिकेत आहेत.
8. मर्डर इन माहिम
‘मर्डर इन माहिम’ ही फिजियोलॉजिकल क्राइम थ्रिलर सीरिज आहे. ज्यामध्ये आशुतोष राणा व विजय राज मुख्य भूमिकेत तर शिवानी रघुवंशी व शिवाजी साटमदेखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. ही सीरिज १० मे रोजी जिओ सिनेमावर रिलीज होत आहे.
9. डॉक्टर हू
डॉक्टर हू ही एका डॉक्टराची गोष्ट आहे. जो अंतराळात प्रवास करतोय. हा चित्रपट ११ मे २०२४ रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येईल. (Ott Release This Week)
10. योद्धा
थिएटरमध्ये २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेला ‘योद्धा’ हा चित्रपट १५ मे २०२४ रोजी प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे. यात सिद्धार्थ मल्होत्रा, राशी खन्ना आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहेत.