बँक उध्वस्त होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न – आ.हरिभाऊ बागडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हा बँक आणि लातूर येथील बँक नफ्यात आहेत. पारदर्शक पद्धतीने कारभार केल्यामुळे बँक चांगल्या स्थितीत आहेत. सहकार क्षेत्र टिकवण्यासाठी राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवत आम्ही काम करत आहोत. सहकारक्षेत्र उध्वस्त होऊ नये बँक वाचवण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय संचालक कार्यरत असल्याचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आमदार हरिभाऊ बागडे, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह शेतकरी विकास पॅनल ची स्थापना करण्यात आली. उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली दरम्यान बुधवारी माजी आमदारांचे सर्वपक्षीय पॅनल जाहीर करण्यात आले त्या वेळी आमदार राज्यमंत्री ऐवजी सर्वसामान्यांना संधी द्यावी असा आरोप विरोधकांनतर्फे करण्यात आला होता. त्यावर हरिभाऊ बागडे म्हणाले की आम्ही चाळीस वर्षापासून काम करत आहोत आरोप करणाऱ्यांनी किती व कोणत्या संस्था काढल्या त्याचे उत्तर द्यावे असा टोलाही त्यांनी लगावला.

बँकेचा पारदर्शक कारभार यापुढेही चालत राहावा यासाठी आम्ही शेतकरी विकास पॅनलची स्थापना केली असून त्या माध्यमातून निवडणूक लढवत आहोत. आम्हालाच येशील शेतकरी विकास पॅनल कडून पुन्हा माजी आमदार नितीन पाटील यांना चेअरमन करण्याची अनेकांची इच्छा असल्याचेही बागडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस आमदार अंबादास दानवे, नितीन पाटील, अभिजित देशमुख, अण्णासाहेब माने, अंकुश रंधे, दामोदर नवपुते आदींची उपस्थित होते.

बँक ही पवित्र मंदिराप्रमाणे आहे यामुळे येथे जात-पात न पाहता आम्हाला पॅनल बनवायचे होते. यासाठी आम्ही मित्रपक्षाला चर्चेसाठी बोलावले होते. मात्र कोणीच आले नाहीत.यामुळे जे सोबत आले त्यांना घेऊन पॅनल जाहीर करावे लागले. असे बागडे यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment