हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रावण महिना आला की गणपतीरायाच्या आगमनाची तयारी सुरू करण्यात होते. गणपती मंडळे उभारणे, आरास तयार करणे, ढोल ताशा पथकांची प्रॅक्टिस सुरू होणे, तसेच गणपतीच्या मुर्त्या बनवणे अशा कित्येक कामांसाठी गणेश भक्त जोर धरतात. यावर्षी देखील गणेश भक्तांमध्ये हाच जोर दिसून येत आहे. मुख्य म्हणजे, यावर्षी गणपती बाप्पा वर अनेक गाणी रिलीज होताना दिसत आहेत. यामध्येच एक खास गाणं जास्त चर्चेत आलं आहे. सध्या “आमच्या पप्पांनी गणपती आणला…” गाण्याने सर्वांनाच वेड लागल आहे. सोशल मीडियावर एका चिमुकल्याच हे गाणं जोरदार व्हायरल झालं आहे.
https://www.instagram.com/reel/CweNlrSqCeS/?igshid=MzRlODBiNWFlZA==
सोशल मीडियावर रिल्स व्हायरल
गणपती बाप्पाची अजून स्थापना देखील झाली नसताना हे गाणं सर्वांच्या फोनमध्ये वाजत आहे. त्यामुळेच, गणपती आगमनाच्या काळात हे गाणं सर्वात जास्त गाजल असं म्हणल जात आहे. गेल्या एक वर्षापूर्वी आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणं माऊला प्रोडक्शनकडून रिलीज करण्यात आलं होतं. तेव्हा या गाण्याला तीन मिलीयनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं होतं. परंतु आता पुन्हा यावर्षी ही हे गाणं चर्चेत आल आहे. सोशल मीडियावर या गाण्याचे अनेक रिल्स व्हायरल झाले आहेत. यातलं एक खास रिल्स म्हणजे एका शाळेतील मुलाचं आहे. ज्यामध्ये एक लहान मुलगा शाळेतील गणवेशात या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
इंस्टाग्राम या सोशल प्लॅटफॉर्मवर साईराज गणेश केंद्रे अकाउंटवरून एका लहान मुलाचा “आमच्या पप्पांनी गणपती आणला” या गाण्यावरील व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला तब्बल 32 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यावरील लहान मुलाचे एक्स्प्रेशन बघून सर्वानाच त्यांचे कौतुक वाटतं आहे. अनेकांनी या लहान मुलाचा व्हिडिओ वेगवेगळ्या अकाउंट वरून शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडिओ लोकांना आवडल्यामुळे अनेकांकडून त्याचे विशेष कौतुक केले जात आहे. या लहान मुलामुळेच “आमच्या पप्पांनी गणपती आणला” हे गाणं चर्चेत आलं आहे. त्यामुळे आता गणेशोत्सवाच्या काळात देखील हे गाणं सर्वत्र गाजलं यात काही शंका नाही.