मुंबई । देशात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्णांची महाराष्ट्रात आहे. तर राज्यातील एकूण रुग्णांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण मुंबईत आहेत. करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मुंबईत सर्वाधिक आहे. तर त्या पाठोपाठ पुण्याचा क्रमांक आहे. मात्र, मुंबई पुण्याबरोबरच केंद्र सरकारनं राज्यातील ११ जिल्ह्यांचा समावेश हॉटस्पॉटच्या यादीत केला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, अहमदनगर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलडाणा, मुंबई उपनगर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश हॉटस्पॉटच्या यादीत करण्यात आलेला आहे
कोरोनाचा प्रादुर्भावाच प्रमाण लक्षात घेऊन देशातील जिल्ह्यांचे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. पहिल्या प्रकारात हॉटस्पॉट जिल्हे, दुसऱ्या प्रकारात हॉटस्पॉट नसलेले पण तिथे करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत असे जिल्हे आणि तिसरा प्रकार म्हणजे ग्रीन झोन जिल्हे या जिल्ह्यांमध्ये एकही करोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही, असे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार देशात जवळपास १७० जिल्हे हॉटस्पॉट तर २०७ जिल्हे हॉटस्पॉट नसलेले जिल्हे आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”