व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

संतापजनक : गर्भवती वनरक्षक महिलेस माजी सरपंचाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा तालुक्यातील पळसवडे गावचे सरपंचाने वनरक्षक महिला कर्मचाऱ्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे‌ यामध्ये वन विभागाच्या महिला कर्मचारी या तीन महिन्याच्या गर्भवती असून त्यांना मारहाण केल्याची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती स्वतः कर्मचाऱ्यांनी दिली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला 3 महिन्यांची गर्भवती आहे.

मला न विचारता वन मजूर दुसरीकडे का नेले या कारणातून चिडून जाऊन वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी मारहाण केली आहे.

मारहाण करणाऱ्या सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलिसांत ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मारहाणीच्या घटनेने वन विभागात आणि जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.