नवी दिल्ली । बहुतेक लोकं स्वतःचे घर घेण्यासाठी बँकांकडून होमलोन घेण्यास प्राधान्य देतात. यामध्ये मोठी रक्कम उपलब्ध असल्याने आणि त्याची परतफेड करण्यासही बराच कालावधी मिळत असल्याने फारसा बोझा पडत नाही. आजकाल अनेक बँकांनी ओव्हरड्राफ्टची सुविधाही देऊ केली आहे.
वास्तविक, होमलोनवरील ओव्हरड्राफ्टची सुविधा म्हणजे कर्जदाराच्या हातात एक प्रकारे अतिरिक्त रक्कम देणे होय. जर तुम्ही देखील होमलोन घेतले असेल आणि तुम्हाला अल्प कालावधीसाठी आणखी काही आर्थिक मदत हवी असेल तर तुम्ही बँकेत ओव्हरड्राफ्टसाठी अर्ज करू शकता. मात्र, या सुविधेचा लाभ घेण्यापूर्वी काही बेसिक गोष्टी जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
जास्त व्याजदर हे ओझे बनू नये
होमलोनवरील अल्प मुदतीच्या क्रेडिटच्या स्वरूपात बँकांद्वारे ऑफर केलेल्या ओव्हरड्राफ्टच्या सुविधेवर सामान्य दरापेक्षा जास्त व्याजदर असतो. हे तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत तर पैसे देते मात्र ते तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे ओव्हरड्राफ्टची किंमत किती असेल हे आधी बँकेकडून जाणून घेतले पाहिजे. या सुविधेचा लाभ घेताना होमलोन घेणाऱ्यांनी त्याचे फायदे आणि तोटे समजून घेतले पाहिजेत.
फ्लेक्सिबल री-पेमेंट
बँका अशा कर्जदारांना ही सुविधा देतात, जे त्यांचे उत्पन्न वाढल्यावर EMI ची रक्कम देखील वाढवतात. तुम्ही तुमच्या खात्यात टाकलेले अतिरिक्त पैसे तुमचे एकूण थकित मुद्दल आणि व्याज कमी करतात. होमलोनचे री-पेमेंट लवकर करण्याची ही पद्धत दीर्घकाळासाठी पैसे वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
गरज पडेल तेव्हा लगेच पैसे मिळतील
होमलोन मधील ओव्हरड्राफ्टची ही सुविधा प्री अप्रुव्हड लोन सारखीच असते, जिथे तुम्हाला आवश्यक असलेले पैसे लगेच मिळतात. यामध्ये देखील तुम्ही वापरलेल्या रकमेवरच व्याज भरावे लागेल. उदाहरणार्थ, जर बँक तुम्हाला 5 लाख ओव्हरड्राफ्टची सुविधा देत असेल आणि तुम्ही फक्त 2 लाख रुपये खर्च केले, तर तुम्हाला त्याच दोन लाख रुपयांचे व्याज द्यावे लागेल.
सुविधेचा लाभ घेण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
या सुविधेचा योग्य वापर केल्यास, तुम्ही तुमच्या होमलोनच्या प्रीपेमेंटसाठी अतिरिक्त पैसे वापरू शकता. हे तुम्हाला प्री-पेमेंट दंडापासून देखील वाचवेल. यावर बँका नियमित होमलोनपेक्षा 0.60 टक्के जास्त व्याज आकारतात. ज्या लोकांकडे जास्तीची रक्कम आहे त्यांच्यासाठी ही सुविधा जास्त चांगली आहे.