देशाला  चौकीदाराची नाही; मर्द पहारेकरीची गरज -असदुद्दीन ओवेसी

0
37
owesi
owesi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
मुंबई प्रतिनिधी । ‘देशाला  चौकीदाराची नाही मर्द पहारेकरीची गरज आहे, जो संविधानाचे रक्षण करेल आणि  बाबासाहेब आंबेडकर  यांचे स्वप्न पूर्ण करेल’  अशी जोरदार टीका खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी  कल्याण येथे आयोजित  बहुजन वंचित आघाडीच्या महाअधिवेशनात  काँग्रेस व भाजपावर  केली.
राहुल गांधी सध्याच्या चौकीदाराला चोर म्हणतात मात्र ते सुद्धा त्यातीलच एक आहेत.आतापर्यंत बनलेले सर्व चौकीदार चोर आहेत. भिमा-कोरेगाव हा दलितांचा विजय आहे, महारांनी पेशव्यांना हरवलेले आहे, हे लोक का मान्य करत नाही…? अशा  अनेक प्रश्नांची सरबत्ती त्यांनी ह्या सभेत उपस्थितांना  विचाराला.
रामदास आठवले यांचं नाव न घेता त्यांनी सवर्णांच्या १०% आरक्षणाच्या वेळेस तुमचा एक केंद्रीय मंत्री मोदी यांची चमचेगिरी करत होता, अशी अप्रत्यक्षपणे आठवले यांच्या वर टीका केली. या सभेला कोळी बांधवांची मोठ्या प्रमाणात  उपस्थिती असल्यामुळे ओवेसी यांनी कोळी बांधवांची पारंपरिक टोपी परिधान करून भाषण केले. या सभेला प्रकाश आंबेडकर व अन्य आघाडीतील नेते उपस्थित होते. 
इतर महत्वाचे –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here