गोकुळ उभारणार ऑक्सिजन प्लॅन्ट : सतेज पाटलांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्व राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूधसंघ निवडणुकीत अनेक आश्वासने इच्छुक उमेदवारांच्या पक्षांनी दिली. या निवडणुकीत कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील गटाने विजय मिळवला. त्यानंतर पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघ ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणार असल्याची घोषणा शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

कोल्हापूर येथे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी शुक्रवारी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघावर विजय मिळवल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाचा प्रश्न असलेल्या ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याबाबत आज नूतन संचालकांसोबत बैठक झाली. त्यामध्ये निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर दोन रुपये दूध दरवाढ देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहणार आहे. दोन महिन्यांच्या अवधीत दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहे. किमान दोन संचालक गोकूळच्या दूध रोज मुख्य कार्यालयात उत्पादकांना भेटणार असल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक माजी खासदार-भाजप नेते धनंजय महाडिक यांच्यात जोरात लढत झाली होती. शेवटी गोकुळ दूधसंघातील महादवेराव महाडिक गटाच्या तब्बल तीन दशाकाच्या सत्तेला सतेज पाटील गटाने शेवटी सुरुंग लावला. येथे एकूण 21 जागांपैकी तब्बल 17 जागांवर सतेज पाटील गटाचे उमेदवार निवडून आले. आता प्रत्यक्ष सत्ता हातात आल्यानंतर ती पूर्ण करण्याचे आश्वासन देत गोकुळ संघ ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणार असल्याची पहिली घोषणा सतेज पाटील शुक्रवारी यांनी केली.