ऑक्सिजन प्लँट कोरोना रुग्णांसाठी दिलादायक ठरेल : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

0
82
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा : सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात नव्याने ऑक्सिजन निर्मिती प्लँट उभारण्यात आलेला आहे. या प्लँटचे सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवडा जाणवला. केंद्र शासनाच्या योजनेतून स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात ऑक्सिजन प्लँट बसविण्यात आला आहे. या प्लँटमधून तयार होणारा ऑक्सिजन हा रुग्णालयापर्यंत पोहविण्याची व्यवस्था करण्यात आली, यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे विश्वास पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे.

सातारा येथील जिल्हा रुग्णालयात पार पडलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्लँटच्या उद्घाटन कार्यक्रमास जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर दराडे, उपअभियंता राहूल अहिरे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी ऑक्सिजन प्लँट उभे करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीकडून ऑक्सिजन निर्मितीची माहिती घेतली.

यावेळी मंत्री पाटील म्हणाले कि, स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयासह 19 ठिकाणी ऑक्सिजन निर्मितीचे प्लँट उभे करण्यात आले आहे. या प्लँटचा विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये म्हणून कुपर कार्पोरेशन प्रा.लि. व कमिन्स कपंनी यांनी नाममात्र किंमतीत 19 जनरेटर दिले आहेत. ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पांमुळे ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here