सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध ग्रामीण रुग्णालयातील करोना कक्षातील ऑक्सिजन पुरवठा मध्ये अचानक बिघाड निर्माण झाला होता. ऑक्सिजन बिघाडामुळे तातडीने येथील 15 रूग्णांना इतरत्र हलविण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे नातेवाईक रात्रभर चिंतेत असल्याचे पहायला मिळाले.
खटाव तालुक्यातील औंध रूग्णालयात रात्री उशिरा ऑक्सिजन पुरवठ्यात बिघाड झाल्याचे तेथील कर्मचाऱ्यांत लक्षात आले. सुदैवाने व्यवस्थापनाने पर्यायी व्यवस्था तातडीने उपलब्ध केली आहे. ग्रामीण रूग्णालयात असलेले 15 रूग्णांना हलविण्यात आले. त्यामध्ये वडूज ग्रामीण रूग्णालयात 2, जयश्री हॉस्पिटल वडूज येथे 8, मायणी मेडीकल काॅलेज येथे 5 रूग्णांना हलवले आहे.
https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/2932458133740087
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत योग्य ती खबरदारी घेत असल्यानेच बिघाड लगेच लक्षात आला आहे. रूग्णांना कोणताही धोका नाही, तसेच त्यांना योग्य उपचार सध्या चालू असल्याचेही सांगण्यात आले. रात्री घडलेल्या या घटनेमुळे रूग्णांच्या नातेवाईक रात्रभर चिंतेत होते.