सांगलीत कर्नाटकातून येणारा ऑक्सिजन पुरवठा खंडीत, दुपारपर्यंत पुरेल ऐवढा ऑक्सिजन साठा शिल्लक

oxygen plant
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | कोरोनाच्या युध्दजन्य परिस्थितीत कर्नाटकातून सांगली जिल्ह्यासाठी दररोज मिळणारा 10 टन ऑक्सिजन बंद करण्यात आला आहे. कर्नाटक राज्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने ऑक्सिजन पुरवठा थांबविण्यात आला. ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने तुटवडा निर्माण होण्याची भीती असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सद्यस्थितीत शुक्रवारी दुपारपर्यंत पुरेल ऐवढा ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. त्यामुळे शासकीय आणि खासगी रुग्णालयातील डॉक्टरांची चिंता वाढली असल्याचे चित्र दिसते.

दरम्यान शासनस्तरावर पालकमंत्री ऑक्सिजन पुरवठ्याबाबत पाठपुरावा करीत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या महिन्यापासूनच ऑक्सिजन मिळवण्यासाठी शासन आणि प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करुल कर्नाटकातून मागील वीस दिवसांपासून सांगली जिल्ह्यासाठी मिळणारा दहा टन ऑक्सिजन बंद करण्यात आला आहे. कर्नाटकातील कोरोना रग्ण संख्या वाढत असल्यामुळे राज्यातून महाराष्टातील काही जिल्ह्याना होणारा ऑक्सिजन पुरवठा थांबवून तो राज्यातच वापरण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. ती मागणी मान्य झाली आहे.

यामुळे राज्यातील सांगलीसह कोल्हापूर आणि अन्य काही जिल्ह्यात ऑक्सिजनचा पन्नास ते साठ टन पुरवठा कमी होवून तुटवडा जाणवणार आहे. शासन आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सद्यस्थितीत शुक्रवारी दुपारपर्यंत पुरेल ऐवढा ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. परंतु लवकरच ऑक्सिजन उपलब्ध करण्याचे प्रयत्न चालू असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.