पी.चिदंबरम वकील म्हणून सुप्रीम कोर्टात पुन्हा हजर;सिब्बल-मनुसिंघवी यांच्या विरोधात लढणार केस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । आयएनएक्स मीडिया ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जमीन मिळाल्यानंतर पी. चिदंबरम आज सुप्रीम कोर्टात वकील म्हणून पुन्हा हजर होणार आहेत. १०६ दिवस तिहार तुरुंगात घालविल्यानंतर त्यांना जमीन मिळाला होता. त्यामुळं व्यवसायाने वकील असणाऱ्या पी. चिदंबरम यांनी पुन्हा वकील म्हणून सुप्रीम कोर्टात उभं राहणार आहेत. यासर्वांत गमतीशीर बाब म्हणजे ज्या कपिल सिब्बल आणि अभिषेक मनूसिंघवी यांनी चिदंबरम यांना जमीन मिळावा म्हणून जीवाचं रान केलं होत त्याच्याच विरोधात ते आज वकील म्हणून केस लढणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पी. चिदंबरम एका घरघुती हिंसाचार आणि घटस्फोट प्रकरणांत आपल्या अशिलासाठी केस लढवणार आहेत. तर कपिल सिब्बल आणि अभिषेक मनूसिंघवी हे केसमधील दुसऱ्या अशिलाच्या बाजूने युक्तिवाद करणार आहेत. याबातमीनंतर यातिघांतील व्यावसायिक आणि खासगी संबंधावर जोरदार चर्चा दिल्ली वर्तुळात सुरु झाली आहे.

 

Leave a Comment