हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतीप्रधान देश म्हणून भारताची ओळख आहे. या ठिकाणी शेतीबरोबर दूध व्यवसाय, शेळी पालन, कुकुट पालन असे इतर व्यवसाय जोडधंदा म्हणून शेतकरी करत असतो. आज पर्यंत भारतात गाय, म्हैस यांच्या दुधाच्या डेअऱ्या आपण पाहिलेल्या असतील. मात्र, आता चक्क गाढविणीच्या दुधाच्या विक्रीचा व्यवसाय आंध्र प्रदेशातील तीन सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणांनी सुरु केला आहे. त्यांच्याकडून गाढविणींचे पालन करत तिच्या दुधाच्या विक्री केली जात असून त्यांच्या गाढविणीचे 1 लिटर दूध तब्बल 5 ते 6 हजार रुपये किंमतीने जात आहे.
आंध्रप्रदेशातील सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचा शिक्षण झालेल्या पी व्ही. व्ही. रम्मणा या तरुणाने आपल्या इतर दोन मित्र नव्या आणि किरण कुमार या मित्रांसह एकत्रित येत नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर 2021 मध्ये या तरुणांनी 120 गाढवे विकत घेतली. राजा महिंद्र व्हरमजवळ मल्लिमपुढीमध्ये एक डॉंकी फार्म सुरु केला. त्यासाठी अगोदर त्यांनी इतर देशातील गाढवांच्या फॉर्मची माहिती घेतली.
शेती करताना त्याला जोडव्यवसाय म्हणून आपल्याला पशुपालन व्यवसाय करता येऊ शकतो. पशुपालनातून दुग्ध व्यवसाय करून त्यातून पैसे मिळवता येतात. अनेकदा चांगले दूध देणाऱ्या गाई, म्हशीं व इतर पशूंची खरेदी करता आपल्याला सदर विक्रेत्याकडे जाणे मुश्किल होते. मात्र आता थेट शेतकर्यांकडूनच चांगले दूध देणारी जनावरे खरेदी करता येणार आहेत. गुगलप्ले स्टोअरवरील Hello Krushi हे अँप इन्स्टॉल करून तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता. यासोबत आपल्याला शेतीतील इतर व्यवसायासाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या योजनांची माहिती आदी गोष्टीही Hello Krushi अँपवर पाहता येतात.
हॅलो कृषी डाउनलोड करण्यासाठी Click here…
सुरुवातीला तिघा मित्रांनी गाढव पालन व दुग्ध व्यवसायाबद्दल प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी येथील फार्मचे कामकाज पाहिले. दररोज सकाळी उठून गाढवांचे मलमूत्र, विष्टा काढायची, त्यांना आंघोळ घालायची आणि नंतर त्याना खाद्य द्यायचे. ते झाल्यानंतर त्यांचे दूध काढायचे असा त्यांनी नित्य दिनक्रम ठरवलं. त्यानुसार त्यांनी काम करण्यास सुरुवात केली.
इथिओपिया प्रजातीची गाढवे
फॉर्म सुरु करताना या ठिकाणी गाढविणीच्या कोणत्या प्रजाती कि जास्त प्रमाणात दूध देतात त्या आणायच्या, त्याच्या दुधात किती प्रमाणात पाणी टाकायचे? या सर्व गोष्टींचा मित्रांनी सुरुवातीला अभ्यास केला. इथिओपिया प्रजातीच्या सोबत अनेक दर्जेदार प्रजातीची गाढवे त्यांनी आपल्या डॉंकी फॉर्ममध्ये आणली.

सॉफ़्टवेअर इंजिनियर
रामण्णा आणि किरण हे दोघे सॉफ़्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत आहेत तर त्यांची मैत्रीण नव्या दिल्लीतील आयआयटीमध्ये पोस्ट ग्रॅजुएशन करत आहे. आज हे तिघे त्यांच्या गाढवाच्या दुधाच्या विक्रीच्या व्यवसायात खूप पैसे कमवत आहेत.

इतका आला सुरुवातीला खर्च
तिघा मित्रांनी एकत्रीत येत डॉंकी फॉर्म सुरु करण्याचा ज्यावेळी निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्यापुढे पैशांचाही प्रश्न होता. मात्र, तिघांनी तब्बल 50 लाख रुपये गोळा केले. त्यांनी डॉंकी फॉर्मची उभारणी करताना अतिशय बारीक सारीक गोष्टींचीही काळजी घेतली आहे. गाढवांच्या घाण्यापिण्यापासून ते ते राहत असणार्या फॉर्ममधील वातावरण किती अंशांपर्यंत ठेवायचे? याचीही त्यांनी काळजी घेतली आहे.

गाढवाच्या दुधाचा असाही वापर
गाढवाच्या दुधाचा अनेक ठिकाणी वापर हा केला जातोय. औषध आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये गाढवाच्या दुधाचा वापर केला जातो. खास करून संधिवात, खोकला आणि जखमांवर उपचार करण्यासाठी तयार औषधांमध्ये गाढवाचे दूध वापरले जाते. शिवाय सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठीहि दुधाचा वापर केला जातो. ते कॉस्मेटिक कंपन्या, स्पा सेंटर आणि ब्युटी पार्लर्स यांना दुधाची विक्री करतात.

अशा प्रकारे गाढवाचे दूध केले जाते विक्रीसाठी तयार
ज्यावेळी गाढवीण दूध देते. त्यावेळी सुरुवातीला तिचे दूध हे एका मोठ्या भांड्यात साठवले जाते. त्याला अगोदर उकळले जाते. त्यांना थंड केले जाते. त्यानांतर त्याची विक्री केली जाते. गाढविणीचे दूध महाग असल्यामुळे त्याची उपलब्धता कमी स्वरूपात आहे.

1 लिटर दुधाला 5 हजारापासून ते 13 हजारापर्यंत भाव
गाढविण्याच्या दुधात मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे घटक असतात. त्यामुळे हे दूध खूप महाग असते. आंध्र प्रदेशातील सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असलेल्या दोघे मित्र व त्यांच्या मैत्रिणीने सुरु केलेल्या गाढविणीच्या दुधाच्या विक्रीला चांगला दर मिळत आहे. ते एक लिटर दुधाची विक्री तब्बल पाच ते सहा हजार रूपये दराने करत आहेत.




