मुंबई । अनुष्का शर्माच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या ‘पाताल लोक’ ही वेब सीरिज सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या वेबसीरिजमुळे अनुष्कावर भापप नेत्याची प्रतिमा खराब करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी अनुष्काविरोधात तक्रार नोंदवली आहे. नंदकिशोर यांच्यामते, ‘पाताल लोक’ वेबसीरिजमधून अनुष्का पाकिस्तानची प्रतिमा सुधारू पाहत आहे. एका मुलाखतीत त्यांनी विराट कोहलीने अनुष्काला घटस्फोट द्यावा असा सल्लाही दिला आहे. त्यांच्यामते, विराट देशभक्त आहे तो देशासाठी खेळतो. पण अनुष्का मात्र पाकिस्तानची प्रतिमाा सुधारण्यात व्यग्र आहे.
आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी आरोप केला की, वेब सीरिजमध्ये त्यांचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय वापरण्यात आला. तसंच अशाप्रकारे अनुष्का सनातन धर्मातील सर्व जातींमध्ये वैर वाढवत आहे. गुर्जर म्हणाले की, ‘पाताललोक वेबसीरिजमध्ये बाळकृष्ण वाजपेयी नावाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा नेता एका रस्त्याचं उद्घाटन करत असताना माझा आणि इतर भाजप नेत्यांचा फोटो वापरण्यात आला आहे. मी भाजपचा आमदार आहे आणि माझी परवानगी घेतल्याशिवाय माझ्या फोटोचा वापर केला गेला आहे. ही वेबसीरिज राष्ट्रविरोधी कार्य करत आहे.’ असं गुर्जर म्हणणं आहे. नंदकिशोर यांनी अनुष्काने तिच्या शोमधून भारतीय जनता पार्टीची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून या शोवर बंदी घालण्याची मागणीही केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”