Wednesday, June 7, 2023

या बँकांचा बदलू शकतो अकाउंट नंबर, IFSC कोड; जाणून घ्या तुमच्यावर काय होणार परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १ एप्रिलपासून सरकारी बँका या देशातील मोठ्या बँकांमध्ये विलीन होणार आहेत, यासाठीची नोटिफिकेशन नुकतीच जारी केली गेली आहे. सरकारने हा अध्यादेश मंजूर केल्यानंतर, सुमारे १० बँकांचे ४ बँकांमध्ये विलीनीकरण केले जाईल. बँकांच्या विलीनीकरणानंतर त्याचा सर्वात जास्त परिणाम हा त्या बँकांमधील खातेदारांवर होईल कारण की, या सर्व खातेदारांचे अकाउंट नंबर, आणि IFSC कोड हे बदलले जातील.

मागील २ महिन्यांपासून बँकांच्या विलीनीकरणाचे काम सुरू आहे
सरकारी बँकांना देशातील मोठ्या बँकांमध्ये विलीन केल्यानंतर देशातील सरकारी बँकांची संख्या ही १२ वर येईल. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले की,’ या १० सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण गेल्या २ महिन्यांपासून कोणत्याही नाराजीविना सुरळीतपणे सुरू आहे. यामुळे कुठल्याही कर्मचार्‍यांच्या नोकरीवर कोणताही परिणाम होणार नाही.

या बँका विलीन होतील
प्रत्यक्षात सरकारने गेल्या वर्षीच या १० बँकांचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती. गेल्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी ‘ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक’ हे पंजाब नॅशनल बँकेत विलीन होणार असल्याचे सांगितले होते. कॅनरा बँकेचे सिंडीकेट बँकेचे विलीनीकरण होईल तर अलाहाबाद बँक ही इंडियन बँकेत विलीन होईल. याशिवाय आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक हे युनियन बँकेत विलीन होतील.

या बँकांच्या विलीनीकरणानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र पंजाब आणि सिंद बँक, यूको बँकच राहतील.

यापूर्वीही ५ बँका एसबीआयमध्ये विलीन झाल्या
यापूर्वी स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ बीकानेर,तसेच जयपूर स्टेट बँक ऑफ म्हैसूर आणि भारतीय महिला बँकेचे स्टेट बँक ऑफ हैदराबाद या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये विलीन झाल्या आहेत.

कसा होईल खातेदारांवर बँकांच्या विलीनीकरणाचा परिणाम
बँकांच्या विलीनीकरणाचा थेट परिणाम खातेदारांवर होईल, ग्राहकांना यासाठी नवीन अकाउंट नंबर व कस्टमर आईडी देता येईल. असे झाल्यास ग्राहकांना टॅक्स डिपार्टमेंट, विमा कंपन्या, म्युच्युअल फंड, राष्ट्रीय पेन्शन योजना या सर्व ठिकाणी आपला नवीन अकाउंट नंबर किंवा आयएफएससी कोड अपडेट करावा लागेल. याशिवाय SIP किंवा लोनच्या EMI साठी ग्राहकांना नवीन इंस्ट्रक्शन्स फॉलो कराव्या लागतील. तिथेच नवीन चेकबुक, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड इश्यू होऊ शकते.

या बदलांशिवाय फिक्स डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट वरील व्याज दरात कोणताही बदल होणार नाही. पूर्वी होम लोन, पर्सनल लोन इत्यादींसाठी दिले गेलेल्या व्याजदरामध्येही बदल होणार नाही. अशा परिस्थितीत, बँकेच्या काही शाखा बंद केल्या जाऊ शकतात, त्यामुळे ग्राहकांना नवीन शाखांमध्ये जाण्याची आवश्यकता असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.