जॉनच्या पागलपंतीवर प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । जॉन अब्राहमचा मल्टिस्टारर चित्रपट पागलपंती शुक्रवारी दि. २२ नोव्हेंबरला रिलीज झाला आहे. या विनोदी चित्रपटात खूप मजा आणि वेड दर्शविले गेले आहे. चित्रपटाविषयी मात्र प्रेक्षकांच्या मिक्स प्रतिक्रिया येत आहेत. पागलपंतीचा ट्रेलर पाहून चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्साही झाले होते. पण चित्रपट पाहिल्यानंतर काही जण खुश झाले तर काही जण मात्र निराश झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जणांनी आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे . तर अभिनेत्यांच्या कॉमिक पंचचे सोशल मीडियावरील चाहते कौतुक करीत आहेत.

Pagalpanti Trailer - Anil, John, Ileana, Arshad, Urvashi, Pulkit, Kriti | Anees | Releasing 22 Nov

दुसरीकडे, बरेच चाहते असे म्हणतात की, या चित्रपटाची कहाणी बेस लेस आहे. तथापि, चित्रपटाच्या स्टारकास्टचे, विशेषत: जॉन अब्राहमचे कौतुक होत आहे. या चित्रपटात जॉनबरोबर अनिल कपूर, अरशद वारसी, पुलकित सम्राट आणि सौरभ शुक्ला यांनी काम केले आहे. दुसरीकडे कृती खरबंदा, उर्वशी रौतेला आणि इलियाना डिक्रूझ ग्लॅमरस अवतारात दिसत आहेत. या वीकेंडमध्ये आता हा चित्रपट काय कमाल करतो हे समजेलच .

Leave a Comment