Saturday, December 6, 2025
Home Blog Page 13

नवरात्रीच्या काळात साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनासाठी सुरू होणार नवीन बससेवा

Navratri Special Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यावर्षी नवरात्र २२ सप्टेंबरपासून सुरू होणार असून २ ऑक्टोबर रोजी संपेल. नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय शुभ आणि पवित्र मानले जातात. या दिवसांत अनेक भाविक महाराष्ट्रातील साडेतील शक्तीपिठांचे दर्शन घेत असतात. आणि देवीकडे साकडं मागत असतात. तुम्हीही यंदा साडेतीन शक्तिपीठांना भेट देण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी हि बातमी खूप महत्वाची आहे. कारण नवरात्रीच्या काळात साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनासाठी नवीन बससेवा सुरु होणार आहे. हि बस सेवा पुण्यातून सुरु होणार असल्याने पुणेकरांना याचा विशेष लाभ मिळणार आहे.

कधी आणि कुठून होणार नवरात्री बस सेवा –

कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी व वणीची सप्तशृंगी देवी अशा साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन घडवून आणणारी बससेवा 27 सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड आगारातून सुटणार आहे. हि बस पहिल्या दिवशी कोल्हापूरला जाईल. त्याठिकाणी तुम्ही अंबाबाईचे दर्शन घेऊ शकता. अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर तेथून ही बस तुळजापूरला जाईल.. तुळजापुरात तुम्हाला तुळजाभवानीचे आशीर्वाद घेता येथील. तुळजापूरातच तुमचा मुक्काम असेल.

पुढे दुसऱ्या दिवशी ही गाडी माहूरला जाणार आहे. त्याठिकाणी रेणुका मातेचे दर्शन झाल्यानंतर माहूरलाच या बसचा मुक्काम राहणार आहे. तिसऱ्या दिवशी ही विशेष बस नाशिक जिल्ह्यातील वणी येथे जाणार आहे. वणी येथे सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले आणि आणि मग बसचा परतीचा प्रवास सुरू होईल. पुन्हा हि बस पिंपरी चिंचवड आगारात येईल.

पिंपरी चिंचवड आगाराच्या स्थानक प्रमुख वैशाली कांबळे यांनी हि माहिती दिली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाविकांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग ची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्हालाही साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनासाठी जायचे असेल तर तुम्ही या गाडीने नवरात्र उत्सवाच्या काळात राज्यातील तीनही शक्तीपीठांना भेटी देऊन दर्शन घेऊ शकता. आणि देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊ शकता.

Free Toll To Electric Vehicles : आता 100 टक्के टोल माफी; सरकारची सर्वात मोठी घोषणा

Free Toll To Electric Vehicles

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Free Toll To Electric Vehicles । महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी सर्वात आनंदाची बातमी आहे. ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी २०२५’ अंतर्गत राज्यातील प्रमुख महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना १००% टोलमाफी देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाबाबत माहिती देताना म्हंटल कि, सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रिक गाड्यांना चालना मिळेल आणि पर्यावरणाचे संरक्षण सुद्धा होईल. या योजनेत M2, M3 आणि M6 श्रेणीतील चारचाकी इलेक्ट्रिक वाहने, तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या व खासगी कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बसेसना टोल भरण्याची गरज राहणार नाही.

पर्यावरणपूरक वाहतूक वाढावी, पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी व्हावे आणि ग्राहकांचा खर्च वाचावा, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यामूळेच आता प्रमुख महामार्गावर इलेक्ट्रिक गाडयांना टोल मधून १०० टक्के सूट दिली आहे. यामध्ये या निर्णयामुळे मुंबई-पुणे यशवंतराव चव्हण महामार्ग, अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतु आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या महामार्गावरून प्रवास करताना इलेक्ट्रिक गाड्यांकडून कोणताही प्रकारचा टोल (Free Toll To Electric Vehicles) आकारला जाणार नाही. त्यामुळे वाहनधारकांच्या पैशाची मोठी बचत होईल. आधीच इलेक्ट्रिक गाड्यांमुळे पेट्रोल- डिझेलचा खर्च वाचतोय….,. आता सरकारने इलेक्ट्रिक गाडयांना टोल माफी केल्यामुळे आणखी पैसे वाचणार आहेत. म्हणजेच काय तर इलेक्ट्रिक वाहनधारकांना डबल फायदा होणार आहे.

कोणत्या इलेक्ट्रिक गाडयांना टोलमाफी – Free Toll To Electric Vehicles

महाराष्ट्र EV पॉलिसी २०२५ अंतर्गत टोलमाफी फक्त विशिष्ट श्रेणीच्या इलेक्ट्रिक वाहनांना लागू आहे. यात M2, M3 आणि M6 श्रेणीच्या चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांचा (जसे की टाटा नेक्सॉन EV, MG ZS EV, महिंद्रा XUV400 सारखी पॅसेंजर EVs) आणि इलेक्ट्रिक बसेसचा समावेश आहे. राज्य परिवहन महामंडळ (STU) आणि खासगी कंपन्यांच्या EVs बसेसमध्येही ही माफी लागू होईल. मात्र, ही वाहने महाराष्ट्रात नोंदणीकृत असावीत आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक असावीत. सध्या फक्त मुंबई-पुणे यशवंतराव चव्हण महामार्ग, अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतु आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक गाडयांना टोलमाफी आहे. इतर राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना ५०% टोल सवलत मिळेल. ही पॉलिसी २०३० पर्यंत लागू राहील. त्यासाठी सरकारने १,९९३ कोटी रुपयांचा निधी वाटप केला आहे.

Anukampa Recruitment : अनुकंपा तत्त्वावरील 10,000 रिक्त जागा भरणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Anukampa Recruitment 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Anukampa Recruitment  । गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या संदर्भात अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील महायुती सरकारने अनुकंपा तत्त्वावर (Compassionate Appointment) रिक्त असलेल्या १० हजार जागा तातडीने भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याद्वारे चतुर्थ श्रेणीतील रिक्त जागा सुद्धा भरल्या जाणार आहेत. ज्यामध्ये राज्यभरातील जवळपास 9 हजार 658 जागा आहेत. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा भरतीचा प्रश्न मार्गी लागणार असून, राज्यातील हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. १५ सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व जागा भरल्या जाणार आहेत.

विशेष बाब म्हणजे एकाच वेळी १० हजार जागा भरण्याचा निर्णय राज्यात पहिल्यांदाच घेण्यात आला आहे, त्यामुळे हि भरती अनुकंपा भरतीच्या (Anukampa Recruitment ) इतिहासातील सर्वात मोठी भरती ठरणार आहे. या भरतीत चतुर्थ श्रेणीतील जागांचा मोठा वाटा असून, त्या थेट शासकीय व्यवस्थेमार्फत भरल्या जाणार आहेत. यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमधील एकूण ९,५६८ उमेदवारांचा समावेश आहे. चतुर्थ श्रेणीतील भरती ही खाजगी कंत्राटदराकडून केली जाते. मात्र अनुकंपावरील जेवढ्या जागा आहेत त्या भरल्या जाणार असल्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतला आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेवर पूर्ण करण्यासाठी सरकारने संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.

कुठे कुठे होणार नियुक्त्या ? Anukampa Recruitment 

महानगरपालिका – ५,२२८ उमेदवार प्रतीक्षेत

जिल्हा परिषद – ३,७०५ उमेदवार प्रतीक्षेत

नगरपालिका – ७२५ उमेदवार प्रतीक्षेत

नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 506 उमेदवार प्रतीक्षेत असून, त्यानंतर पुणे (348), गडचिरोली (322) आणि नागपूर (320) यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे या शाशन निर्णयाचा संबंधितांना फायदा होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. नोकरी मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचीही भरभराट होईल.

अनुकंपा धोरण म्हणजे काय?

राज्यातील शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबातील पात्र वारसाला त्या विभागात नोकरी देण्याची तरतूद अनुकंपा धोरणात आहे. हे धोरण 1973 पासून लागू आहे. हे धोरण मुख्यत्वे गट-क आणि गट-ड पदांसाठी लागू होते.

Mumbai Bomb Blast Threat : उद्या मुंबईत बॉम्बस्फोट होणार; 14 दहशतवादी शहरात शिरल्याची धमकी

Mumbai Bomb Blast Threat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Bomb Blast Threat । उद्या अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती बाप्पाचे विसर्जन… मुंबई पुण्यासारख्या मोठया शहरात गणरायाला निरोप देण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर गर्दी करतात आणि वाजत गाजत गणपती बाप्पाचे विसर्जन करतात. गणेश विसर्जनाच्या दृष्टीने मुंबईत ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरु असतानाच आता मुंबईकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. उद्या मुंबई बॉम्बस्फोट घडवण्यात येणार असून त्यासाठी 34 गाड्यांमध्ये 400 किलो RDX तयार असल्याची धमकी मुंबई पोलिसांना मिळाली आहे.

14 पाकिस्तानी दहशतवादी मुंबईत घुसले – Mumbai Bomb Blast Threat

गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या आदल्या दिवशीच मुंबई पोलिसांना एक धमकीचा मेसेज मिळाला आहे. अनंत चतुर्दशीपूर्वी बॉम्बस्फोट होणार असल्याचं या धमकीच्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर हा धमकीचा मेसेज प्राप्त झाला आहे. यामध्ये म्हंटल आहे कि उद्या मुंबईत बॉम्बस्फोट होणार आहे. या स्फोटांमध्ये ४०० किलो आरडीएक्स वापरला जाईल… ज्यामुळे जवळपास १ कोटी माणसे मारली जातील. धमकी देणाऱ्या व्यक्तीने लष्कर-ए-जिहादी” नावाच्या गटाचे नाव पुढे नमूद केले आहे. आणि १४ पाकिस्तानी दहशतवादी आधीच शहरात घुसले असल्याचा दावा केला आहे. या धमकीच्या मेसेज मुळे (Mumbai Bomb Blast Threat) मुंबईत खळबळ उडाली आहे.

तपास यंत्रणा ऍक्शन मोडमध्ये-

मुंबई पोलीस आणि तपास यंत्रणांनी ही धमकी (Mumbai Bomb Blast Threat) गांभीर्याने घेतली आहे. त्यानुसार सायबर आणि दहशतवादविरोधी युनिट्सना त्याचे मूळ शोधण्यासाठी तैनात करण्यात आले आहे, शहरातील महत्वाचे चौक, धार्मिक मिरवणुका आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा तपासणी वाढवण्यात आली आहे. याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा धमकीचा मेसेज कुठून आला आणि यात किती सत्यता आहे याची माहिती आम्ही घेत आहोत. नागरिकांना शांत राहावे. कोणतीही संशयास्पद हालचाली दिसली तर याबाबत माहिती द्या.

दरम्यान, मुंबईत उद्या ठिकठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुका निघालेल्या दिसतील. खास करून परळ-लालबाग आणि गिरगाव चौपाटीला गणेश भक्तांची मोठी गर्दी बघायला मिळते. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा, मुंबईचा राजा (गणेशगल्ली), परळचा राजा (नरेपार्क), परळचा महाराजा, परळचा लंबोदर (लक्ष्मी कॉटेज) या मोठ्या मंडळांच्या गणेशमुर्ती विसर्जनासाठी निघणार आहे. त्यामुळे अर्धी मुंबई उद्या रस्त्यांवर असेल. एकीकडे सर्वत्र गणेश विसर्जनाची लगबग सुरु असताना मुंबईत बॉम्बस्फोटांची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे.

सरसकट ओबीसीतून आरक्षण नाहीच; फडणवीसांचा मराठा समाजाला दे धक्का

Devendra Fadnavis On Aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही परिस्थितीत आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे अशी मागणी लावून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण केलं होते. यानंतर जिरंगे यांचे उपोषण सोडवण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याबाबत जीआर काढला.. सरकारच्या या निर्णयानंतर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगीत केलं आणि मराठा समाजाने मोठा जल्लोष साजरा केला. हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी झाल्यानंतर सर्व मराठ्यांची कुणबी सर्टिफिकेट सापडतील आणि ओबीसी मधून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल असं बोललं जात आहे. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केलं आहे.

एकीकडे मराठा आरक्षणासाठी सरकारने हैदराबाद गॅझेटची अमलबजावणी केल्याने दुसरीकडे राज्यातील ओबीसी समाज अस्वस्थ झाला आहे. आपल्या आरक्षणाला धक्का लागतोय कि काय अशी भावना ओबीसी समाजात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केलं. प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, आम्ही काढलेल्या जीआरचा कोणताही परिणाम ओबीसी आरक्षणावर होणार नाही. ‘मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला शासन निर्णय हा सरसकट नसून तो पुराव्यांशी संबंधित आहे. ज्यांच्याकडे कुणबी असल्याचे पुरावे आहेत, त्याच लोकांना त्याचा लाभ होईल. यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार नाही. ओबीसी समाजाचे कोणतेही नुकसान होणार नाही.

फडणवीस पुढे म्हणाले, हे राज्य आहे तोवर ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. मराठवाड्यात इंग्रजांचे नव्हे तर निजामाचे राज्य होते. त्यामुळे इंग्रज राज्यातील पुरावे इतर ठिकाणी मिळतात. मराठवाड्यात मिळत नाहीत. तिथे निजामकाळातील म्हणजे हैदराबाद गॅझेटच्या नोंदी मिळतात. तेच आपण ग्राह्य धरले आहे. त्यामुळे जे खरे कुणबी आहेत, त्यांनाच हा लाभ मिळेल. यामध्ये कोणालाही खोटेपणा करता येणार नाही. त्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी सुद्धा सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. आम्ही दोन समाजांना कधीच एकमेकांविरुद्ध येऊ देणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल.

MHADA Nashik Lottery 2025 : म्हाडाकडून सर्वसामान्यांना खुशखबर!! नाशिकमध्ये 478 घरांची सोडत जाहीर

MHADA Nashik Lottery 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MHADA Nashik Lottery 2025 । सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात मस्त घरे उपलब्ध करून देणाऱ्या म्हाडाकडून नाशिककरांना आनंदाची बातमी आहे. म्हाडाने म्हाडा नाशिक मंडळाने 478 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली आहे. त्यासाठी मंडळाकडून अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. या 478 घरांच्या शुभारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते वांद्रे येथील मुख्यालयात झाला. त्यामुळे नाशिककराना कमी पैशात घरे खरेदी करता येणार आहे.

कोणत्या भागात घरे मिळणार? MHADA Nashik Lottery 2025

म्हाडा नाशिक मंडळातर्फे जाहीर झालेल्या या सोडतीत नाशिक शहर व परिसरातील गंगापूर शिवार, देवळाली शिवार, पाथर्डी शिवार, म्हसरुळ शिवार, आगर टाकळी शिवार आणि नाशिक शिवार या भागांमध्ये घरे उपलब्ध आहेत. यामध्ये देवळाली शिवारात २२ सदनिका, गंगापूर शिवारात ५० सदनिका, पाथर्डी शिवार ६४ सदनिका, म्हसरुळ शिवार १९६ सदनिका, नाशिक शिवार १४ सदनिका, आगर टाकळी शिवार १३२ सदनिका तर नाशिक शिवारात १४ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (MHADA Nashik Lottery 2025)

अर्ज करण्याची प्रक्रिया व अंतिम मुदत :

सोडतीसाठी दिनांक ०४ सप्टेंबर, २०२५ रोजी दुपारी ०१.०० वाजेपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२५ रोजी रात्री ११. ५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांना दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार आहे. यानंतर ०४ ऑक्टोबर, २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी १७ ऑक्टोबर, २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. MHADA Nashik Lottery 2025

याबाबत म्हाडाने स्पष्ट केले आहे की या नाशिक महामंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या या सोडतीसाठी कोणतेही प्रतिनिधी, एजंट किंवा सल्लागार नेमलेले नाहीत. अर्जदारांनी फसवणूक टाळण्यासाठी थेट https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा म्हाडा लॉटरी ॲपवरूनच अर्ज करावा.

बायकोचं ऐकणारा नवराच सुखी आणि यशस्वी होतो; अभ्यासात मोठा खुलासा

Husband and Wife

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवरा बायको म्हणजे संसाराची दोन चाके…. नवरा बायको एकमेकांना जितकं जास्त प्रेम करतील, एकमेकांची जितकी जास्त काळजी घेतील आणि एकमेकांना जपतील तेवढा त्यांचा संसार सुखाचा होतो असं बोललं जातं. नात्यातील गोडवा टिकला तरच ते नातं टिकतं हे सुद्धा तितकच खर आहे….. काही घरांमध्ये नवरा त्याच्या बायकोचे इतकं ऐकतो की त्याला घरातील इतर लोकांचे टोमणे ऐकावे लागतात. हा बघा सगळं बायकोच ऐकतोय हे सातत्याने सहन करावा लागते … मात्र आता एका अभ्यासानुसार, जो नवरा आपल्या बायकोचे सगळं काही ऐक तोच नवरा सुखी आयुष्य जगतो…. समाधानात त्याचा संसार वाढतो असं समोर आलं आहे.

अमेरिकेतील द गॉटमन इन्स्टिट्यूटचे प्रमुख संशोधक डॉ. जॉन गॉटमन यांनी आनंदी आणि अखंड विवाहाच्या वैशिष्ट्यांचा वर्षानुवर्षे अभ्यास केल्यानंतर त्यांना याबाबत माहिती समोर आली. नवरा बायकोच्या नात्याबद्दल गॉटमन यांनी असं एक सत्य उघड केले जे नवविवाहित पुरुषांसाठी खरोखर उपयुक्त ठरेल. सुखी संसारासाठी गॉटमन यांनी एकच सल्ला दिला आहे, तो म्हणजे तुमच्या पत्नीला आनंदी ठेवा! पुरुषांनी त्यांच्या पत्नींचे ऐकावे आणि व्यावसायिक करिअर मध्ये सक्रिय भूमिका घ्यायला लावावी असं गॉटमन यांनी सांगितलं आहे.

गॉटमन सल्ला देतात की पुरुषांनी त्यांच्या पत्नींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडण्याबाबत सहमत असले पाहिजे.. आपल्या पत्नीला कधीही कोणत्या गोष्टीसाठी विरोध करू नये. बहुतेकदा असे घडते की जे पुरुष आपल्या पत्नींच्या प्रभावाचा प्रतिकार करतात ते त्यांना कळत नकळत असे करतात. हे घडते, आणि ते ठीक आहे, परंतु प्रभाव कसा स्वीकारायचा हे शिकण्याची वेळ आली आहे. “तुमच्या जोडीदाराकडे दररोज लक्ष देऊन आणि त्यांना पाठिंबा देऊन ही एक मानसिकता आणि कौशल्य दोन्ही विकसित होते, डॉक्टरांनी असेही स्पष्ट केलं की भावनिकदृष्ट्या मोठ्या मनाचा नवरा आपल्या बायकोचा प्रभाव स्वीकारण्याची शक्यता जास्त असते . आणि तो तिला अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. कारण कोणतीही भावना व्यक्त करण्यात त्याला संकोच वाटत नाही.

गॉटमनच्या नातेसंबंधांवरील अभ्यासाचे निष्कर्ष पाहून अनेक महिलांनी आनंद व्यक्त करत सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट केल्या. एका महिलेने तिच्या नवऱ्याला टॅग करत म्हंटल, आनंदाची हमी – मी जे सांगतो ते करत राहा!….. तर “तुला हजारवे वेळा टॅग करत आहे… हे अनुसरण करण्याची आशा आहे, असं म्हणत दुसऱ्या एका महिलेने तिचं नवऱ्याची फिरकी घेतली.

IPL Tickets GST : IPL तिकीटावर तब्बल 40 टक्के GST ; क्रिकेटप्रेमींना मोठा झटका

IPL Tickets GST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन IPL Tickets GST। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जीएसटी कौन्सिलने बुधवारी देशाच्या अप्रत्यक्ष कर रचनेत काही मोठे बदल मंजूर केले. आधी असलेल्या जीएसटीच्या चार स्लॅबपैकी 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला असून आता फक्त ५% आणि १८% असे दोनच स्लॅब टॅक्स असतील. या बदलामुळे औषधे, कृषी उपकरणे, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू स्वस्त होणार आहेत. परंतु दुसरीकडे क्रिकेट चाहत्यांना मात्र केंद्र सरकारने मोठा झटका दिला आहे. कारण देशातील आघाडीची क्रिकेट लीग असलेल्या IPL च्या तिकिटावर मात्र तब्बल ४० टक्के टॅक्स आकारण्यात आला आहे. त्यामुळे स्टेडियम मध्ये जाऊन आयपीएल मॅच बघणं आता परवडणार नाही.

इंडियन प्रीमियर लीग ज्याला आपण आयपीएल म्हणतो, ही स्पर्धा म्हणजे देशातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. आपल्या भारतात तर क्रिकेटला एखाद्या धर्माप्रमाणे मानले जाते आणि आयपीएल स्पर्धेत तर देश विदेशातून मोठ्या प्रमाणावर क्रिकेटप्रेमी थेट स्टेडियम मध्ये जाऊन सामन्याचा आनंद लुटतात. भारतात आयपीएलची आणि आयपीएल बघणाऱ्या क्रिकेट प्रेमींची एक वेगळीच हवा असते. मात्र आता याच क्रिकेटप्रेमींना केंद्र सरकारने जोर का धक्का दिला आहे. यापूर्वी आयपीएलच्या तिकिटावर 28 टक्के जीएसटी (IPL Tickets GST) आकारला जात होता मात्र आता जीएसटी 40% वर नेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे क्रिकेट प्रेमींच्या खिशाला चांगलाच चाप बसणार आहे .

का वाढवला आयपीएल तिकिटांवरील टॅक्स ? IPL Tickets GST

सरकारने आयपीएल आणि तत्सम उच्च-मूल्य असलेल्या क्रीडा स्पर्धांना ‘अनावश्यक आणि लक्झरी श्रेणी’मध्ये ठेवले आहे. म्हणून, त्यांना कॅसिनो, रेस क्लब आणि लक्झरी वस्तूंसारख्याच कर स्लॅबमध्ये ठेवण्यात आले आहे. IPL Tickets GST

तुमचं तिकीट किती रुपयांनी वाढणार ?

उदाहरण द्यायचं झालं तर समजा, तुम्ही 1000 रुपयाचे तिकीट घेतलं तर त्यावर आधी 28 टक्के जीएसटीनुसार १२८० रुपये द्यावे लागायचे. मात्र आता हाच टॅक्स 40% झाल्याने तुमच्या खिशातून १४०० रुपये जातील. जर तुम्ही २००० रुपयांचे तिकीट घेतले तर 40% टॅक्स नुसार तुम्हाला 2,800 रुपये भरावे लागतील…. परंतु ही नवीन टॅक्स सिस्टीम फक्त आयपीएल सामन्यांसाठीच आहे, भारतीय क्रिकेट संघाचा एखादा आंतरराष्ट्रीय सामना असेल तर त्या तिकिटांवर आधीप्रमाणेच 18% जीएसटी असेल.

Pune Metro : पुण्यात उभारणार 2 नवी मेट्रो स्थानके; प्रवास होणार आणखी सोप्पा

Pune Metro New Stations

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Metro । महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराचा मागच्या काही वर्षात मोठा कायापालट झाला आहे. खास करून पुण्यातील वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी मेट्रो सेवा सुरु झाल्या आहेत. पुण्यातील अनेक महत्वाच्या मार्गावर मेट्रो धावत असून पुणेकरांचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक सुखकर झाला आहे. आता त्यात आणखी भर पडली असून महाराष्ट्र सरकारने पुणे मेट्रोबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यात २ नवीन मेट्रो स्थानके उभारण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. हि दोन्ही स्थानके स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गिकेवर उभारली जातील. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हि मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी एकूण ६८३.११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

कुठे उभारणार मेट्रो स्थानके – Pune Metro

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा 2 च्या अंतर्गत स्वारगेट ते कात्रज मार्गिकेवरील ही मेट्रो स्थानके बालाजीनगर आणि बिबवेवाडी याठिकाणी उभारली जातील. खरं तर स्वारगेट ते कात्रज या मेट्रो लाईनवर सुरुवातीला तीनच स्थानकांचा समावेश होता. जवळपास साडेपाच किमी लांबीचे अंतर असल्याने आणि या परिसरातून प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने स्वारगेट ते कात्रज मार्गिकेवर आणखी दोन ठिकाणी स्थानके हवीत, अशी आग्रही मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी महामेट्रोकडे केली होती. त्या मागणीला आता यश आल आहे. यामुळे या भागातील नागरिकांसाठी मेट्रो प्रवास अधिक सुलभ होणार आहे. तसेच, सातारा कोल्हापूरला जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडीही मिटेल पुणे मेट्रो टप्पा-२ चा विस्तार (Pune Metro) अधिक कार्यक्षम होऊन पुणेकरांना आधुनिक, जलद आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा लाभ मिळणार आहे.

याव्यतिरिक्त, सरकारने कात्रज मेट्रो स्टेशन त्याच्या पूर्वीच्या प्रस्तावित जागेपासून ४७१ मीटर अंतरावर स्थलांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हंटल कि, स्वारगेट ते कात्रज मार्गिकेवरील बालाजीनगर आणि बिबवेवाडी येथे २ स्थानके उभारण्याच्या या निर्णयामुळे शहरातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या बिबवेवाडी आणि धनकवडी येथील रहिवाशांना मेट्रोची सुविधा मिळेल. या निर्णयामुळे पुणे शहरातील दक्षिण भागातील नागरिकांसाठी मेट्रो प्रवास अधिक सोप्पा होईल.

या प्रकल्पासाठी एकूण ६८३.११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यात पुणे महानगरपालिकेचा 227.42 कोटी रुपयांचा वाटा असून, युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेकडून 341.13 कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे. याशिवाय राज्य शासनाचे दुय्यम कर्ज व व्याजरहित कर्ज यांचा मिळून एकूण खर्च 683.11 कोटी इतका होणार आहे.

D Mart मधून कधीही खरेदी करू नका ‘या’ वस्तू; अन्यथा होईल मोठं नुकसान

D mart

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डी मार्ट हे भारतातील सर्वात मोठे सुपर मार्केट म्हणून ओळखले जाते … राधाकृष्ण दमानी यांनी मुंबईतून सुरू केलेले डी मार्ट पुढे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. आजअखेर देशभरात डी मार्टच्या 400 हून अधिक शाखा आहे . अंगाच्या साबणापासून ते कपड्यांपर्यंत…. बिस्किटांपासून ते अगदी गहू तांदळापर्यंत .. डी मार्टच्या माध्यमातून सर्वच वस्तू एका छताखाली मिळत असल्याने ग्राहक वर्गही मोठ्या प्रमाणात डी मार्ट कडे आकर्षित होतो…. त्यातही महत्त्वाचे बाब म्हणजे डी मार्टमध्ये जवळपास सर्वच वस्तूंवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर असते. त्यामुळे पैशाची बचत करण्यासाठी अनेक ग्राहक डीमार्ट मधूनच दररोजची खरेदी करतात…. परंतु डीमार्ट मध्ये अशाही काही गोष्टी आहेत ज्याची खरेदी करताना तुम्हाला सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, कारण चुकीच्या गोष्टींची खरेदी केल्यास तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं

जसं आम्ही तुम्हाला म्हटलं की डीमार्ट मध्ये प्रत्येक वस्तूवर मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाते. या सवलतीमुळे ग्राहकही आकर्षित होतो आणि मोठमोठ्या वस्तूंची खरेदी करायला लागतो परंतु इथेच तुमची फसवणूक सुद्धा होऊ शकते, कारण काही वेळा ह्या ऑफर्स जुन्या किंवा एक्सपायर डेट जवळ असलेल्या आलेल्या उत्पादनांवर असतात. विशेषतः खाद्यपदार्थ सौंदर्यप्रसाधने खरेदी करत असताना एक्सपायर डेट तपासून घेणे अधिक गरजेचे आहे. खाद्यपदार्थांवर डिस्काउंट किती आहे हे पाहण्यापेक्षा त्याची एक्सपायरी डेट किती पर्यंत आहे हे बघितलं तरच तुमची फसवणूक टळू शकते

दुसरा मुद्दा म्हणजे डी मार्ट मधील ब्रॅण्डेड उत्पादने…. जेव्हा तुम्ही डीमार्ट ला जाता आणि काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील किंवा ब्रँडेड कपडे असतील त्यावर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट लावलेला दिसतो, तेव्हा तो डिस्काउंट पाहून तुम्हालाही असं वाटतं की हा इथे तुम्हाला कमी पैशात वस्तू मिळतात. परंतु याच वस्तू ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा तुम्हाला याच्यापेक्षा स्वस्त मिळू शकतात… उदाहरणार्थ जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेत असाल तर डी मार्टची किंमत आणि ॲमेझॉन फ्लिपकार्ट या ई कॉमर्सची किंमत एकदा जाणून घ्या… कारण सणासुदीच्या काळात ॲमेझॉन असो वा फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्या आपल्या ग्राहकांना सवलतींमध्ये वस्तूंची विक्री करत असतात. त्यामुळे या वस्तू जर तुम्ही डी मार्ट म्हणून खरेदी करायला गेला तर तुम्हाला त्या महाग बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही.