Saturday, December 6, 2025
Home Blog Page 13

सरसकट ओबीसीतून आरक्षण नाहीच; फडणवीसांचा मराठा समाजाला दे धक्का

Devendra Fadnavis On Aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही परिस्थितीत आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे अशी मागणी लावून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण केलं होते. यानंतर जिरंगे यांचे उपोषण सोडवण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याबाबत जीआर काढला.. सरकारच्या या निर्णयानंतर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगीत केलं आणि मराठा समाजाने मोठा जल्लोष साजरा केला. हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी झाल्यानंतर सर्व मराठ्यांची कुणबी सर्टिफिकेट सापडतील आणि ओबीसी मधून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल असं बोललं जात आहे. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केलं आहे.

एकीकडे मराठा आरक्षणासाठी सरकारने हैदराबाद गॅझेटची अमलबजावणी केल्याने दुसरीकडे राज्यातील ओबीसी समाज अस्वस्थ झाला आहे. आपल्या आरक्षणाला धक्का लागतोय कि काय अशी भावना ओबीसी समाजात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केलं. प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, आम्ही काढलेल्या जीआरचा कोणताही परिणाम ओबीसी आरक्षणावर होणार नाही. ‘मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला शासन निर्णय हा सरसकट नसून तो पुराव्यांशी संबंधित आहे. ज्यांच्याकडे कुणबी असल्याचे पुरावे आहेत, त्याच लोकांना त्याचा लाभ होईल. यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार नाही. ओबीसी समाजाचे कोणतेही नुकसान होणार नाही.

फडणवीस पुढे म्हणाले, हे राज्य आहे तोवर ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. मराठवाड्यात इंग्रजांचे नव्हे तर निजामाचे राज्य होते. त्यामुळे इंग्रज राज्यातील पुरावे इतर ठिकाणी मिळतात. मराठवाड्यात मिळत नाहीत. तिथे निजामकाळातील म्हणजे हैदराबाद गॅझेटच्या नोंदी मिळतात. तेच आपण ग्राह्य धरले आहे. त्यामुळे जे खरे कुणबी आहेत, त्यांनाच हा लाभ मिळेल. यामध्ये कोणालाही खोटेपणा करता येणार नाही. त्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी सुद्धा सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. आम्ही दोन समाजांना कधीच एकमेकांविरुद्ध येऊ देणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल.

MHADA Nashik Lottery 2025 : म्हाडाकडून सर्वसामान्यांना खुशखबर!! नाशिकमध्ये 478 घरांची सोडत जाहीर

MHADA Nashik Lottery 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MHADA Nashik Lottery 2025 । सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात मस्त घरे उपलब्ध करून देणाऱ्या म्हाडाकडून नाशिककरांना आनंदाची बातमी आहे. म्हाडाने म्हाडा नाशिक मंडळाने 478 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली आहे. त्यासाठी मंडळाकडून अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. या 478 घरांच्या शुभारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते वांद्रे येथील मुख्यालयात झाला. त्यामुळे नाशिककराना कमी पैशात घरे खरेदी करता येणार आहे.

कोणत्या भागात घरे मिळणार? MHADA Nashik Lottery 2025

म्हाडा नाशिक मंडळातर्फे जाहीर झालेल्या या सोडतीत नाशिक शहर व परिसरातील गंगापूर शिवार, देवळाली शिवार, पाथर्डी शिवार, म्हसरुळ शिवार, आगर टाकळी शिवार आणि नाशिक शिवार या भागांमध्ये घरे उपलब्ध आहेत. यामध्ये देवळाली शिवारात २२ सदनिका, गंगापूर शिवारात ५० सदनिका, पाथर्डी शिवार ६४ सदनिका, म्हसरुळ शिवार १९६ सदनिका, नाशिक शिवार १४ सदनिका, आगर टाकळी शिवार १३२ सदनिका तर नाशिक शिवारात १४ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (MHADA Nashik Lottery 2025)

अर्ज करण्याची प्रक्रिया व अंतिम मुदत :

सोडतीसाठी दिनांक ०४ सप्टेंबर, २०२५ रोजी दुपारी ०१.०० वाजेपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२५ रोजी रात्री ११. ५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांना दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार आहे. यानंतर ०४ ऑक्टोबर, २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी १७ ऑक्टोबर, २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. MHADA Nashik Lottery 2025

याबाबत म्हाडाने स्पष्ट केले आहे की या नाशिक महामंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या या सोडतीसाठी कोणतेही प्रतिनिधी, एजंट किंवा सल्लागार नेमलेले नाहीत. अर्जदारांनी फसवणूक टाळण्यासाठी थेट https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा म्हाडा लॉटरी ॲपवरूनच अर्ज करावा.

बायकोचं ऐकणारा नवराच सुखी आणि यशस्वी होतो; अभ्यासात मोठा खुलासा

Husband and Wife

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवरा बायको म्हणजे संसाराची दोन चाके…. नवरा बायको एकमेकांना जितकं जास्त प्रेम करतील, एकमेकांची जितकी जास्त काळजी घेतील आणि एकमेकांना जपतील तेवढा त्यांचा संसार सुखाचा होतो असं बोललं जातं. नात्यातील गोडवा टिकला तरच ते नातं टिकतं हे सुद्धा तितकच खर आहे….. काही घरांमध्ये नवरा त्याच्या बायकोचे इतकं ऐकतो की त्याला घरातील इतर लोकांचे टोमणे ऐकावे लागतात. हा बघा सगळं बायकोच ऐकतोय हे सातत्याने सहन करावा लागते … मात्र आता एका अभ्यासानुसार, जो नवरा आपल्या बायकोचे सगळं काही ऐक तोच नवरा सुखी आयुष्य जगतो…. समाधानात त्याचा संसार वाढतो असं समोर आलं आहे.

अमेरिकेतील द गॉटमन इन्स्टिट्यूटचे प्रमुख संशोधक डॉ. जॉन गॉटमन यांनी आनंदी आणि अखंड विवाहाच्या वैशिष्ट्यांचा वर्षानुवर्षे अभ्यास केल्यानंतर त्यांना याबाबत माहिती समोर आली. नवरा बायकोच्या नात्याबद्दल गॉटमन यांनी असं एक सत्य उघड केले जे नवविवाहित पुरुषांसाठी खरोखर उपयुक्त ठरेल. सुखी संसारासाठी गॉटमन यांनी एकच सल्ला दिला आहे, तो म्हणजे तुमच्या पत्नीला आनंदी ठेवा! पुरुषांनी त्यांच्या पत्नींचे ऐकावे आणि व्यावसायिक करिअर मध्ये सक्रिय भूमिका घ्यायला लावावी असं गॉटमन यांनी सांगितलं आहे.

गॉटमन सल्ला देतात की पुरुषांनी त्यांच्या पत्नींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडण्याबाबत सहमत असले पाहिजे.. आपल्या पत्नीला कधीही कोणत्या गोष्टीसाठी विरोध करू नये. बहुतेकदा असे घडते की जे पुरुष आपल्या पत्नींच्या प्रभावाचा प्रतिकार करतात ते त्यांना कळत नकळत असे करतात. हे घडते, आणि ते ठीक आहे, परंतु प्रभाव कसा स्वीकारायचा हे शिकण्याची वेळ आली आहे. “तुमच्या जोडीदाराकडे दररोज लक्ष देऊन आणि त्यांना पाठिंबा देऊन ही एक मानसिकता आणि कौशल्य दोन्ही विकसित होते, डॉक्टरांनी असेही स्पष्ट केलं की भावनिकदृष्ट्या मोठ्या मनाचा नवरा आपल्या बायकोचा प्रभाव स्वीकारण्याची शक्यता जास्त असते . आणि तो तिला अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. कारण कोणतीही भावना व्यक्त करण्यात त्याला संकोच वाटत नाही.

गॉटमनच्या नातेसंबंधांवरील अभ्यासाचे निष्कर्ष पाहून अनेक महिलांनी आनंद व्यक्त करत सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट केल्या. एका महिलेने तिच्या नवऱ्याला टॅग करत म्हंटल, आनंदाची हमी – मी जे सांगतो ते करत राहा!….. तर “तुला हजारवे वेळा टॅग करत आहे… हे अनुसरण करण्याची आशा आहे, असं म्हणत दुसऱ्या एका महिलेने तिचं नवऱ्याची फिरकी घेतली.

IPL Tickets GST : IPL तिकीटावर तब्बल 40 टक्के GST ; क्रिकेटप्रेमींना मोठा झटका

IPL Tickets GST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन IPL Tickets GST। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जीएसटी कौन्सिलने बुधवारी देशाच्या अप्रत्यक्ष कर रचनेत काही मोठे बदल मंजूर केले. आधी असलेल्या जीएसटीच्या चार स्लॅबपैकी 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला असून आता फक्त ५% आणि १८% असे दोनच स्लॅब टॅक्स असतील. या बदलामुळे औषधे, कृषी उपकरणे, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू स्वस्त होणार आहेत. परंतु दुसरीकडे क्रिकेट चाहत्यांना मात्र केंद्र सरकारने मोठा झटका दिला आहे. कारण देशातील आघाडीची क्रिकेट लीग असलेल्या IPL च्या तिकिटावर मात्र तब्बल ४० टक्के टॅक्स आकारण्यात आला आहे. त्यामुळे स्टेडियम मध्ये जाऊन आयपीएल मॅच बघणं आता परवडणार नाही.

इंडियन प्रीमियर लीग ज्याला आपण आयपीएल म्हणतो, ही स्पर्धा म्हणजे देशातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. आपल्या भारतात तर क्रिकेटला एखाद्या धर्माप्रमाणे मानले जाते आणि आयपीएल स्पर्धेत तर देश विदेशातून मोठ्या प्रमाणावर क्रिकेटप्रेमी थेट स्टेडियम मध्ये जाऊन सामन्याचा आनंद लुटतात. भारतात आयपीएलची आणि आयपीएल बघणाऱ्या क्रिकेट प्रेमींची एक वेगळीच हवा असते. मात्र आता याच क्रिकेटप्रेमींना केंद्र सरकारने जोर का धक्का दिला आहे. यापूर्वी आयपीएलच्या तिकिटावर 28 टक्के जीएसटी (IPL Tickets GST) आकारला जात होता मात्र आता जीएसटी 40% वर नेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे क्रिकेट प्रेमींच्या खिशाला चांगलाच चाप बसणार आहे .

का वाढवला आयपीएल तिकिटांवरील टॅक्स ? IPL Tickets GST

सरकारने आयपीएल आणि तत्सम उच्च-मूल्य असलेल्या क्रीडा स्पर्धांना ‘अनावश्यक आणि लक्झरी श्रेणी’मध्ये ठेवले आहे. म्हणून, त्यांना कॅसिनो, रेस क्लब आणि लक्झरी वस्तूंसारख्याच कर स्लॅबमध्ये ठेवण्यात आले आहे. IPL Tickets GST

तुमचं तिकीट किती रुपयांनी वाढणार ?

उदाहरण द्यायचं झालं तर समजा, तुम्ही 1000 रुपयाचे तिकीट घेतलं तर त्यावर आधी 28 टक्के जीएसटीनुसार १२८० रुपये द्यावे लागायचे. मात्र आता हाच टॅक्स 40% झाल्याने तुमच्या खिशातून १४०० रुपये जातील. जर तुम्ही २००० रुपयांचे तिकीट घेतले तर 40% टॅक्स नुसार तुम्हाला 2,800 रुपये भरावे लागतील…. परंतु ही नवीन टॅक्स सिस्टीम फक्त आयपीएल सामन्यांसाठीच आहे, भारतीय क्रिकेट संघाचा एखादा आंतरराष्ट्रीय सामना असेल तर त्या तिकिटांवर आधीप्रमाणेच 18% जीएसटी असेल.

Pune Metro : पुण्यात उभारणार 2 नवी मेट्रो स्थानके; प्रवास होणार आणखी सोप्पा

Pune Metro New Stations

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Metro । महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराचा मागच्या काही वर्षात मोठा कायापालट झाला आहे. खास करून पुण्यातील वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी मेट्रो सेवा सुरु झाल्या आहेत. पुण्यातील अनेक महत्वाच्या मार्गावर मेट्रो धावत असून पुणेकरांचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक सुखकर झाला आहे. आता त्यात आणखी भर पडली असून महाराष्ट्र सरकारने पुणे मेट्रोबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यात २ नवीन मेट्रो स्थानके उभारण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. हि दोन्ही स्थानके स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गिकेवर उभारली जातील. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हि मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी एकूण ६८३.११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

कुठे उभारणार मेट्रो स्थानके – Pune Metro

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा 2 च्या अंतर्गत स्वारगेट ते कात्रज मार्गिकेवरील ही मेट्रो स्थानके बालाजीनगर आणि बिबवेवाडी याठिकाणी उभारली जातील. खरं तर स्वारगेट ते कात्रज या मेट्रो लाईनवर सुरुवातीला तीनच स्थानकांचा समावेश होता. जवळपास साडेपाच किमी लांबीचे अंतर असल्याने आणि या परिसरातून प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने स्वारगेट ते कात्रज मार्गिकेवर आणखी दोन ठिकाणी स्थानके हवीत, अशी आग्रही मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी महामेट्रोकडे केली होती. त्या मागणीला आता यश आल आहे. यामुळे या भागातील नागरिकांसाठी मेट्रो प्रवास अधिक सुलभ होणार आहे. तसेच, सातारा कोल्हापूरला जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडीही मिटेल पुणे मेट्रो टप्पा-२ चा विस्तार (Pune Metro) अधिक कार्यक्षम होऊन पुणेकरांना आधुनिक, जलद आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा लाभ मिळणार आहे.

याव्यतिरिक्त, सरकारने कात्रज मेट्रो स्टेशन त्याच्या पूर्वीच्या प्रस्तावित जागेपासून ४७१ मीटर अंतरावर स्थलांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हंटल कि, स्वारगेट ते कात्रज मार्गिकेवरील बालाजीनगर आणि बिबवेवाडी येथे २ स्थानके उभारण्याच्या या निर्णयामुळे शहरातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या बिबवेवाडी आणि धनकवडी येथील रहिवाशांना मेट्रोची सुविधा मिळेल. या निर्णयामुळे पुणे शहरातील दक्षिण भागातील नागरिकांसाठी मेट्रो प्रवास अधिक सोप्पा होईल.

या प्रकल्पासाठी एकूण ६८३.११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यात पुणे महानगरपालिकेचा 227.42 कोटी रुपयांचा वाटा असून, युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेकडून 341.13 कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे. याशिवाय राज्य शासनाचे दुय्यम कर्ज व व्याजरहित कर्ज यांचा मिळून एकूण खर्च 683.11 कोटी इतका होणार आहे.

D Mart मधून कधीही खरेदी करू नका ‘या’ वस्तू; अन्यथा होईल मोठं नुकसान

D mart

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डी मार्ट हे भारतातील सर्वात मोठे सुपर मार्केट म्हणून ओळखले जाते … राधाकृष्ण दमानी यांनी मुंबईतून सुरू केलेले डी मार्ट पुढे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. आजअखेर देशभरात डी मार्टच्या 400 हून अधिक शाखा आहे . अंगाच्या साबणापासून ते कपड्यांपर्यंत…. बिस्किटांपासून ते अगदी गहू तांदळापर्यंत .. डी मार्टच्या माध्यमातून सर्वच वस्तू एका छताखाली मिळत असल्याने ग्राहक वर्गही मोठ्या प्रमाणात डी मार्ट कडे आकर्षित होतो…. त्यातही महत्त्वाचे बाब म्हणजे डी मार्टमध्ये जवळपास सर्वच वस्तूंवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर असते. त्यामुळे पैशाची बचत करण्यासाठी अनेक ग्राहक डीमार्ट मधूनच दररोजची खरेदी करतात…. परंतु डीमार्ट मध्ये अशाही काही गोष्टी आहेत ज्याची खरेदी करताना तुम्हाला सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, कारण चुकीच्या गोष्टींची खरेदी केल्यास तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं

जसं आम्ही तुम्हाला म्हटलं की डीमार्ट मध्ये प्रत्येक वस्तूवर मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाते. या सवलतीमुळे ग्राहकही आकर्षित होतो आणि मोठमोठ्या वस्तूंची खरेदी करायला लागतो परंतु इथेच तुमची फसवणूक सुद्धा होऊ शकते, कारण काही वेळा ह्या ऑफर्स जुन्या किंवा एक्सपायर डेट जवळ असलेल्या आलेल्या उत्पादनांवर असतात. विशेषतः खाद्यपदार्थ सौंदर्यप्रसाधने खरेदी करत असताना एक्सपायर डेट तपासून घेणे अधिक गरजेचे आहे. खाद्यपदार्थांवर डिस्काउंट किती आहे हे पाहण्यापेक्षा त्याची एक्सपायरी डेट किती पर्यंत आहे हे बघितलं तरच तुमची फसवणूक टळू शकते

दुसरा मुद्दा म्हणजे डी मार्ट मधील ब्रॅण्डेड उत्पादने…. जेव्हा तुम्ही डीमार्ट ला जाता आणि काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील किंवा ब्रँडेड कपडे असतील त्यावर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट लावलेला दिसतो, तेव्हा तो डिस्काउंट पाहून तुम्हालाही असं वाटतं की हा इथे तुम्हाला कमी पैशात वस्तू मिळतात. परंतु याच वस्तू ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा तुम्हाला याच्यापेक्षा स्वस्त मिळू शकतात… उदाहरणार्थ जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेत असाल तर डी मार्टची किंमत आणि ॲमेझॉन फ्लिपकार्ट या ई कॉमर्सची किंमत एकदा जाणून घ्या… कारण सणासुदीच्या काळात ॲमेझॉन असो वा फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्या आपल्या ग्राहकांना सवलतींमध्ये वस्तूंची विक्री करत असतात. त्यामुळे या वस्तू जर तुम्ही डी मार्ट म्हणून खरेदी करायला गेला तर तुम्हाला त्या महाग बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींना आता 3000 मिळणार? समोर आली मोठी अपडेट्स

Ladki Bahin Yojana August Installment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींना आता 3000 मिळणार? समोर आली मोठी अपडेट्स । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात. दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होतात. परंतु सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला तरी ऑगस्ट महिन्याचे पैसे न मिळालेले महिला वर्ग चिंतेत आहे. ऑगस्ट चा हप्ता नेमका मिळणार तरी कधी?? असा सवाल लाडक्या बहिणीकडून केला जात असतानाच आता या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

आतापर्यंतचा इतिहास बघितला तर सरकार जेव्हा सणासुदीचा काळ असतो तेव्हा त्या निमित्ताने महिलांच्या बँक खात्यात लाडक्या बहिणी योजनेचे पैसे (Ladki Bahin Yojana August Installment) जमा करतात. जसे की यापूर्वी रक्षाबंधनला हे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. आताही गणेशोत्सवाचा काळ सुरू आहे त्यामुळे, ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांना मिळेल असं बोललं जात होतं. मात्र गणेश चतुर्थीला लाडक्या बहिणींना ऑगस्ट चा हप्ता मिळाला नाही त्यामुळे आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा कदाचित अनंत चतुर्थीला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याचे मिळून एकदम तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात. मात्र हे हप्ते एकत्र देणार की दोन वेगवेगळ्या तारखांना प्रत्येकी दीड हजार रुपये जमा होणार याबाबत कोणती स्पष्टता नाही. सरकारकडून सुद्धा या संदर्भात कोणती अधिकृत अशी माहिती किंवा घोषणा जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु जस आम्ही म्हटलं त्याप्रमाणे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याचे एकत्र असे तीन हजार रुपये महिलांना मिळाल्यास सणासुदीच्या काळात लाडक्या बहिणीसाठी (Ladki Bahin Yojana August Installment) ही सर्वात मोठी दिलासादायक गोष्ट ठरेल.

26 लक्ष लाभार्थी अपात्र– Ladki Bahin Yojana August Installment

दरम्यान,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करुन दिली होती. सदर सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत. त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सुक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरु आहे. छाननीअंती या लाभार्थींची पात्रता/अपात्रता स्पष्ट होणार आहे.

Maharashtra New Railway Line : महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून सुरु होणार नवीन रेल्वेलाईन; अजित पवारांची माहिती

Maharashtra New Railway Line

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra New Railway Line। आपल्या भारतात रेल्वेचं प्रचंड मोठं जाळं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून रेल्वे धावते. महाराष्ट्रातही मागील काही वर्षात रेल्वेचा मोठा विस्तार झाला आहे. खास करून मराठवाड्यात रेल्वे मार्गांची संख्या वाढत आहे. आता मराठवाड्यातील प्रवाशांसाठी आणखी एक गुडन्यूज आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून, येत्या 17 सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर या मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळे अनेक वर्षापासूनचे बीडकरांचे रेल्वेचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

कसा आहे बीड- अहिल्यानगर रेल्वेमार्ग – Maharashtra New Railway Line

बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गाची एकूण लांबी 261.25 किलोमीटर आहे. यादरम्यान, रेल्वे खालील एकूण पुलांची संख्या १३०, तर रेल्वे वरील पुलांची संख्या ६५ असेल. तसेच ६५ मोठे पूल आणि ३०२ छोट्या पूलांचाही समावेश असेल. बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गासाठी १८२२.१६८ हेक्टर जमिनीचे भूसंपादन केलं जाणार आहे. द्वितीय प्रशासकीय मान्यतेनुसार या रेल्वे प्रकल्पाची एकूण किंमत ४८०५.१७ कोटी आहे. त्यामध्ये केंद्र सरकार 50 टक्के आणि राज्य सरकार 50 टक्के हिस्सा उचलणार आहे. बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरु झाल्यानंतर मराठवाड्यातील कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होण्यास मदत होईल. (Maharashtra New Railway Line)

याशिवाय बीड ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे प्रलंबित प्रकरणे बीड जिल्हा प्रशासनाने तातडीने निकाली काढून आवश्यक जमीन उपलब्ध करून द्यावी. या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या हिस्स्याची रक्कम तातडीने अदा करण्यात यावी. अर्थसंकल्पात मंजूर १५० कोटी रुपये देण्यात यावे. उर्वरित १५० कोटी रुपयांची तरतूद करावी. रेल्वेने आतापर्यंत दिलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी असे आदेशही अजित पवारांनी दिलेत. या बैठकीत, अजितदादांनी फलटण ते लोणंद रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्यास आणि बारामती रेल्वे स्थानकाचे काम गतीने करून ते लवकरच प्रवाशांसाठी सुसज्ज करण्याचे निर्देशही दिले.

Zero GST : मोदी सरकारची देशवासियांना खुषखबर! या वस्तूंवर शून्य GST

Zero GST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Zero GST । केंद्रातील मोदी सरकारने दिवाळीच्या तोंडावर देशवासियांना आनंदाची बातमी दिली आहे. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जीएसटी कौन्सिलने बुधवारी देशाच्या अप्रत्यक्ष कर रचनेत काही मोठे बदल मंजूर केले. आधी असलेल्या जीएसटीच्या (New GST Rate) चार स्लॅबपैकी 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला असून आता फक्त ५% आणि १८% असे दोनच स्लॅब टॅक्स असतील. तर काही वस्तू अशा आहेत, ज्यावर आता शून्य टॅक्स असेल… म्हणजेच या वस्तूंवर कोणताही कर आकारण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मध्यमर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वस्तू आता स्वस्त होणार आहेत. केंद्र सरकारच्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे छोट्या व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या 22 सप्टेंबरपासून हा निर्णय लागू होणार आहे.

कोणकोणत्या वस्तूंवर शून्य टॅक्स? Zero GST

१)अति-उच्च तापमानाचे दूध

२) छेना

३) पनीर

४) वैयक्तिक विमा पॉलिसी

५) आरोग्य विमा पॉलिसी

६) केसांचे तेल

७) टॉयलेट साबण

८) साबण बार

९). शॅम्पू

१०) टूथब्रश

११) टूथपेस्ट

१२) सायकल

१३) टेबलवेअर

१४) स्वयंपाकघरातील भांडी आणि इतर घरगुती वस्तू

१५) पिझ्झा

१६) तंदूर रोटी

केंद्र सरकारने GST मध्ये बदल (Zero GST) करत हि पद्धती अधिक सोप्पी आणि सुटसुटीत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सामान्य माणसांसोबतच आता छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हंटल कि, देशातील सर्व सामान्य माणूस आणि मध्यमवर्गीयांसाठी असलेल्या वस्तूंवरील कर पूर्णपणे कमी करण्यात आला आहे. ज्या वस्तूंवर जीएसटी ५% पर्यंत कमी करण्यात आला आहे त्यात केसाला लावायचे तेल, टॉयलेट साबण, साबण बार, शॅम्पू, टूथब्रश, टूथपेस्ट, सायकल, टेबलवेअर, स्वयंपाकघरातील भांडी आणि इतर घरगुती वस्तूंचा समावेश आहे.

Maharashtra Cabinet Decisions : या नागरिकांना महिन्याला 2500 रुपये मिळणार; मंत्रिमंडळ बैठकीत 15 मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Decisions

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Cabinet Decisions । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाचा धडाकाच लावला आहे. काल मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल १५ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील पायाभूत सुविधा, मोठमोठ्या शहरातील प्रकल्प, यांच्याबाबत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. परंतु यापेक्षा सुद्धा मोठा निर्णय म्हणजे श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात १ हजार रुपयांची वाढ करून दर महिन्याला त्यांना २५०० रुपये देण्यात येणार आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीत कोणकोणते निर्णय? Maharashtra Cabinet Decisions

१) संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात १ हजार रुपयांची वाढ लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार ऐवजी आता अडीच हजार रुपये मिळणार. (सामाजिक न्याय विभाग)

२) महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेच्या वापराबाबतचे धोरण निश्चित. (ऊर्जा विभाग)

३) महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा. (कामगार विभाग)

४) कारखाने अधिनियम, १९४८ मध्ये सुधारणा. (कामगार विभाग)

५) अनुसूचित जमातीतील नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करणार. (आदिवासी विकास विभाग)

६) मुंबईतील आणिक डेपो- वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका- ११ प्रकल्पास मान्यता. २३ हजार ४८७ कोटी ५१ लाख रुपयांची तरतूद. (नगर विकास विभाग)

७) ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुण्यातील मेट्रो मार्गिका – २, मार्गिका – ४ तसेच नागपूर मेट्रोच्या टप्पा दोनच्या कर्जांस मान्यता. (नगर विकास विभाग) ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प, पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, स्वारगेट ते कात्रज मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, वनाज ते रामवाडी (मार्गिका क्र. २) च्या विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी), पुणे मेट्रो मार्ग-४ (खडकवासला स्वारगेट हडपसर-खराडी) आणि नळ स्टॉप वारजे-माणिकबाग (उपमार्गिका) व नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा-२ या मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी घेण्यात येणाऱ्या बाह्यसहाय्यित कर्जाचे आकस्मिक दायित्व स्वीकारण्यास, प्रकल्पांचे करारनामा, कर्ज करारनामा आणि दुय्यम वित्तीय करारनामे करण्यास मान्यता. Maharashtra Cabinet Decisions

८) पुणे मेट्रोवरील बालाजीनगर, बिबवेवाडी या दोन नवीन स्थानकांना मंजूरी स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर बालाजीनगर व बिबवेवाडी ही दोन नवीन मेट्रो स्थानके उभारण्यास आणि कात्रज मेट्रो स्थानकाचे दक्षिणेकडे सुमारे ४२१ मीटरने स्थलांतरण करण्यास व यासाठीच्या ६८३ कोटी ११ लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता.(नगर विकास विभाग)

९) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-३ (MUTP-3) व ३अ (MUTP-3A) प्रकल्पातील लोकल (उपनगरीय रेल्वे) गाड्यांच्या खरेदीसाठी कर्जास मान्यता बाह्य सहाय्यित कर्ज घेण्याऐवजी पूर्णतः रेल्वे व राज्य शासनाच्या निधीतून सहाय्य देण्यास, तसेच त्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने ५०% आर्थिक सहभाग देण्यास मान्यता. (नगर विकास विभाग)

१०) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (MUTP- 3B) या प्रकल्पातील राज्य शासनाच्या ५० टक्के आर्थिक सहभागास मान्यता (नगर विकास विभाग)

११) पुणे ते लोणावळा लोकल (उपनगरीय रेल्वे) च्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिका प्रकल्प खर्चाची तरतूद करणार. मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या धर्तीवर आर्थिक भार उचलणार. (नगर विकास विभाग) पुणे ते लोणावळा लोकल (उपनगरीय रेल्वे) च्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिका प्रकल्प खर्चाची तरतूद करणार. मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या धर्तीवर आर्थिक भार उचलणार

१२) ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान उन्नत मार्ग हा प्रकल्प सिडको महामंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक-खाजगी-भागीदारी (PPP) अंतर्गत BOT (Build Operate – Transfer) तत्त्वावर राबविण्यात येणार (नगर विकास विभाग) Maharashtra Cabinet Decisions

१३) “नविन नागपूर” अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार व वित्तीय केंद्र विकसित करणार नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मौजा गोधणी (रिठी) व मौजा लाडगांव (रिठी), तालुका हिंगणा जि. नागपूर येथील एकूण अंदाजे क्षेत्र ६९२.०६ हे. आर. जागा संपादित करून सार्वजनिक हितार्थ “नविन नागपूर” अंतर्गत “International Business and Finance Centre (IBFC)” विकसीत करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यास तत्वत मान्यता.(नगर विकास विभाग)

१४) नागपूर शहराभोवती बाहय वळण रस्ता (Outer Ring Road) व त्यालगत चार वाहतूक बेटांची निर्मिती, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत नागपूर शहराभोवती बाहय वळण रस्ता (Outer Ring Road) व त्यालगत ४ वाहतूक बेट (Truck & Bus Terminal) विकसित करणार. (नगर विकास विभाग)
१५)मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील उच्च न्यायालयाच्या नवीन संकुल बांधकामाच्या खर्चास मान्यता प्रकल्पासाठी ३ हजार ७५० कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता. (नगर विकास विभाग)