अहमदनगर : केडगाव हत्याप्रकरणामधे काॅग्रेसचे नगरसेवक विशाल कोतकर यांना अटक करण्यात आली आहे. शिवसेना पदाधिकार्याच्या हत्या प्रकरणामधे विशाल कोतकर मुख्य सुत्रधार असल्याचा संशय सर्वत्र व्यक्त केला जात आहे. ७ एप्रिल रोजी केडगाव येथे शिवसेनेचे शहरउपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. केडगाव प्रकरणामधे आत्तापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आलेली आहे.
तत्पुर्वी गुरुवारी हत्याकांडाला कारणीभूत ठरलेल्या रवी खोल्लम याला नगर पोलिसांनी अटल केले होते. केडगाव पोटनिवडणूकीत संजय कोतकर व रवी खोल्लम यांच्यामधे मतदानाच्या कारणावरुन वाद झाला होता. खोल्लमला २૪ एप्रिलपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. तसेच या हत्याकांडप्रकरणी पोलीस कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, बी. एम. कोतकर, बाळासाहेब कोतकर यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मुख्य आरोपी संदीप गुंजाळ व बाबासाहेब केदार यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
शिवसेना पदाधिकाराच्या हत्या प्रकरणात काॅग्रेस नगरसेवकाला अटक
आरटीआय द्वारे विचारले १५ लाख केव्हा येणार.? माहित नाही- पंतप्रधान कार्यालयाचे उत्तर
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होतील असे म्हटले होते. याचीच आरटीआयद्वारे विचारणा केली असता माहित नाही असे उत्तर पंतप्रधान कार्यालयातून दिले गेले आहे. २०१६ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींनी मी पंतप्रधान झाल्यानंतर परदेशात असलेला काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मोहन कुमार शर्मा यांनी यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयामधून माहिती मिळण्यासाठी आरटीआय द्वारे अर्ज केला होता. संबंधित माहिती आरटीआय च्या अंतर्गत येत नसून अशी कोणतीही माहिती देण्याची सूचना नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाने उत्तरामध्ये म्हंटले आहे. विशेष बाब म्हणजे संबंधित माहितीसाठी मोहन कुमार शर्मा यांनी नोटबंदीनंतर १८ दिवसानंतर अर्ज केला होता त्याचे उत्तर आता पंतप्रधान कार्यालयातून मिळाले आहे.
पुजा सकट मृत्यप्रकरणी ८ जणांच्याविरुद्ध गुन्हे दाखल, दोघांना अटक
पुणे : भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील प्रमुख साक्षीदार पुजा सुरेश सकट या १७ वर्षाच्या मुलीचा घराजवळील विहीरीमधे मृतदेह आढळून आल्याने भिमा कोरेगाव आणि परिसरामधे एकच खळबळ उडाली आहे. पुजा मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होती. वाडा पुनर्वसन येथील विहिरीमधे तिचा मृतदेह सापडल्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली. १ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगाव येथे झालेल्या दलित आणि हिंदुत्ववादी गटांमधील हिंसाचार प्रकरणामधे पुजा फिर्यादी होती. पुजाचा मृत्यु हा घातपातामधून झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून तिच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेवून चौकशीची मागणी केली आहे.

यापूर्वीही एकमेव साक्षीदार असलेल्या पुजाच्या कुटुंबियांनी पुजाला आणि कुटुंबियांना अज्ञातांकडून धमक्या येत असल्याची तक्रार केली होती. पुजाच्या संशयीत मृत्युच्या पार्श्वभुमीवर पूजा हिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अॅड. सुधीर ढमढेरे, विलास श्रीधर वेदपाठक, गणेश विलास वेदपाठक, नवनाथ ज्ञानोबा दरेकर, सोमनाथ फक्कड दरेकर, विलास काळुराम दरेकर, सुभाष गणपत घावटे, गोरक्ष पाटीलबुवा थोरात, गणेश गोरक्ष थोरात या ८ जणांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात आत्महत्तेस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांबरोबरच्या चकामकीमध्ये १ जवान व १ पोलीस शहीद
श्रीनगर:जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरातील लाम गावामध्ये भारतीय लष्कर व दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू असून या चकमकीत एक जवान व एक पोलीस शहीद झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला.

त्यास जवानांनी चोख प्रत्युत्तरदेखील दिले. यावेळी भारतीय लष्कराला याठिकाणी दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार भारतीय लष्कराने हि कारवाई केली आहे.
लेनिन नंतर आता पेरियार याच्या पुतळ्याची विटंबना

तमिळनाडु : त्रिपुरानंतर आता तमिळनाडूमधे महापुरुषाच्या पुतळ्यांची तोडफोड होण्याचा प्रकार घडला आहे. बेलोनिया येथे लेनिन यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती तर आज तमिळनाडूमधील वेल्लोर येथे द्रविडीयन समाजसुधारक रामासामी उर्फ पेरीयार यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार घडला आहे. भाजपा राज्य सचिव एच. राजा यांनी ‘पेरियार यांचा पुतळासुद्धा उखडून टाकू’ अशा अाशयाची फेसबुक पोस्ट लिहील्यानंतरच सर्व प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे. एच. राजा यांनी मात्र अजुन काहीही स्पष्टकरण दिलेले नसून त्यांनी त्यांची वादात्मक फेसबुक पोस्ट डिलीट केली आहे. पोलिसांनी दोन संशयीतांना अटक केली असून पुढील तपास चालू आहे.
सभागृहातच चंद्रकांतदादा माझ्या अंगावर आले : आमदार कपिल पाटील
मुंबई : ‘मी तुला बघून घेईन’ अशी धमकी देत चंद्रकांतदादा अक्षरश; माझ्या अंगावर धावून आले. हा गुंडागर्दीचा प्रकार चक्क विधानपरिषदेमधेच घडला असून प्रशांत परिचारक यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर मी सभागृहात प्रश्न विचारल्यानेच माझ्यावर अशा प्रकारे हल्ला झाला आहे असा गंभीर आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला आहे.

प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी विधानपरिषदेत मोठा गोंधळ झाला. प्रशांत परिचारक यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यामुळेच चंद्रकांतदादा आपल्या अंगावर धावून आले असल्याचे कपिल पाटील यांचे म्हणणे आहे.
“तुला बघून घेतो, बदडून काढतो”, अशी धमकी राज्याचे महसूलमंत्री देत असतील, तर परिस्थिती गंभीर आहे.”, असे मत कपिल पाटील यांनी व्यक्त केले. प्रशांत परिचारकरांनी जो शब्दप्रयोग केला, ती परंपरा या सरकारला मान्य आहे काय? हा माझा प्रश्न आहे. जर तसे नसेल तर त्याचा खुलासा सरकार का करत नाही?. सत्ताधारी पक्ष परिचारकांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे, विचारधारेचे समर्थन करते की नाही, हे सरकारने स्पष्ट करायला हवे. स्पष्टकरण देण्याऐवजी चंद्रकांतदादा सभागृहात ज्याप्रकारे भाषा वापरत होते, ती अतिशय निकृष्टदर्जाची होती आणि वेदनाजनक होती.” असे कपिल पाटील म्हणाले.https://youtu.be/gpFCAc49m6c
हे जम्मू नाही तर जालना आहे
जालना ता.११ : मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीसह पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. गारपीटीने शेतपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे समजत आहे.

सकाळी झालेल्या गारांच्या पावसामुळे काहीकाळाकरीता जालना आणि परिसराला जम्मू कश्मिरचे रुप आले होते. जालना, वाशिम, बुलडाणा, अकोला आणि बीडमध्ये गारपिटीसह पाऊस पडला. जालन्यात १५ मिनिटे मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. गहू, हरभरा, द्राक्षे, आंबा आदी पिकांचे नुकसान झाले. अंबड, मंठा तालुक्यातही गारांसह पाऊस कोसळला. रस्त्यांवर गारांचा खच पडला होता. बीड जिल्ह्यातील अनेक भागांत गारा आणि पाऊस पडला. धुळे शहरात पावसाच्या सरी बरसल्या. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वाकद, महागाव आणि बेलखेड परिसरात गारपीट झाली. बुलडाण्यालाही गारांनी तडाखा दिला.






