Sunday, December 7, 2025
Home Blog Page 15

Hyderabad Gazette : हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी होणार; मनोज जरांगेंचा मोठा विजय

Hyderabad Gazette

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Hyderabad Gazette । मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मोठं यश आलं आहे. आज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, हैदराबाद गॅझेट लागू करावे अशा मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्यात. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर नवीन प्रस्ताव सादर केला. त्यानुसार, सरकारने तातडीने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच याबाबतचा जीआर सुद्धा जारी करणार असल्याचं सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे हे मोठं यश म्हणाव लागेल.

सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. हैदराबाद गॅझेटची (Hyderabad Gazette) तातडीने अंमलबजावणी सरकार करणार आहे. त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याची हमी मराठा उपसमितीने दिली. तसेच राज्य सरकारने सातारा संस्थानचे गॅझेटही लागू करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. सातारा गॅझेटिअरची जबाबदारी माझी अशी ग्वाही छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. तसेच मी खोटा शब्द देणार नाही असा विश्वासही त्यांनी मनोज जरांगे पाटील याना दिला. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सातारा गॅझेटिअर लागू करण्यासाठी एक महिन्याचा वेळ दिला.

तसेच मराठा आणि कुणबी एकच आहे असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यावरही सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबतची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे महिन्याभराचा वेळ द्या अशी विचारणा सरकारने जरांगे यांना केली आहे. तर जरांगे पाटील यांनी सरकारला एक नव्हे तर दोन महिन्यांची वेळ दिली आहे. त्यामुळे आता दोन महिन्यांत मराठा आणि कुणबी यांच्याबाबत निर्णय घेणार आहे.

सरकारकडून कोणकोणत्या मागण्या मान्य – Hyderabad Gazette

१) हैद्राबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी तात्काळ करणार
२) सातारा गॅझेटिअरला एक महिना वेळ द्यावा… त्याची जबाबदारी शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली.
३) मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेणार, त्याबाबत लवकरच GR काढणार
४) मराठा आंदोलकांवरील दंड मागे घेणार
५) ‘मराठा आणि कुणबी एक आहे हे सिद्ध करणारी प्रक्रिया थोडी किचकट, त्यासाठी वेळ हवा

Pune Metro Extension : आता थेट आळंदीपर्यंत धावणार मेट्रो; मुरलीधर मोहोळ यांची पुणेकरांना खुशखबर

Pune Metro Extension

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Metro Extension । पुणे मेट्रोबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. केंद्र सरकारने रामवाडी आणि वाघोली दरम्यान मेट्रो कॉरिडॉर बांधण्यास मंजुरी दिल्यानंतर,आता शहराच्या पूर्वेकडील भागात वाहतूक आणखी मजबूत करण्यासाठी आता हा रूट थेट आळंदीपर्यंत वाढवण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील मेट्रोचा विस्तार आळंदीपर्यंत केला जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. प्रस्तावित विस्ताराचा व्यवहार्यता अभ्यास लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

भाविकांचा प्रवास सोप्पा होईल- Pune Metro Extension

मुरलीधर मोहोळ यांनी विश्रांतवाडी येथील जनता दरबारात बोलताना सांगितलं कि, त्यांनी या मेट्रो विस्ताराबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने हा प्रकल्प आता लवकरच प्रत्यक्षात उतरेल. आळंदी हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे, अशावेळी आळंदी सारख्या भागात मेट्रोचा विस्तार केल्याने फक्त भाविकांनाच नव्हे तर त्याठिकाणी राहत असलेल्या नागरिकांनाही मोठा फायदा होईल. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या ग्रामीण भागातून आळंदीला सतत भाविकांची ये-जा पाहायला मिळते. त्यामुळे थेट आळंदी पर्यंत मेट्रो (Pune Metro Extension) आली तर या भाविकांचा प्रवास सोप्पा होईल असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हंटल तर जलद शहरीकरण आणि वाढत्या वाहतूक कोंडीमुळे आधीच वैतागलेल्या स्थानिक रहिवाशांनी सुद्धा या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दुसरीकडे आळंदीला मेट्रो (Pune Metro Extension) जोडणीसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या अनिल टिंगरे यांनीही आनंद व्यक्त केला. या मेट्रो विस्तारामुळे केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जोडणे शक्य होणार नाही तर लोहगाव विमानतळापर्यंत पोहोचणे शक्य होईल. आपण यापूर्वी अधिकाऱ्यांना विश्रांतवाडी चौकातील चालू उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर प्रकल्पाच्या डिझाइनमध्ये बदल करण्याची विनंती केली होती जेणेकरून ते प्रस्तावित मेट्रो अलाइनमेंटशी जुळणार नाही. “मेट्रो मार्ग सुरळीतपणे पार पडावा यासाठी आम्ही काही डिझाइन बदल सुचवले आहेत. या मुद्द्यावर मुरलीधर मोहोळ आणि नागरी अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका झाल्या आहेत असं टिंगरे यांनी स्पष्ट केले.

Western Railways : मुंबईकरांची गर्दीपासून सुटका होणार; गणेश विसर्जनानिमित्त पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय

Western Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Western Railways सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आहे. खास करून मुंबई आणि पुणे सारख्या शहरात तर गणेशोत्सवाला भक्तांची मोठी गर्दी बघायला मिळते. अशावेळी भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आधीच एसटी बस आणि रेल्वेने अतिरिक्त गाड्या वाढवल्या आहेत, तर काही ठिकाणी ट्रेनच्या वेळेत बदल केले आहेत. आता 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असून त्यादिवशी वाजत गाजत गणरायाला निरोप दिला जातो. त्यावेळीही मुंबईत भक्तांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेने ६ आणि ७ सप्टेंबरच्या मध्यरात्री चर्चगेट आणि विरार दरम्यान काही विशेष लोकल गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

रेल्वेने ट्विट करत दिली माहिती- Western Railways

पश्चिम रेल्वेने याबाबत एक ट्विट करत म्हंटल कि, गणपती विसर्जनाच्या निमित्ताने प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, पश्चिम रेल्वे ०६/०७ सप्टेंबर २०२५ च्या मध्यरात्री चर्चगेट आणि विरार दरम्यान सहा जोड्या अतिरिक्त विशेष लोकल गाड्या चालवणार आहे. या पोस्टसह रेल्वे विभागाने लोकल ट्रेनचे नवीन वेळापत्रक सुद्धा सादर केल आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, दादर, अंधेरी, बोरिवली आणि वसई रोड यासारख्या प्रमुख स्थानकांवर नियमित अंतराने विशेष गाड्या चालवल्या जातील. तर ६ आणि ७ सप्टेंबर २०२५ च्या मध्यरात्री चर्चगेट आणि विरार दरम्यान सहा जोड्या अतिरिक्त विशेष लोकल गाड्या धावतील. (Western Railways)

दरम्यान, गणेशोत्सव काळात लालबागचा राजा, गणेश गल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि जीएसबी सेवा मंडळ यासारख्या सार्वजनिक मंडळांमध्ये मोठी गर्दी होते, भाविकभक्त अनेकदा आशीर्वाद घेण्यासाठी तासनतास रांगा लावतात. परिणामी मोठी गर्दी बघायला मिळते. आरत्या, भजन, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मुंबई भक्तांनी भरते. याचमुळे अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने (Western Railways) चर्चगेट आणि विरार दरम्यान अतिरिक्त ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai Kolhapur Special Train : मुंबईहून कोल्हापूरसाठी विशेष ट्रेन सुरु होणार!! पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना गुडन्यूज

Mumbai Kolhapur Special Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Kolhapur Special Train । ऑगस्ट ते डिसेंबर हा काळ म्हणजे सणासुदीचा काळ मानला जातो. सध्या सर्वांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. गणपती नंतर काही दिवसांनी नवरात्रीचा सण येईल. 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना होईल आणि मग ९ दिवस नवरात्र उत्सव साजरा होईल. नवरात्री नंतर दसरा आणि मग दिवाळी.. म्हणजेच काय तर हा सगळा सणांचा माहौल बघायला मिळेल. सण उत्सव आले कि चाकरमानी मोठ्या प्रमाणात आपल्या मूळगावी जातात आणि मोठ्या उत्सवात सण साजरा करत असतात. परिणामी एसटी बस, रेल्वे खचाखच भरलेल्या दिसतात. अशावेळी प्रवाशांवर ताण वाढू नये, त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी काही स्पेशल गाड्या सुरु करण्यात येतात. याच एकूण सर्व पार्श्वभूमीवर मुंबईहून कोल्हापूरसाठी एक विशेष रेल्वेसेवा सुरु होणार आहे. या नव्या ट्रेनमुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

कधीपासून सुरु होणार मुंबई कोल्हापूर विशेष ट्रेन? Mumbai Kolhapur Special Train

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वेने मुंबई ते कोल्हापूर साठी 24 सप्टेंबर पासून विशेष रेल्वेसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. हि स्पेशल ट्रेन 26 नोव्हेंबरपर्यंत धावेल आणि दोन्ही शहरांना जोडण्याचे काम करेल. मुंबई कोल्हापूर विशेष ट्रेन दर बुधवारी रात्री 10:00 वाजता कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 01:30 वाजता मुंबईत पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात हीच ट्रेन मुंबईहून दर गुरुवारी दुपारी 02:30 वाजता कोल्हापूरच्या दिशेने रवाना होईल आणि शुक्रवारी पहाटे 04:20 वाजता कोल्हापुरात पोहचेल. विशेष बाब म्हणजे स्पेशल गाडीला मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. मुंबई ते कोल्हापूर ट्रेन (Mumbai Kolhapur Special Train) हि संपूर्ण पश्चिम महाराष्टातून धावणार असल्याने, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील लोकांनाही या रेल्वेचा फायदा होणार आहे.

कोल्हापूरकरांसाठी आणखी एक ट्रेन?

सणासुदीच्या काळात कोल्हापूरकरांसाठी आणखी एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. कोल्हापूर – कलबुर्गी असं या स्पेशल ट्रेनचे नाव आहे. हि ट्रेन शुक्रवार सोडून आठवड्यातील इतर ६ दिवस धावेल. तिच्या वेळापत्रकाबाबत सांगायच झाल्यास, हि ट्रेन कोल्हापुरातून सकाळी 06:10 वाजता सुटेल आणि दुपारी 04:10 वाजता कलबुर्गीला पोहचेल. तर परतीच्या प्रवासात संध्याकाळी 06:10 वाजता कलबुर्गीतून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 05:40 वाजता कोल्हापुरात दाखल होईल.

Mumbai Police Notice To Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंना पोलिसांची नोटीस; आझाद मैदान रिकामं करण्याच्या सूचना

Mumbai Police Notice To Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Police Notice To Manoj Jarange Patil । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्यासोबत लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील कडक उपोषण करत असताना दुसरीकडे मुंबईत मराठा बांधव रस्त्यावर गोंधळ घालत असल्याची माहिती काल वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात दिली. त्यामुळे आज दुपारपर्यंत मुंबई मोकळी करा असे निर्देश कोर्टाने मराठा आंदोलकांना दिले. कोर्टाच्या या आदेशामुळे मराठा बांधवाना धक्का बसला असतानाच आज मुंबई पोलिसांनी थेट मनोज जरांगे पाटील यांनाच नोटीस पाठवली आहे. आझाद मैदान रिकामं करा अशा स्पष्ट सूचना या नोटिसी मधून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मराठा आंदोलनाचं नेमकं काय होणार? असा प्रश्न उपस्थित होतोय.

काय म्हंटल आहे नोटीस मध्ये ? Mumbai Police Notice To Manoj Jarange Patil

आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावून लवकरात लवकर आझाद मैदान खाली करण्यास सांगितले आहे. आपणास यापूर्वी आंदोलन करण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीतील अटी व शर्तीचे आपण उल्लंघन केले आहे. त्यामुळे लवकरात लवकर आझाद मैदान मोकळं करा. आपणास आम्ही फक्त एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, मात्र तुम्ही या अटींचे उल्लंघन केलं असं या नोटिशीत म्हंटल आहे. तसेच मनोज जरांगे पाटलांनी प्रसार माध्यमांवर केलेल्या वक्तव्यचाही पोलिसांनी दखल घेत त्याचा उल्लेखही या नोटीसमध्ये (Mumbai Police Notice To Manoj Jarange Patil) करण्यात आला आहे.

खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वी एक हमीपत्र देण्यात आलं होते, त्याच आपण पालन करू अशी हमी जरांगे पाटील यांनी दिली होती. परंतु त्यातील बहुतांश अटीशर्तींचे पालन हे झालंच नाही. त्यातच मराठा बांधवानी मुंबईतील रस्त्यांवर केलेली हुल्लडबाजीही अंगलटी आली असं म्हणावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक, मुंबई महापालिकेसमोरील रस्त्यांवर मराठा बांधव खो खो कबड्डी खेळताना दिसले. काहींनी तर पोलिसांच्या बॅरेकेटलाच गाडी करून त्यावरून रस्त्यावर फिरताना दिसले… काही ठिकाणी आंदोलकांकडून अरेरावीचे प्रकार घडले. बेस्ट बसमधील प्रवाशांना मारहाण केल्याची घटना समोर आली. या सर्व गोष्टींची दखल मुंबई पोलिसांनी घेतली आणि मनोज जरांगे पाटील याना नोटीस पाठवत (Mumbai Police Notice To Manoj Jarange Patil) आझाद मैदान खाली करण्यास सांगितलं. आता मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात? पोलिसांच्या नोटिशीला कस उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत नवा GR?? सरकारकडून हालचाली वाढल्या

Maratha Reservation GR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maratha Reservation । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्यासोबत लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे पाटलांची तब्ब्येत खालावली आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेमुळे सरकार पुढे पेच वाढला आहे. याच दरम्यान, सरकारच्या गोटातून एक महत्वाची माहिती समोर येतेय. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार कडून नवा GR सादर होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) नवीन जीआर काढण्याच्या तयारीत आहे. ज्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र कायद्याने मिळू शकते त्यांना ते मिळण्यासाठीची सोप्पी प्रणाली कशी आणता येईल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसचं कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक आणि कुणबी प्रमाणपत्रधारक यांच्या अॅफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्यासंदर्भात विचार सुरु आहे. कुणबी नोंदी पडताळणीसाठी ग्रामपंचायत आणि तालुका लेव्हल वर नवीन स्क्रुटिनी कमिटी स्थापन करून गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचे बोललं जात आहे. यानंतर महाधिवक्त्यांच्या मान्यतेनंतर मनोज जरांगे पाटील यांना नवीन मसुदा दाखवण्यात येईल आणि मग अंतिम निर्णय घेतला जाईल अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळ उपसमिती, ॲडव्होकेट जनरल बीरेंद्र सराफ, न्या. संदीप शिंदे यांची एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीनंतर वरील निर्णय झाल्याचे बोललं जात आहे. मात्र अजून तरी सरकार कडून याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

जरांगे पाटील यांच्या मागण्या काय ? Maratha Reservation

1) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे
2) मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे
3) हैदराबाद गझेटियर लागू करा…तसेच सातारा, मुंबई गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
४) सगेसोयरे धोरणाची अंमलबजावणी करावी. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या पोट जात म्हणून घ्या.
५) मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी
६) मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.

Maratha Protesters : मराठा आंदोलकांना मोठा झटका; कोर्टाचे राज्य सरकारला महत्वाचे आदेश

Maratha Protesters

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maratha Protesters । मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांना जोर का झटका दिला आहे. दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा. 2 दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर आणा तसेच जे आंदोलक बाहेरून मुंबईच्या दिशेने येत आहेत त्यांना मुंबईच्या वेशीवरच रोखा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईत धडकला असून संपूर्ण मुंबई पॅक झाली आहे. दक्षिण मुंबईत तर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून या एकूण सर्व पार्श्वभूमीवर मराठा आंदोलन बेकायदेशीर असल्याची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावर दुपारी तातडीने सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी हायकोर्टाने मराठा बांधवांवर ताशेरे ओढले.

न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणी वेळी कोर्टाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते आणि महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी मराठा आंदोलक मुंबईत कसा धुडघूस (Maratha Protesters) घालत आहेत ते कोर्टाला सांगितलं. आंदोलक (Manoj Jarange Patil Mumbai Morcha) रेल्वे ट्रॅक वर उतरत आहेत, लोकांच्या गाड्या अडवत आहेत. वाहनधारकांना लायसन्स विचारत आहेत असा आरोप सदावर्ते यांनी केला. यामागे राजकीय हस्तक्षेप आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे लोक आंदोलकांना अन्नधान्य पुरवतात असा दावा करत सदावर्ते यांनी खळबळ उडवून दिली. दुसरीकडे, महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनीही म्हंटल कि, नियमांचे पालन करणे आवश्यक होते, परंतु ते होताना दिसत नाही. ५००० लोकांना परवानगी दिली होती, मात्र त्यापेक्षा जास्त लोक आली.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ६ वाजेपर्यंत परवानगी होती, मात्र तरीही मराठा आंदोलकांनी ६ नंतर आझाद मैदान सोडलं नाही. मुंबई पोलिसांची निम्म्याहून जास्त पोलीस यंत्रणा हि आंदोलनातच व्यस्त आहे.

कोर्ट काय म्हणाले? Maratha Protesters

मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेलं आहे, आता कोणालाही मुंबईत येऊ देऊ नका, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. मुंबईत अजूनही बाहेरून आंदोलक लाखोंच्या संख्येने येत असतील तर अश्या सर्व आंदोलकांना (Maratha Protesters) मुंबईच्या वेशीवरच थांबवा. तसेच आझाद मैदानाव्यतिरिक्त आंदोलकांनी इतर ठिकाणी वावरु नयेत अशा सूचना कोर्टाने दिल्या. उद्या म्हणजेच मंगळवारी दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व आंदोलकांना हटवा, मुंबईतील ज्या ज्या ठिकाणी रस्ते अडवण्यात आले आहेत तेथून आंदोलकांना हटवा. मात्र दुसरीकडे आंदोलकांना मूलभूत गरजा मिळायला हव्यात असेही कोर्टाने म्हंटल.

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : आंदोलकांना ठाकरे- पवारांची माणसे अन्नधान्य पुरवतात; सदावर्ते यांचा कोर्टात आरोप

Manoj Jarange Patil Mumbai Morcha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manoj Jarange Patil Mumbai Morcha । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आपल्या लाखो मराठा बांधवांसोबत मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईत धडकला असून सीएसएमटी परिसरासह संपूर्ण मुंबईत जिकडे बघेल तिकडे मराठा बांधव दिसत आहे. कोणी रस्त्यांवर खो खो खेळतंय, तर कोण रस्त्यावरच अंघोळ करत आहे. मराठयांनी अक्षरशः रस्ते जाम करून टाकलेत. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर मराठा आंदोलन बेकायदेशीर असल्याची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली. यावर आज तातडीने सुनावणी सुरु असून वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी कोर्टात सनसनाटी दावे केले आहेत. मराठा आंदोलकांना ठाकरे- पवारांची माणसे अन्नधान्य पुरवतात असा युक्तिवाद सदावर्ते यांनी कोर्टात केला.

यामागे राजकीय हस्तक्षेप- Manoj Jarange Patil Mumbai Morcha

न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणी वेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हंटल, सीएसएमटी हे संवेदनशील ठिकाण असून या परिसरात जनजीवन ठप्प झालं आहे, आंदोलक (Manoj Jarange Patil Mumbai Morcha) रेल्वे ट्रॅक वर उतरत आहेत, लोकांच्या गाड्या अडवत आहेत. वाहनधारकांना लायसन्स विचारत आहेत. एक दिव्यांग ५ तास वाहतूक कोंडीत अडकला होता असा युक्तिवाद गुणरत्ने सदावर्ते यांनी केला. आधीच गणेशोत्सवामुळे मुंबईत भार वाढलाय, त्यात आता तर आणखी काही लोक आंदोलनाला येतील असं चॅलेंज करण्यात येत आहे… यामागे राजकीय हस्तक्षेप आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे लोक आंदोलकांना अन्नधान्य पुरवतात असा आरोप सदावर्ते यांनी कोर्टात केला. तर राज्य सरकारने कोर्टात सांगितलं कि शनिवार आणि रविवारच्या आंदोलनाला आम्ही परवानगी दिली नव्हती, ते आंदोलन परवानगी शिवाय सुरु होत.

दुसरीकडे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनांत (Manoj Jarange Patil Mumbai Morcha) अटीशर्तीच्या झालेल्या उल्लंघनाची माहिती कोर्टात दिली. हमीपत्र देताना अटींचे पालन करू असं सांगितलं होत अशी माहिती महाधिवक्ता यांनी कोर्टात सांगितलं. ५००० लोकांना परवानगी दिली होती, मात्र त्यापेक्षा जास्त लोक आली. ध्वनिपेक्षकाचा वापर सुद्धा परवानगी शिवाय झाला. गणेशोत्सव सुरु असताना अनेक गाड्या रस्त्यावर रोखल्या जात आहेत. नियमांचे पालन करणे आवश्यक होते. खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ६ वाजेपर्यंत परवानगी होती, मात्र तरीही मराठा आंदोलकांनी ६ नंतर आझाद मैदान सोडलं नाही. मुंबई पोलिसांची निम्म्याहून जास्त पोलीस यंत्रणा हि आंदोलनातच व्यस्त आहे. यानंतर शाळा आणि कॉलेज बद्दल काय परिस्थिती काय असा सवाल कोर्टाकडून करण्यात आला, त्यावर उत्तर देताना उद्यापासून शाळा आणि कॉलेज सुरु होत आहेत अशी माहिती महाधिवक्त्यानी दिली.

Pune Longest Flyover : पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Pune Longest Flyover

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Longest Flyover गणेशोत्सवानिमित्त पुणेकरांना गुड न्यूज मिळाली आहे. पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी सुरु होणार आहे. सिंहगड रस्त्यावर हा उड्डाणपूल उभारण्यात आला असून या पुलामुळे फनटाईम थिएटरहुन विठ्ठलवाडी हा प्रवास अधिक सुपरफास्ट होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे उद्घाटन पार पडणार आहे. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती बघायला मिळेल.

कसा असेल नवीन उड्डाणपूल? Pune Longest Flyover

सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेला हा पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल सुमारे २.५ किलोमीटर लांबीचा आहे. सप्टेंबर 2021 मध्ये या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. आज हा प्रकल्प प्रत्यक्षात पुणेकरांसाठी साकार झाला आहे. पुलाचा पहिला टप्पा म्हणजेच राजाराम पूल चौकातील 520 मीटर लांबीचा भाग मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू झाला. दुसरा टप्पा विठ्ठलवाडी ते फनटाईम मे 2025 मध्ये सुरू झाला होता. तर गोयल गंगा चौक ते इनामदार चौक असा तिसरा टप्पा संप्टेंबरमध्ये पूर्ण झाला. या संपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल ११८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

या दुहेरी उड्डाणपूलामुळे (Pune Longest Flyover) सिंहगड रोड आणि आसपासच्या भागात, धायरी, खडकवासला, वडगाव बुद्रुक, नांदेड शहर आणि मुंबई-बेंगळुरू महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांवरील गर्दी मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि परिणामी वाहतूक कोंडीही मिटण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा प्रवास १५-२५ मिनिटांनी कमी होईल. खरं तर पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी दूर व्हावी या हेतूनेच हा दुहेरी उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. पुण्यातील दळणवळण व्यवस्थेत हा प्रकल्प एक महत्त्वाची भूमिका निभावेल

मंत्री माधुरी मिसाळ यांनी या नव्या उड्डाणपुलाबद्दल माहिती देताना म्हंटल कि, पुणे हे महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणारे शहर आहे. पुण्यात लोकसंख्या आणि रस्त्यांवरील गाड्या या दोन्हीचीही संख्या वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंहगड रोड वरील दुहेरी उड्डाणपूल (Pune Longest Flyover) सर्व वाहतुकीच्या अडथळ्यांना तोंड देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या उड्डाणपुलामुळे दररोज हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच पुण्याच्या पश्चिम कॉरिडॉरमधील निवासी आणि व्यावसायिक केंद्रांमधील कनेक्टिव्हिटी वाढेल.

Bank Holidays In September 2025 : सप्टेंबरमध्ये किती दिवस बँका बंद? तारखेनुसार संपूर्ण यादी पहा

Bank Holidays In September 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bank Holidays In September 2025 । ऑगस्ट महिना संपला असून आजपासून सप्टेंबर महिना सुरु झाला आहे. सप्टेंबर महिन्यात तुमचं बँकेत काही काम असेल, कर्जाची प्रक्रिया असेल किंवा अन्य काही कामे असतील तर हि बातमी खास तुमच्यासाठी आहे. दर महिन्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यात सुद्धा बँकांना अनेक दिवस सुट्ट्या आहेत. रिजर्व बँक ऑफ इंडियाने याबाबतची यादी जाहीर केली आहे. सप्टेंबर महिन्यात अनेक सण उत्सव असल्याने सुट्ट्यांची हि यादी पाहूनच तुम्ही बँकेत जावा, नाहीतर तुमचा फुकटचा हेलफाटा होऊ शकतो.

कोणकोणत्या दिवशी बँकांना सुट्टी ? Bank Holidays In September 2025

३ सप्टेंबर – कर्मपूजेमुळे रांची आणि पटना येथे बँका बंद राहतील.
४ सप्टेंबर – पहिल्या ओणममुळे त्रिवेंद्रम आणि कोची येथील बँका बंद राहतील.
५ सप्टेंबर – ईद-ए-मिलाद/मिलाद-उन-नबी/तिरुवोनम/मिलाद-ए-शरीफ निमित्त दिल्ली, मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये बँका बंद राहतील.
६ सप्टेंबर – ईद-ए-मिलादमुळे जम्मू, श्रीनगर आणि गंगटोकमध्ये बँका बंद राहतील.
७ सप्टेंबर – रविवार निमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
१२ सप्टेंबर – ईद-ए-मिलादनंतर शुक्रवार, ज्यामुळे जम्मू आणि श्रीनगरमधील बँका बंद राहतील.
१३ सप्टेंबर – महिन्याच्या दुसऱ्या शनिवार निमित्त देशभरातील बँका बंद राहतील.
१४ सप्टेंबर – रविवार निमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
२१ सप्टेंबर – रविवार निमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
२२ सप्टेंबर – नवरात्र स्थापना निमित्त जयपूरमधील बँका बंद राहतील.
२३ सप्टेंबर – महाराजा हरि सिंह जयंतीनिमित्त जम्मूमधील बँका बंद असतील .
२७ सप्टेंबर – महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशातील सर्व बँका बंद राहतील.
२८ सप्टेंबर – रविवारच्या सुट्टीमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
२९ सप्टेंबर – महासप्तमी/दुर्गा पूजा असल्याने कोलकाता, गुवाहाटी आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
३० सप्टेंबर – महाअष्टमी/दुर्गा पूजा असल्याने कोलकाता, त्रिपुरा आणि भुवनेश्वरसह अनेक ठिकाणी बँकांना सुट्टी असेल.

आजकाल मोबाईल वरून बँकेची कितीही कामे ऑनलाईन होत असली तरी बँकेत कोणत्या ना कोणत्या कारणाने जावं लागतच. बँकेत जायच म्हंटल कि अक्खा दिवस जातो, त्यामुळे सप्टेंबर महिन्यात बँकेत जाण्यापूर्वी आधी वरील सुट्ट्याची यादी पहा आणि मगच बँकेत जावा. या सुट्ट्यांच्या कालावधीत (Bank Holidays In September 2025) बँक शाखा बंद राहिल्यामुळे चेक क्लिअरन्स, RTGS आणि NEFT सारख्या सेवांना विलंब होऊ शकतो. परंतु ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमद्वारे पैसे काढणे किंवा बिल पेमेंटसारखे व्यवहार शक्य होतील.