Sunday, December 7, 2025
Home Blog Page 17

मोठी बातमी!! या 12 आमदार- खासदारांचा जरांगे पाटलांना जाहीर पाठिंबा

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी आज थेट मुंबईत धडक दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो मराठा बांधवांच्या साथीने मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर पोहचले आहेत. आज दिवसभर ते आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. मराठा बांधवांच्या प्रचंड संख्येने मुंबई भगवी झाली आहे. मनोज जरांगे यांच्या एका हाकेवर हा संपूर्ण जनसागर लोटला आहे. जरांगे पाटलांवर प्रेम करणारी जनता हीच त्यांची आणि मराठा समाजाची खरी ताकद आहे. एकीकडे जनतेची प्रचंड साथ असताना दुसरीकडे सत्ताधारी पक्षासह विरोध पक्षाच्या आमदार, खासदारांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. हे आमदार खास नेमके कोणकोणते आहेत याचीच यादी थोडक्यात जाणून घेऊयात

कोणकोणत्या नेत्यांचा जरांगे पाटलांना जाहीर पाठिंबा –

ओमराजे निंबाळकर – खासदार, धाराशिव लोकसभा
कैलास पाटील – आमदार, धाराशिव-कळंब विधानसभा
संजय ऊर्फ बंडू जाधव – खासदार, परभणी लोकसभा
उत्तमराव जानकर, आमदार माळशिरस विधानसभा
बजरंग सोनवणे खासदार, बीड लोकसभा
नारायण आबा पाटील, आमदार करमाळा विधानसभा
संदीप क्षीरसागर आमदार, बीड विधानसभा
राजेश विटेकर – आमदार पाथरी विधानसभा
विजयसिंह पंडित – आमदार, गेवराई विधानसभा
प्रकाश सोळंके – आमदार, माजलगाव विधानसभा
राजू नवघरे – आमदार- वसमत विधानसभा
डॉक्टर बाबासाहेब देशमुख, आमदार सांगोला विधानसभा

जरांगे पाटील यांच्या मागण्या काय ?

1) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे
2) मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे
3) हैदराबाद गझेटियर लागू करा…तसेच सातारा, मुंबई गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
४) सगेसोयरे धोरणाची अंमलबजावणी करावी. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या पोट जात म्हणून घ्या.
५) मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी
६) मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.

दरम्यान, आझाद मैदानात पोहोचताच मनोज जरांगे यांनी मुंबईत आलेल्या मराठा बांधवांना मार्गदर्शन करत आरक्षणाची मागणी आणखी धारधार केली आहे. आमच्या सर्व मागण्या या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. मराठ्यांना विजय मिळवून दिल्याशिवाय, डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलणार नाही…. मला गोळ्या घातल्या तरी चालतील पण आता समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही अशी गर्जना मनोज जरांगे पाटलांनी केली आहे.

मुंबई ते रत्नागिरी फक्त 3 तासांत; 1 सप्टेंबरपासून सुरु होणार रो-रो सेवा

RO RO Ferry Mumbai To konkan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बाब आहे. मुंबईतील भाऊचा धक्का ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्गपर्यंत 1 सप्टेंबरपासून रोरो फेरी सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईतून कोकणात अवघ्या ३ तासांत जाणे शक्य होणार आहे. आधीच एकीकडे मुंबई गोवा महामार्गाची बिकट अवस्था आणि रेल्वेला असलेली मोठी गर्दी यामुळे कोकणवासीयांना प्रवास करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतं. परंतु आता नव्या रोरो सेवेमुळे आता कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होईल.

रस्तेमार्गाने मुंबईतून रत्नागिरीला किंवा सिंधुदुर्गला पोहोचण्यासाठी 10 ते 12 तास लागतात. मात्र रोरो सेवा सुरू झाल्यानंतर आता फक्त 3 ते ५ तासांत हा प्रवास पूर्ण होणार आहे. भाऊचा धक्का (फेरी घाट) ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशी रोरो (रोल-ऑन/रोल-ऑफ) फेरीमध्ये ६५६ प्रवासी, ५० चारचाकी आणि ३० दुचाकी बसतील. खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात रोरोचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रकल्पासाठी आम्हाला डीजी शिपिंग आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट सारख्या केंद्रीय संस्थांकडून १४७ परवानग्या मिळाल्या आहेत,” असे मंत्री नितेश राणे म्हणाले.

कोणत्या गाडीला किती खर्च ?

एम२एम प्रिन्सेस या फेरीचे भाडे इकॉनॉमीसाठी २,५०० रुपये, प्रीमियम इकॉनॉमीसाठी ४,००० रुपये, बिझनेस क्लाससाठी ७,५०० रुपये आणि फर्स्ट क्लाससाठी ९,००० रुपये असेल. चारचाकी वाहनासाठी ६,००० रुपये, दुचाकीसाठी १,००० रुपये आणि सायकलसाठी ६०० रुपये आकारले जातील. मिनीबससाठी १३,००० रुपये, ३० आसनी बससाठी १४,५०० रुपये, ४५ आसनी बससाठी १७,००० रुपये आणि मोठ्या बससाठी २१,००० रुपये शुल्क आकारले जाईल. ही फेरी २५ नॉट्सच्या वेगाने प्रवास करेल आणि देशातील सर्वात वेगवान प्रवासी फेरींपैकी एक असेल अशी माहिती नितेश राणे यांनी दिली. सुरुवातीला ही सेवा रत्नागिरीतील जयगड आणि सिंधुदुर्गातील विजयदुर्ग इथपर्यंत असेल.

वेळापत्रक कसे असेल?

हि रोरो फेरी मुंबईहून सकाळी 6.30 वाजता सुटेल आणि 11 वाजता पोहोचेल. यानंतर अर्धा तास थांबून दुपारी ही रो-रो दीड वाजता विजयदुर्गला पोहोचेल. यानंतर दुपारी अडीच वाजता विजयदुर्गहून पुन्हा एकदा ती परतीच्या प्रवासात मुंबईच्या दिशेने रात्री नऊ वाजता पुन्हा मुंबईला पोहोचेल. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. रोरो फेरी सेवा ३० वर्षांहून अधिक काळानंतर कोकणात परतणार आहे असं नितेश राणे यांनी म्हंटल.

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची मुंबईत धडक!! मराठा समाज लाखोंच्या संख्येने एकवटला

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manoj Jarange Patil । मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी येथून निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आता मुंबईत धडकला आहे. सध्या हा ताफा कोळीवाडा येथे असून आझाद मैदानाच्या दिशेने कूच करत आहे. आझाद मैदानावर आधीच मराठा समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. लाखोंच्या संख्यने मराठा एकवटला आहे. संपूर्ण मुंबईत भगवं वादळ पाहायला मिळत आहे. आज मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसतील, तसेच उपस्थित मराठा समाजाला मार्गदर्शन करतील.

आरक्षण पाहिजे असेल तर मुंबईला चला अशी साद मनोज जरांगे पाटील यांनी समस्त मराठा बांधवाना घातली होती. आपली लढाई आता आरपारची आहे, गोळ्या घातल्या तरी आता मी घेणार नाही… त्यामुळे मुंबईला चला अशी हाक जरांगे पाटलांनी मराठा समाजाला दिला होता. समाजाने सुद्धा जरांगे पाटलांना चांगला पाठिंबा दिला. जरांगे पाटलांच्या एका हाकेवर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज लाखोंच्या संख्येने मुंबईत धडकला आहे. हीच मनोज जरांगे पाटील यांची ताकद आहे. मराठ्यांची वाढती संख्या बघून पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. संपूर्ण रस्ते पॅक झाल्याने वाहतुकीतून मार्ग काढणेही अवघड बनलं आहे. आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी दिली आहे. त्यामुळे संध्याकाळी सहानंतर मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक काय भूमिका घेणार हे पहाणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. त्यातही फक्त ५००० लोकांनीच उपोषण करावं अशी अट जरांगे पाटलांना घालण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या कोणत्या? Manoj Jarange Patil

1) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे

2) मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे

3) हैदराबाद गझेटियर लागू करा…तसेच सातारा, मुंबई गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

४) सगेसोयरे धोरणाची अंमलबजावणी करावी. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या पोट जात म्हणून घ्या.

५) मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी

६) मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.

एकनाथ शिंदे ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडी

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट दिली. गणपती दर्शनासाठी दोन्ही नेते राज ठाकरेंच्या घरी गेले होते. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा राज ठाकरेंच्या घरी पोहचले आहेत. राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाचे दर्शन एकनाथ शिंदेनी घेतले.

खरं तर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. शिवसेनेत बंड झाल्यानंतरही एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये जवळीक निर्माण झाली होती. राज ठाकरे अनेकदा शिंदे मुख्यमंत्री असताना वर्षावर जायचे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेही गणपती दर्शन असो वा इतर कारणासाठी राज ठाकरेंच्या घरी जायचे. मात्र मागच्या काही दिवसापासून राजकारण पूर्णपणे बदललं आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढली आहे. दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये युती होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा केल्याने थेट शिंदेच्या शिवसेनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर आज प्रथमच एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले. आजच्या भेटीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा सुरु आहे.

राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका. जसे मागच्या वर्षी मी राज ठाकरेंच्या गणपती दर्शनाला आलो होतो तसच आताही आलो आहे. आम्ही तर नेहमीच राज ठाकरेंच्या घरी गणपती दर्शनाला येतो, परंतु यावर्षी आपण काही नवीन लोक येथे आलेले सुद्धा बघितलं, त्याचा आनंद झाला अशी कोपरखळीही नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरेंना मारली. मी गणरायाला एवढंच साकडं घातलं कि महाराष्ट्रावरची विघ्न दूर कर, बळीराजाला सुखी ठेव, चांगला पाऊस पाड, बळीराजाची प्रगती, उन्नती होउदे…. आमच्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, जेष्ठ नागरिक आहेत ,, अशा महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना सुखात समाधानात ठेव असं साकडं आपण बाप्पाला घातल्याची माहिती एकनाथ शिंदेनी दिली.

Manoj Jarange Patil : तुम्ही गोळ्या घातल्या तरी….. ; शिवनेरीवरून जरांगेंनी फुंकलं रणशिंग

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manoj Jarange Patil सरकारने मुंबईतील उपोषणाला फक्त एकदा दिवसाची मुदत दिली आहे.. माझा मराठा समाजाचा अपमान आहे, हा माझाही अपमान आहे.. सरकार जाणून बुजून सातत्याने अपमान करत आहे,कारण मी त्यांना मॅनेज होत नाही. होय, तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी आता मागे हटणार नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईकडे कूच केलेले मनोज जरांगे पाटील हे सध्या शिवनेरीवर पोचले आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

फडणवीस, तुम्ही आमचे शत्रू नाही – Manoj Jarange Patil

मनोज जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही मला जसं एक दिवस उपोषण करण्याची मुदत दिली, तसेच तुम्हीही एका दिवसात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा… सरकार समाजाला मूर्ख बनवतंय, प्रत्येक वेळी समाजाचा आणि माझा जाणूनबुजून अपमान करत आहेत, कारण मी त्यांना मॅनेज होत नाही.. पण आता मी हटत नाही, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगे त्या गोळ्या झेलणार आहे, परंतु मागे हटणार नाही. देवेंद्र फडणवीस, तुम्ही आमचे शत्रू नाही आहात. त्यामुळे मोठ्या मनाने वागा, आडमुठी भूमिका घेऊ नका. गोरगरीब मराठ्यांच्या वेदना समजून घ्या….. तुम्ही जर आम्हाला आरक्षण दिले तर मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही, त्यामुळे मराठ्यांची मने जिंकण्याची सुद्धा हीच संधी आहे असं जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी म्हंटल.

दरम्यान, रात्री आम्ही मुंबईत पोहचू… आज पवित्र शिवनेरी किल्ल्यावर जाऊन दर्शन घेऊन रात्रीपर्यंत आम्ही मुंबईतील आझाद मैदानावर पोहचू आणि आमदार्न उपोषण करू. मराठ्यांनो, संयम ठेवा, शांततेत सगळं करा.. तुमच्या एका चुकीमुळे समाजाच्या हातातोंडात आलेला घास जाता कामा नये.. गडबड गोंधळ करू नका.. मी शांततेने मराठ्यांच्या पदरात एक एक गोष्ट टाकत चाललोय,, हे प्रत्येकाने समजून घ्यायच आहे… थोडं संयमाने घ्या…. समाज आपल्याकडे आरक्षणाची आशा लावून बसला आहे, त्या स्वप्नावर पाणी फेरून द्यायचं नाही .. असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं…

PM SVANidhi Yojana : छोटे दुकानदार- व्यापाऱ्यांसाठी खुशखबर!! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

PM SVANidhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन PM SVANidhi Yojana केंद्रातील मोदी सरकार कडून सतत कोणत्या ना कोणत्या लोकोपयोगी योजना सुरूच असतात. शेतकरी,कर्मचारी, व्यापारी, मध्यमवर्गीय अशा सर्वच गटातील लोकांसाठी सरकार वेगवेगळी धोरणे राबवत असते. आताही सरकारने छोटे दुकानदार आणि व्यापाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून पंतप्रधान स्वनिधी योजनेला ३१ मार्च २०३० पर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यासाठी एकूण ७,३३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ५० लाख नवीन लाभार्थ्यांसह १.१५ कोटी लाभार्थ्यांना आर्थिक फायदा मिळवून देणे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने पंतप्रधान स्वनिधी योजनेला मुदतवाढ दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट करत म्हटले की, “आम्ही देशभरातील आमच्या रस्त्यावरील विक्रेत्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत. या दिशेने, आज पंतप्रधान स्वनिधी योजनेला (PM SVANidhi Yojana) ३१ मार्च २०३० पर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. मला विश्वास आहे की हे त्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यास उपयुक्त ठरेल.

किती कर्ज मिळणार? PM SVANidhi Yojana

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि वित्तीय सेवा विभाग (डीएफएस) संयुक्तपणे या योजनेची अंमलबजावणी करतील. योजनेतील फेरबदलांनुसार पहिल्या टप्प्यात फेरीवाले किंवा रस्त्यावरील विक्रेत्यांना पूर्वी जे 10 हजार रुपयांचं कर्ज मिळायचं ते आता 15 हजार रुपये मिळेल. दुसऱ्या टप्प्यातील कर्ज 20 हजारांवरन वाढवून 25000 हजार रुपये करण्यात आलं आहे. तिसऱ्या टप्प्यातील कर्ज आधीप्रमाणेच 50000 रुपये मिळेल.

खरं तर पीएम स्वानिधी योजना (PM SVANidhi Yojana) हि कोरोना काळात सुरु करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून रस्त्यावर व्यवसाय करणारे, फळभाजी विक्रेते, फेरीवाले अशा छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदत केली जाते. रस्त्यावरील विक्रेत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे सर्वांगीण कल्याण आणि विकास सुनिश्चित करण्याच्या दिशेने सरकारने टाकलेलं हे महत्वाचे पाऊल होते. पीएम स्वानिधी योजनेच्या माध्यमातून ३० जुलै २०२५ पर्यंत, ६८ लाखांहून अधिक रस्त्यावरील विक्रेत्यांना १३,७९७ कोटी रुपयांचे ९६ लाखांहून अधिक कर्ज वितरित करण्यात आले आहे. तर सुमारे ४७ लाख डिजिटली सक्रिय लाभार्थ्यांनी ६.०९ लाख कोटी रुपयांचे ५५७ कोटींहून अधिक डिजिटल व्यवहार केले आहेत

CIBIL Score For Loan : आता CIBIL स्कोर नसतानाही मिळणार कर्ज; सरकारने दिली गुड न्यूज

CIBIL Score For Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन CIBIL Score For Loan। मित्रानो, कोणत्याही बँकेत तुम्ही कर्ज काढायला गेला तर सर्वात आधी तुमचा सिबिल स्कोर चेक केला जातो. तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तरच तुम्हाला बँकेतून कर्ज मिळते, आणि सिबिल स्कोर चांगला नसेल तर कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देत नाही. परंतु यामुळे यांना प्रथमच कोणतं तरी कर्ज काढायचं आहे अशा लोकांना फटका बसतो. मात्र आता त्यावर उपाय म्हणून सरकारने थेट नियमात बदल केला आहे. जे ग्राहक प्रथमच कर्ज काढत आहेत अशा लोकांना आता सिबिल स्कोर नसतानाही कर्ज मिळणार आहे.

मंत्रालयाने या संदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. अर्थ मंत्रालयाचे म्हणणे आहे की पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्यांसाठी CIBIL स्कोअर आवश्यक नाही त्यामुळे अशा लोकांना CIBIL स्कोअरच्या आधारे कर्ज देण्यास बँका नकार देऊ शकत नाहीत. खरं तर संबंधित व्यक्तीवर कर्ज किती आहे किंवा त्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी केली आहे? याबाबतची सगळी माहिती सिबिल स्कोरच्या माध्यमातून मिळते, त्यामुळे कर्ज देण्यापूर्वी बँका तुमचा सिबिल स्कोर (CIBIL Score For Loan) तपासतात. परंतु जे प्रथमच कर्ज घेत आहेत त्यांचा सिबिल स्कोर नसल्यामुळे बँक किंवा एनबीएफसी यांच्याकडून त्यांना कर्ज दिले जात नाही. अशा ग्राहकांना सरकारच्या नवीन नियमामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

मंत्री काय म्हणाले? CIBIL Score For Loan

याबाबत राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत म्हटले की, रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) च्या निर्देशांनुसार, बँका किंवा इतर कर्जदाते केवळ कमी किंवा शून्य CIBIL स्कोअरच्या आधारे कोणालाही कर्ज नाकारू शकत नाहीत. 6 जानेवारी 2025 रोजी RBI ने जारी केलेल्या मास्टर डायरेक्शनमध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे की क्रेडिट इतिहासाअभावी ग्राहकाला कर्ज नाकारता येणार नाही. ग्राहकांकडे जर CIBIL स्कोअरच नसेल तर अशावेळी सदर ग्राहकाची पार्श्वभूमी आणि पेमेंट इतिहास पाहून कर्ज दिले जाऊ शकते. सरकारने कर्ज अर्जासाठी किमान CIBIL स्कोअर निश्चित केलेला नाही. त्यामुळे बँका CIBIL स्कोअर नसतानाही (CIBIL Score For Loan) कर्ज देऊ शकतात असं पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं.

Manoj jarange Patil : अखेर जरांगेंच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी; पण ठेवली ही मोठी अट

Manoj jarange Patil Mumbai Protest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manoj jarange Patil । मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील याना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी अखेर मनोज जरांगे पाटील याना आझाद पार्कवर आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे. परंतु हि परवानगी फक्त एका दिवसासाठी असणार आहे. त्यातही पोलिसांकडून काही अटीशर्ती घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे जरांगे यांना जरी आंदोलनास परवानगी दिली असली तरी अटीशर्ती घालून त्यांच्या आंदोलनाला मर्यादा घालण्याचं काम पोलिसांनी केलं आहे.

काय आहेत अटी? Manoj jarange Patil

१) मनोज जरांगे पाटील याना फक्त एकच दिवस आझाद मैदानावर बसून उपोषण करता येईल.
२) उपोषणस्थळी जास्तीत जास्त ५००० लोक असावेत. हा आकडा वाढणार नाही याची काळजी घ्यावी.
३) आझाद मैदानाचे ७००० स्कवेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे, त्यातच ५००० लोकांनी आंदोलन करावं.
४) शनिवार, रविवार आणि शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आंदोलनाला कोणतीही परवानगी नसेल
५) ठराविक वाहनांना परवानगी देण्यात आलेली असून वाहनतळासाठी वाहतूक पोलीसांशी विचारविनिमय करुन परवानगी देण्यात येईल.
६) आपली वाहने मुंबईत एंट्री केल्यानंतर ईस्टर्न फ्री वे वरून वाडीबंदर जंक्शन पर्यंत येतील. त्यानंतर मात्र मुख्य आंदोलकासोबत फक्त ५ गाड्या आझाद मैदानात जातील. इतर सर्व गाड्या ही वाडीबंदर येथून पोलीसांनी निर्देशित केलेल्या शिवडी, ए शेड व कॉटनग्रीन परिसरात पार्कीग कराव्या.
७) परवानगी घेतल्याशिवाय ध्वनीक्षेपक, सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणाऱ्या उपकरणाचा वापर करता येणार नाही.
८) सदर आंदोलनात लहान मुले, गरोदर स्त्रिया व वृद्घ व्यक्तींना सहभागी होता येणार नाही.

या अटीशर्ती मुळे मराठा आंदोलकांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे, कारण संपूर्ण राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. दरम्यान, पोलिसांच्या या अटीशर्तीनंतर मनोज जरांगे पाटील यांनीही प्रत्युत्तर दिले. आम्ही एका दिवसात कस आंदोलन करणार? असा सवाल त्यांनी केला. जर एका दिवसात सरकार आमच्या मागण्या मान्य करत असेल तरच आम्हाला या अटी मान्य आहेत. आम्हाला जर एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली तर सरकारने सुद्धा एका दिवसात आरक्षण द्यावं असा टोला जरांगे पाटलांनी लगावला, परंतु जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही उठणार नाही असा इशाराही त्यांनी (Manoj jarange Patil) दिला.

Liquor Banned In Pune : मोठी बातमी!! पुण्यात दारुविक्रीला बंदी; जिल्ह्याधिकाऱ्यांनी काढले आदेश

Liquor Banned In Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Liquor Banned In Pune । आज गणेशोत्सव असून सर्वाच्याच घरी गणरायाचे आगमन झालं आहे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या जयघोषात संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमला आहे. गणेशभक्तांमध्ये मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असताना पुणे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यात आज म्हणजे २७ ऑगस्ट आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी दारूविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तर २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ११ दिवसांसाठी खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दारू विक्रीवर पूर्ण बंदी जाहीर केली आहे.

दारूबंदीमागची कारणे काय ? Liquor Banned In Pune

पुण्याच्या मध्यवर्ती भागात अनेक प्रतिष्ठित गणपती मंडळे आहेत. तसेच आसपासच्या शहरातून सुद्धा पुण्यातील गणेश मंडळे बघण्यासाठी, देखावे बघण्यासाठी आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी भक्तांची पाऊले पुण्याकडे वळत असतात. अशावेळी कोणताही चुकीचा प्रकार घडू नये, दारू पिऊन कोणी दंगा करू नये, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा मद्यविक्रीचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज आणि अनंत चतुर्थीला म्हणजेच ६ सप्टेंबरला पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व दारू दुकाने बंद राहतील (Liquor Banned In Pune) असे आदेश देण्यात आले आहेत. 5 व्या आणि 7 व्या दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावरदेखील दुकान बंद राहणार आहेत.

जे कोणी या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे. पुण्यातील गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. दरम्यान, आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जय्यत तयारी सुरू आहे. पुण्यात अनेक मोठमोठी गणेश मंडळे आहेत जिथे ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे स्वागत केलं जात आहे. गणपती बाप्पा मोरया!! मंगलमूर्ती मोरया!! आला रे आला गणपती आला अशा घोषणा देत गणेशभक्त अक्षरशः तल्लीन झाला आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण गणरायाच्या भक्तिमय वातावरणात एकरूप झाले आहेत.

Nagpur To Gondia New Expressway : विदर्भात तयार होतोय नवा महामार्ग; 26 उड्डाणपुल, 8 अंडरपास अन बरंच काही

Nagpur To Gondia New Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nagpur To Gondia New Expressway। विदर्भातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने नागपूर-गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पाच्या आखणीस तसेच याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यास मान्यता दिली आहे. काल पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर ते गोंदिया अंतर १६२.५ किलोमीटर लांबीचे असून या नव्या महामार्गासाठी तब्बल ३,१६२.१८ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या महामार्गामुळे पूर्व विदर्भातील वाहतूक आणि दळणवळणाला चालना मिळणार आहे. तसेच प्रवाशांच्या वेळेचीही मोठी बचत होणार आहे.

कसा असेल नवा एक्सप्रेसवे – Nagpur To Gondia New Expressway

सध्या नागपूरहून गोंदियाला जायचं म्हंटल तर ३ तासांपेक्षा जास्त वेळ लागत आहे. परंतु या नव्या एक्सप्रेस वे मुळे नागपूर ते गोंदिया अंतर सव्वा तासांपर्यंत कमी होईल, कारण नवीन एक्सप्रेसवे च्या निर्मितीमुळे सुमारे १५ किलोमीटर अंतर कमी होणार आहे. हा मार्ग नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील १० तालुक्यांमधील ११५ गावांमधून जाईल. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतुकीलाही बळ मिळणार आहे. नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे (Nagpur To Gondia New Expressway) प्रकल्पाअंतर्गत २६ उड्डाणपूल, ८ प्राण्यांचे अंडरपास, १५ मोठे पूल, ६३ लहान पूल आणि ७१ कल्व्हर्ट क्रॉसिंगचा समावेश आहे. ज्यामध्ये गवसी, पाचगाव, ठाणे, रोटरी, पांजरा, पालडोंगरी, लोहारी आणि सावरी येथे ८ इंटरचेंज असतील.

हा प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्गाचाच पुढचा टप्पा असेल.. समृद्धी महामार्ग हा मुंबई ते नागपूर पर्यंत आहे.. आता हाच रस्ता पुढे गोंदिया पर्यंत विस्तारला जाईल. अधिकाऱ्यांनी म्हंटल कि, नागपूर ते गोंदिया या नव्या एक्सप्रेसवे मुळे या परिसरातील प्रादेशिक गतिशीलता तर वाढेलच, याशिवाय लोकांचा प्रवास जलद होईलमी पूर्व विदर्भांतील पायाभूत सुविधांचे जाळे मजबूत होईल. आणि नागपूर व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील औद्योगिक आणि शहरी विकासाचा पाया रचला जाईल. या रस्ते प्रकल्पाच्या (Nagpur To Gondia New Expressway) भूसंपादनास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून तब्बल ३,१६२.१८ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.